Home Education Pilot Study in Research का आणि कशी करावी?

Pilot Study in Research का आणि कशी करावी?

- Advertisement -

What is Pilot Study? हा एक मोठ्या प्रकल्पाचा प्रायोगिक तत्त्वावर वेळेच्या स्वत:ची प्रगती जाणून घेण्यासाठी केलेला लहानशी चाचणी आहे. यातून आपण ज्या मोठ्या गोष्टीला सामोरी जात आहोत, त्याचा नक्की तयारी किती झाली, हे तपासण्याचा उत्तम मार्ग म्हणजे Pilot Study. उदाहरणचं सांगायचं झालं तर, १०वी किंव्हा १२वी या बोर्डांच्या परीक्षेपूर्वी शिक्षण बोर्डाकडून अशीच एक चाचणी परीक्षा (preliminary Exam) घेतली जाते. या मागचा उद्धेश असतो की, जो विद्यार्थी बोर्डाच्या मुख्य परीक्षेला जाणारा आहे त्याची तयारी किती झाली. जर त्याची तयारी अपूर्ण असेल तर नक्की कोणत्या विषयात त्याला विशेष लक्ष देण्याची गरज आहे. जेणेकरून बोर्डाच्या परीक्षेचे त्याच्यावर दडपण येणार नाही. हेच तत्त्व सर्वच मोठ्या प्रोजेक्टच्या संदर्भात अवलंबिले जाते.

दुसरं एक उदाहरण पाहू, “सैराट” मराठी आलेला आणि मैलाचा दगड बनलेल्या या चित्रपटातील सर्वच कलाकार त्याच्या चित्रिकरणापूर्वी एकत्रित राहत होते. विषयाला समजून घेत होते. दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे त्यांच्यातील लकबी आणि आवाजांच्या विशेष गोष्टी जाणून घेत. त्याचाच परिणाम म्हणजे त्या चित्रपटाचे यश. त्याचप्रमाणे आपल्याला एखादी सिरीयल(मालिका) बनवायची असेल तर ती कशी असेल? त्याच्यात नेमके कलाकार कोणते असतील? त्याची ठेवण कशी असेल? लोकं या विषयाला स्वीकारतील का? हे सगळं जाणून घेण्यासाठीच चॅनेल, निर्मात्याकडून संपूर्ण मालिका बनवायला सांगण्यापूर्वी असाच एक pilot study प्रोजेक्ट करून मागते. त्यामुळे त्यांना त्याच्या प्रश्नांची उत्तरे मिळतात. काही कमतरता असतील त्या काढून टाकण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. तर विषय चांगला नसल्यास अथवा त्यांना विषय नापसंद वाटल्यास ते निर्मात्याला यावर अजून खर्च करू नका. असा सल्लाही देतात. म्हणूनच आपल्या उणीवा आणि झालेला अभ्यास याची पडताळणी करण्यासाठी “pilot study” हाच सर्वोत्तम मार्ग आहे.

New Education Policy 2020

"<yoastmark

१) Pilot Study Meaning :  

पायलट प्रयोग हा एक लहान प्रमाणात प्राथमिक अभ्यास आहे. जो पूर्ण-स्तरीय संशोधन प्रकल्पाच्या कामगिरीपूर्वी व्यवहार्यता, कालावधी, खर्च, त्यातील प्रतिकूल घटनांचे मूल्यांकन करण्यासाठी आणि अभ्यासाच्या डिझाइनमध्ये सुधारणा करण्यासाठी आयोजित केला जातो. त्यालाच पायलट स्टडी, पायलट प्रोजेक्ट, पायलट टेस्ट, बोर्डाच्या परीक्षेपुर्वीची सराव परीक्षा, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीचा प्रीमियर शो, नाटकाच्या अगोदरची रिहर्सल असे देखील म्हंटले जाते.

२) Elements of a Pilot Study in India :

भारतातीलच नव्हे तर जगभरातील बहुतांशी देशात कोणत्याही स्वरूपातील संशोधनापूर्वी “Pilot Project” बनवला जातो. जेणेकरून आपण ज्या पाथ/मार्ग वर चालणार आहोत. तो निश्चित लक्ष्य साध्य कसा करेल, यावर लक्षकेंद्रित करण्यासाठी “पायलट अभ्यास” कामास येतो. त्यासाठीचे घटक Elements पुढीलप्रमाणे आहेत…

  1. Sample size and selection (नमुना आकार आणि निवड) = आपण करत असलेला अभ्यास लोकांच्या हिताचा असेल तर त्यात लोकांच्या मतांना देखील सामावून घ्यायला हवं. म्हणूनचं लोकांनी आपल्या संशोधनावर व्यक्त केलेले मत म्हणजेच, घेतलेल्या नमुन्याचे आकार (संख्यारुपात/अर्थात सर्वेच्या माध्यमातून लोकांची जाणून घेतलेली मते ती संख्या) आणि त्यातून केलेली निवड.
  2. Determine the Criteria (निकष ठरवा) : आपल्या अभ्यासाच्या मुख्य उद्दिष्टांच्या आधारित ‘यशस्वी पायलट अभ्यासाचे’ निकष ठरवता येतात. म्हणूनच आपला पायलट अभ्यास या निर्धारित निकषांची पूर्तता कशी करेल? हे पहाणे गरजेचे आहे.
  3. Samples (नमुने) : विषयांची मांडणी करताना किंवा नमुने गोळा करतानाची प्रक्रिया पूर्ण व्यावहारिक आणि व्यवस्थापनीय असावी हे अनिवार्य आहे.
  4. Measurement Instrument (मोजण्याचे साधन) : अनुमान काढताना वापरण्याचे साधन हे अचूक असायला हवे. मग ती एक तयार केलेली प्रश्नावली असो वा इतरांनी वापरलेली पारंपारिक वापरलेल्या पद्धती असो. परंतु त्याचे उत्तर हे वास्तववादी आणि सत्यता दाखवणारेच असायला हवे.
  5. Data entry and analysis (डेटा एंट्री आणि विश्लेषण) : सर्वे अथवा इतर कोणत्याही माध्यमातून जमा केलेल्या माहितीची (डेटा) याची पडताळणी करण्यासाठी प्रस्तावित सांख्यिकीय पद्धती वापरून पहा आणि चाचणी योग्य असल्याची खात्री पटल्यावरच निष्कर्ष निर्धारित करा.
  6. Flow Chart (फ्लो चार्ट) : माहितीच्या आधारे आपण फ्लो चार्ट तयार करावा.

३) पायलट अभ्यासाची काही उदाहरणे :

 • राजकीय : कोणत्याही स्वरूपातील निवडणुकांच्या पूर्वी देशपातळीवर काम करणारे राजकीय पक्ष लोकांच्या गरजा, चालू सरकारच्या त्रुटी जाणून घेण्यासाठी जनमत चाचणी घेतात. हे देखल “पायलेट स्टडी”चाच एक भाग आहे. जेणेकरून आपण नक्की कोणत्या उद्धीष्टांनी लोकांच्या समोर जाणार आहोत आणि आपले ध्येय कसे जनतेच्या हिताचे आहे. हे लोकांना सांगण्यापूर्वी पक्ष म्हणून आपल्यालाच समजायला हवे.
 • कंपनी प्रोडक्ट : कोणतीही कंपनी एखादी वस्तू बनवण्यापूर्वी लोकांच्या भविष्यातील गरजा लक्षात घेते. जर ती गोष्ट पुढील २-४ वर्षांनी लोकांच्या गरजेचा भाग बनवणार असेल तरच कंपनी तो प्रोडक्ट बनवण्याचा विचार करते.
 • चित्रपट/सिनेमा : नाटक असो वा सिनेमा प्रेक्षकांसमोर जाण्यापूर्वी सर्व टेक्निशियन/तंत्रज्ञ आणि समिक्षांच्या सोबत त्याचा प्रीमियर शो आयोजित केला जातो जेणेकरून उपस्थित काही ठराविक लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या जातील. शिवाय कुणी काही त्रुटी दाखवल्यास त्या शक्य असल्यास त्यात सुधारणा करता येईल.
 • संशोधक : कोणत्याही स्वरूपातील मोठी कामगिरी फत्ते करण्यापूर्वी ती अचूक स्वरूपात कशी पूर्ण करता यासाठी ते नेहमी पायलेट अभ्यास करतात. इमारत बांधण्यापूर्वी तिची प्रतिकृती बनवणे हे देखील तेच आहे.
 • शैक्षणिक संशोधन : नुकतेच “नवीन शैक्षणिक धोरण २०२०” याची अमंलबजावणी झाली. ते जाहीर करण्यापूर्वी सरकारकडून अनेक वेळा वेगवेगळ्या स्वरुपात त्याची चाचपणी करण्यात आली. आणि हवे तसे परिणाम आणि त्यापूर्वी योग्य सुधार करूनच त्याची घोषणा करण्यात आली.
 • वाहन : आज कोणतेही वाहन खरेदी करावयाचे असल्यास विकत घेणारा त्याची पहिली टेस्ट ड्राईव्ह घेतो. ही देखील एक प्रकारची Poilet Study चं आहे.

म्हणजेच कोणत्याही स्वरूपातील मुख्य बाबीच्या अगोदर लोकांच्या हिताचा, खर्चाचा आणि आपल्या आपेक्षांचा जनमतातून  केलेला विचार म्हणजेच पायलट चाचणी.

४) Pilot Study in research

संशोधन प्रक्रीयेमध्ये विविध विद्याशाखा मोठ्या प्रमाणावर संशोधन करतात. अशा संशोधनांमध्ये मोठ्या प्रमाणावर नमुन्याचा समावेश केलेला असतो, त्यामुळे तो भाग थोडा वेळखाऊ आणि जास्त खर्चिक देखील असू शकतो. हे माहित करून घेण्याच्या विविध पद्धती आणि तंत्रे आहेत. मग ते वैज्ञानिक असो किंवा नसो, ती
त्यातील एखादी पद्धती संशोधन करण्यासाठी योग्य म्हणून निवडली जाते. प्रत्यक्ष संशोधनापूर्वी एक प्रायोगिक सर्वेक्षण केले जाऊन जे सम पातळीवरील क्षेत्रातील परंतु लहान नमुन्यात निवडलेल्या पद्धती आणि तंत्रांची व्यवहार्यता आणि वैधतेची तपासणी केली जाते.

"<yoastmark

असा अभ्यास करणे म्हणजे आपले संशोधन ज्या पद्धतीने ठरवले गेले आहे त्या पद्धतीने केले जाऊ शकते किंवा नाही हे शोधण्याचा त्यामागचा प्रयत्न असतो. ही मुख्य अभ्यासाच्या प्रक्रियेची प्राथमिक चाचणी असते, ज्यामुळे आपल्याला ठरवता येते की आपण उचलत असलेले पाऊल योग्य दिशेने आहे किंव्हा नाही.

५) Pilot Study in Research Methodology

 • Methodology / कार्यपद्धती : “संशोधनासाठीची ‘संदर्भित चौकट’ आहे, दृष्टीकोन, विश्वास आणि मूल्यांवर आधारित एक सुसंगत आणि तार्किक योजना. जी संशोधकांना निवडलेल्या मार्गदर्शनासाठी मार्गदर्शन करते”.
 • शोधनिबंधाच्या अभ्यासासाठी वापरलेली कार्यपद्धती वाचकाला अभ्यासक्रमाचे एकूण मूल्यमापनाचे आणि विश्वासार्हतेचे गंभीरपणे मूल्यांकन करण्याची परवानगी बहाल करते.
 • या कार्यपद्धतीचा विभाग दोन मुख्य प्रश्नांची उत्तरे देतो: डेटा कसा गोळा केला किंवा निर्माण केला गेला? आणि त्याचे विश्लेषण कसे केले गेले?
 • Qualitative and Quantitative Research : गुणात्मक आणि परिमाणात्मक संशोधन पद्धती

In Conclusion : 

पायलट स्टडीच्याच आधारे आपण मुख्य अभ्यासक्रमाचे मोठे स्वरूप मांडू शकतो. जोपर्यंत आकार लहान आहे तोपर्यंत संबधित संशोधनात हवे तसे बदल करता येतात. अनेक वेळा मांडणीचे स्वरूप बदलता येते. परंतु जर आपण Poilet Study न करता कोणत्याही अनवधानातून त्याला मोठ्या स्वरूपावर मांडण्याचा थाट घातल्यास त्याच्या परिणामांची कोणत्याही स्वरूपातील शाश्वती देता येत नाही.

www.SkynetMumbai.com

https://www.mastersfinancejobs.com/

- Advertisement -
Marathi Guidehttps://marathitrailer.com/
Has come a long way from its beginnings in Maharashtra. When Group of Marathi Trailer first started out, their passion for helping Farmers and help them to start their own business.
- Advertisment -

Most Popular

what is beat reporting / बीट रिपोर्टिंग म्हणजे काय?

what is beat reporting / बीट रिपोर्टिंग म्हणजे काय? बीट रिपोर्टिंग, यालाच विशेष अहवाल/रिपोर्ट म्हणूनही ओळखले जाते. हा पत्रकारितेचा एक महत्त्वपूर्ण प्रकार आहे. जो एका...

Best Diwali Panati Collection in Nitesh Enterprises

BEST DIWALI PANATI COLLECTION IN NITESH ENTERPRISES | दिवाळी पणती : दिवाळी म्हटलं कि आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो दिव्यांचा झगमगाट, विद्युत रोषणाई, पारंपरिक तेलांच्या...

Our Herd is your Desi Cow : आमचा गोठा तुमची गाय

Desi Cow आमचा गोठा तुमची गाय : संकल्पना अगदी साधी आणि सरळ आहे, ब-याच लोकांच्या मनात एक सुप्त इच्छा असते की, आपलंही एक शेत...

Recent Comments

Related eBooks