SEO : एसईओ म्हणजे “सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन”. सोप्या भाषेत याचा अर्थ असा आहे की, “आपण जे शोधत आहोत त्या संबंधित वेबसाइटची (व्यवसायाची) स्पष्टता  वाढवून त्या साईटवर “वाचकांची”/ग्राहकांची सख्या वाढवण्याच्या दृष्टीकोनातून केलेली प्रक्रिया म्हणजे SEO होय”. या संपूर्ण प्रक्रियेसाठी कोणत्याही स्वरूपातील “कॅम्पेन” न करता नैसर्गिक पद्धतीने मिळवलेले ग्राहक हेच आपलं उद्धिष्ट असायला हवं, यालाच ऑर्गनिक शोध प्रक्रिया (organic search results) म्हणतात. उदाहरणार्थ जर आपल्याला काहीही हवं असल्यास, ते आपण कुठे शोधतो? तर जिथे सापडण्याची शक्यता जास्त असेल तेथे. त्या सापडण्याच्या ठिकाणाला “सर्च इंजिन” (मिळण्याची जागा) असे म्हणतात.

आज संपूर्ण जग हे माहितीच्या स्वरूपात हवी असणारी कोणतीही बाब ही इंटरनेटवर शोधण्याचा प्रयत्न करत असतात. मग ते एखादे पुस्तक असो, खेळाची माहिती, गाडीने पोचण्याचे ठिकाण वा कुठल्याही स्वरूपातील खरेदी. जे हवं ते मिळण्याची ठिकाणे कदाचित वेगेवेगळी असू शकतात परंतु त्यांच्या संदर्भातील मुलभूत (ग्राहकांच्या गरजेपुरती) माहिती मिळण्याचे ठिकाण एकच असते सर्च इंजिन. संपूर्ण जगामध्ये “गुगल”ला सर्वोत्तम सर्च इंजिन म्हणतात. म्हणून माहिती स्वरूपातील कुठल्याही बाबीचा शोध घेण्यासाठी आपण ज्या शब्दांचा/अक्षरांचा (words) वापर करतो त्यालाच “keywordsकीवर्ड्स असे म्हणतात. म्हणूनच योग्य Keywords चा वापर सर्च इंजिन मध्ये केल्यास त्याचे परिणाम (outputs) देखील चांगलेच येतात.

seo full form : ( एस. ई. ओ .) SEO म्हणजे काय ? (Search Engine Optimization – शोध इंजिन ऑप्टिमायझेशन)

Google SEO कसे कार्य करते?

सध्या जमाना डिजिटलचा कोणतीही गोष्ट हाताला कशी लागते यापेक्षा ती डोळ्यांना कशी दिसते यावर तिची किंमत ठरली जाते. कोणत्याही बाजारपेठेत वस्तू तीच जास्त विकली जाते. जी प्रथमदर्शी खूप सुंदर दिसते. यातर तिची जोरात जाहिरात केली जाते. जी वस्तू खूप सुंदर दिसते, तिला सुंदर दिसण्यासाठी त्या विक्रेत्याने काय काय केलं असेल. तर त्याने त्या वस्तू इतरांपेक्षा जास्त चांगलं सांभाळलं असेल, तिला स्वच्छ केलं असेल, वेळप्रसंगी ती चकचकीत दिसावी म्हणून तिला काही विशिष्ट द्रावणाने धुतलही असेल. का तर या वस्तूच्या प्रदर्शनावरच आतल्या वस्तूंचा खप होऊ शकतो. अर्थात प्रदर्शनाला मांडलेली वस्तू आकर्षक आणि सहज दिसता यायला हवी अशाच मोक्याच्या जागी ठेवली जाते. हेच ते पारंपारिक मार्केटमधील SEO.

seo services आणि डिजिटल मार्केटिंग

आता डिजिटल मार्केटमध्ये लोकं बाजारात न जाता वस्तू गुगलवर शोधतात. शोधताना त्यांना जे प्रश्न पडतात तेच ते सर्च इंजिनमध्ये टाईप करतात. भले त्यांच्या दृष्टीने ते प्रश्न असतात परंतु डिजिटल मार्केटच्या दृष्टीने त्यालाच कीवर्ड (महत्त्वपूर्ण शब्द) म्हणतात. मग त्याच शब्दांच्या जवळ जाणारे सगळे पर्यार त्या वापरकर्त्या समोर दिसू लागतात. त्यातून त्याला काय हवं हे तो समोर दिसणा-या पर्यायांच्या “शीर्षक/टायटल” आणि त्याखाली थोडक्यात दिसणा-या माहितीवरून (मेटा डिस्क्रीप्शन) ठरवतो आणि त्या वेबसाईटच्या लिंकवर क्लिक करतो. हा झाला टार्गेट वापरकर्त्याचा आणि SEO वापरून पेज बनवणा-याचाही. अशा प्रकारे उपलब्ध असणा-या माहितीचा उपयोग वापरकर्त्या झाला तर ग्राहक त्याला हवी असणारी माहिती शोधण्यासाठी बनवणा-याच्या वेबसाईटवर आला. म्हणूनच यात तिघांचाही फायदा होतो. मिळालेल्या माहितीमुळे वस्तू ग्राहकाने विकत घेतली, विक्रेत्याची वस्तू विकली गेली, जर वेबसाईट बनवणा-याने आपल्या वेबसाईट “Affiliate”(संलग्न) मार्केटिंगची सुविधा घेतली असल्यास त्याला “कमिशन”स्वरुपात आर्थिक लाभ मिळू शकतो. नाही तरी त्याच्या वेबसाईटवर ग्राहक वाढल्याचा आनंद.

what is seo, seo full form, on page seo, off page seo, seo course, seo meaning, seo services, seo tutorial, seo tools, google seo, seo company,
SEOhttps://marathitrailer.com/seo/

आता लक्षात घ्या त्या वापरकर्त्यासमोर जे दिसतात तेव्हढेच पर्याय असतात का? नाही. फक्त पहिले दहा पर्याय पहिल्या पानावर आणि उरलेले सर्व त्यापुढील पानावर असतात. परंतु ९० युजर्स (वापरकर्ते) दुस-या पानावर जाताच नाहीत. कधी कधी तर ते पहिल्या पानावरील ८-९-१० या पर्यायांपर्यंत देखील पोहचत नाही. म्हणून वेबसाईट बनवणारे, ब्लॉग लिहिणारे, प्रोडक्ट्सची माहिती सांगणारे पहिल्या पानावर त्यातही पहिल्या पाचह्या वर येण्याचे प्रयत्न करत असतात. यासाठी त्यांना Search Engine Optimization (SEO) ची मदत घ्यावी लागते.

1.       SEO चे फायदे (Benefits of SEO) :

  • आपण आपल्या वेबसाईटला Google च्या First Page च्या First Position ला आणू शकतो. 
  • SEO आपल्या वेबसाईटची Quality वाढवण्यासाठी मदत करते.
  • वेबसाईटवर Organic Traffic वाढवण्यासाठी खूप उपयोगी ठरते. 
  • जास्त traffic वेबसाईटवर आल्यास जास्त विक्री होऊ शकते. 

2.      SEO चे प्रकार ( Types Of SEO) :

  1. ऑन पेज – एस. इ. ओ (on page seo)
  2. ऑफ पेज – एस. इ. ओ (off page seo)

सर्च इंजिन म्हणून विचार करता जगभरात सर्वाधिक वापरलेल्या वेब साईट म्हणजे Google, Baidu, Bing

शोध इंजिनमार्केटमधील शेअर
Google81.71%
Baidu8.46%
Bing5.13%
Yahoo!3.49%
यांडेक्स0.56%
विचारा0.19%
डक डकगो0.17%
नाव्हर0.10%
कुत्री0.07%
एओएल0.03%
https://marathitrailer.com/seo/

जागतिक पातळीवर गूगल वापरलेले जाते. Google द्वारे लागू केलेले अल्गोरिदम सर्वोत्तम आहेत. गुगल आणि बिंगचा वापर जागतिक पातळीवर आहे. तर बाईडू आणि यांडेक्सचा “प्रांतीय पातळीवर” अर्थात काही ठराविक देशातच वापरले जातात.उदा. चीनी लोक सर्च इंजिन म्हणून “बाडू”, तर रशियन लोक “यांडेक्स” वापरतात.

In Conclusion : निष्कर्ष

SEO चा आजच्या जगात प्रत्येकाला काही ना काही फायदा होत असतो. फक्त त्यासाठी त्याने इंटरनेट असलेला स्मार्टफोन वापरायला हवा. कारण आज प्रत्येकाला कशाची ना काशीची तरी गरज ही असते आणि ती पूर्ण करण्यापूर्वी त्याची माहिती जाणून घेण्याची उत्कंठा सगळ्यांनाच असते. म्हणून ज्याला चांगले सर्च इंजिन वापरता येते त्याची गरज सर्वानाच असते.

https://marathitrailer.com/create-twitter-account-मैत्री-ट्विटरशी/