Home Blog what is beat reporting / बीट रिपोर्टिंग म्हणजे काय?

what is beat reporting / बीट रिपोर्टिंग म्हणजे काय?

- Advertisement -

what is beat reporting / बीट रिपोर्टिंग म्हणजे कायबीट रिपोर्टिंग, यालाच विशेष अहवाल/रिपोर्ट म्हणूनही ओळखले जाते. हा पत्रकारितेचा एक महत्त्वपूर्ण प्रकार आहे. जो एका विशिष्ट मुद्द्यावर, क्षेत्रावर, संस्थेवर किंवा कालांतराने संस्थेच्या कामकाजावर केंद्रित असतो. उदाहरणार्थ,

 • क्रीडा पत्रकार बास्केटबॉल, फुटबॉल इत्यादी खेळांच्या प्रकारानुसार विभागले जाऊ शकतात.
 • सौंदर्य पत्रकारांना मेकअप, केस उत्पादने, स्किनकेअर आणि फॅशनने विभागले जाऊ शकते.
 • विशिष्ट स्थानाबद्दल माहिती असणा-यांसाठी जागतिक बातम्यांचे पत्रकार, देश किंवा शहरांद्वारे विभागले जाऊ शकतात.

 

why it is necessary / बीट रिपोर्टरचे महत्त्व काय आहे?

विशिष्ट घटनेवर भाष्य करण्यापूर्वी त्या संदर्भातील सर्व धागेदोरे यांची नीटशी पडताळणी करून, योग्य निष्कर्षाअंती लिहिलेली कथा/गोष्ट/कहाणी/बातमी म्हणजे बीट. यामुळे अशा बीट गोळा करण्यासाठी अनुभवी पत्रकारांची गरज लागते. कारण त्यांना माहित असते की सदर घटने संदर्भातील आवश्यक माहिती नक्की कुठे आणि कशी मिळवायची ते. संबंधित स्त्रोतांशी त्यांच्या दीर्घकालीन विश्वासाच्या संबंधांमुळे, बीट रिपोर्टर विशेष, विश्वासार्ह आणि बातमीयोग्य माहिती मिळवतात.

types of beat reporting :पत्रकारितेत बीट्सचे रिपोर्टिंगचे 6 महत्त्वाचे प्रकार…

१) राजकीय रिपोर्टिंग

 • राजकीय पत्रकारिता ही पत्रकारितेची एक अतिशय विपुल आणि व्यापक शाखा आहे. या बीटमध्ये राजकारण आणि त्याच्या राज्यशास्त्राच्या सर्व पैलूंचा समावेश आहे. बरेच लोक या प्रकारच्या पत्रकारितेची निवड करतात, त्यासाठी खूप धैर्य आणि मुत्सद्दी हुशारीची आवश्यकता असते. जरी हा शब्द सामान्यतः नागरी सरकार आणि राजकीय शक्तीच्या कव्हरेजला संदर्भित करत असला तरी यात धोखा अधिक असतो. कारण यात सदर पत्रकार संबधित शासनकर्ते अथवा विरोधक यांच्या संदर्भात लिखा करत असतो.

२) खाद्य पदार्थ / अन्न

 • अन्न पुरवठा हा एक प्रकारचा उद्योग आहे जो कधीही बंद पडू शकत नाही. खाद्यप्रेमी नेहमी त्यांच्या जवळील भागात नाव-नवीन खाद्यपदार्थांच्या शोधात असतात. या क्षेत्रातील बीट रिपोर्टरचे काम करताना स्थानिक रेस्टॉरंटची खास बात काय आहे. त्यांनी नक्की कशात महिरात मिळवलेली आहे. ठिकठिकाणच्या खाऊ गल्ली शोधणे तेथील पदार्थ प्रत्यक्ष चाखून त्यांची माहिती उघड करणे. यात हॉटेल मालक अथवा ठेला चालक आपल्या पदार्थांच्या जाहिरातीच्या हिशोबाने रिपोर्टरशी जोडले जातात.
  उदाहरणार्थ CST जवळील खाऊ गल्ली, मुच्छड पानवाला, भांडुपचा भाऊचा वडापाव, मुंबई सेन्ट्रलची सरदारची पावभाजी, मामलेदाराची मिसळ, कल्याणचा लोणी डोसावाला इ.

३) शैक्षणिक बीट रिपोर्टिंग

 • हा नव्यानेच प्रकार उदयास आला असला तरी याचे क्षेत्र आता खूपच विस्तारलेले आहे. त्यामुळे आजकाल अनेक पत्रकार तरुण पिढीच्या लोकांवर/विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करत असतात. त्यात त्यांच्या आवडी-निवडी, शैक्षणिक कथा कव्हर, परीक्षेचे गुण, कॅम्पस कथा आणि क्रीडा/खेळ यांचा समावेश असतो. विशेषकरून कॉलेज कॅम्पसमध्ये भारावले जाणारे मोहत्सव हे निरनिराळ्या बीट्सची मेजवानीच असते. याच बरोबर हे पत्रकार महाविद्यालयातील विद्यार्थी किंवा कमी वेतनावर काम करणारे शिक्षकांच्या सुरक्षिततेचे नियम यावर देखील भाष्य करू शकतात. उदाहरणार्थ, आज आपल्या देशात सर्वच परीक्षांचे निकाल निकाल, प्रवेश परीक्षांच्या तारखा यासारख्या सर्वच बाबी वर्तमानपत्रातुन सांगितल्या जात आहेत.

४) आरोग्य अहवाल

 • आजकाल आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोरोनाच्या काळात सर्व मानव जातीने आरोग्याला विशेष प्राधान्य दिले आहे. पूर्वीच्या रिपोर्टिंगमध्ये कुपोषण, विविध रोग, आरोग्यसेवा, बालरोग काळजी, पोषणआहार, शारीरिक फिटनेस, वाढती महामारी यांसारख्या गोष्टींवर लक्ष केंद्रित जात होते. त्यात आता रोगप्रतिकार शक्ती, ती वाढवण्याची साधने यांचा देखील मोठ्या प्रमाणात समावेश केला गेला आहे. यात बीट्स रिपोर्टर म्हणून काम करण्यासाठी प्रामुख्याने गंभीर आजार किंवा त्यांच्यावरील रोगाच्या प्रतिबंधावर लसी यावर लक्ष केंद्रित करून त्या क्षेत्राबद्दल उत्तम ज्ञान असणे मिळवणे गरजेचे बनले आहे.

५) क्रीडा अहवाल

 • हे रिपोर्टिंग प्रेक्षकांसाठी छान आणि आरामशीर वाटत असले तरी खेळाच्या जाणकार आणि अजाणते या सर्व प्रकारच्या प्रेक्षकांना माहिती देण्यासाठी रिपोर्टरला किती मेहनत घ्यावी लागते, याची त्यांना कल्पना नसते. या रिपोर्टरला त्याला ज्यावर बीट्स तयार करायचे आहे उदा. हॉकी, फुटबॉल तसेच क्रिकेट यातील चालू घडामोडी, भूतकाळ, येणारे कालखंड आणि त्याची गरज याबद्दल माहिती असावीच लागते.
  उदा. महेद्रसिंग धोणी भारतात संघात परत येईल हे गेल्या वर्षी एका पत्रकाराने त्याच्या लेखात लिहिले होते. त्यावेळी त्याची खिल्ली उडवली गेली परंतु आज भारतीय संघाचा मेंटोर /मार्गदर्शक खरच भारतीय T20 संघाचा सहकारी आहे. यालाच अंदाज वर्तवणे म्हणतात. हा त्यासाठी त्या खेळाडूची मानसिकता जाणणे देखील गरजेचे असते. क्रिकेटचा देव म्हणून ओळख असणारा सचिन तेंडूलकर चांगला कोच होऊ शकत नाही परंतु आपल्या सभ्य खेळाने सगळ्यांना अचंबित करणारा राहुल द्रविड भारतीय संघाचा कोच बनू शकतो. हे २०११ मध्ये एका पत्रकाराने लिहिले होते आणि आज खर होताना दिसत आहे.

६) मनोरंजन

 • हे एक प्रसिद्ध रिपोर्टिंग प्रकार आहे. याठिकाणी पत्रकार जगातील सेलीब्रेटी लोकां बद्दलच्या रसाळ गपशप प्रकट करण्याचा प्रयत्न करतो. पण हे सोपे काम नाही. सेलिब्रिटींच्या एका लूकसाठी रिपोर्टरला तासनतास वाट पाहावी लागते. मनोरंजन अहवाल मुलाखती, संगीत आणि चित्रपटांचे पुनरावलोकने आणि बरेच काही सामावलेले असते. शिवाय लोकांना या सेलेब्रिटी लोकांच्या वैयक्तिक जीवनात जास्त रस असतो. म्हणून फक्त त्यांची लफडी, किंवा वाईट सवयी यांनाच न दाखवता त्यांच्यातील एका चांगल्या माणसाचा चेहरा देखील जगाला दाखवावा लागतो.
  उदा. MEE 2 (मीटू) च्या प्रकरणात अडकलेले नाना पाटेकर यांनी “नाम फाउंडेशन” च्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कामे केली आहेत. Jackie Chan / जॅकी चॅन

 

- Advertisement -
Marathi Guidehttps://marathitrailer.com/
Has come a long way from its beginnings in Maharashtra. When Group of Marathi Trailer first started out, their passion for helping Farmers and help them to start their own business.
- Advertisment -

Most Popular

Recent Comments