Reimbursement = रिअम्बर्समेंट/ काही कारणास्तव इतरांच्या कामासाठी त्यांच्या सांगण्यावरून खर्च केलेला पैसा भरपाई म्हणून परत मिळवणे यालाच रिअम्बर्समेंट अथवा प्रतिपूर्ती म्हणतात.
What is a Reimbursement Claim?
यात एखादी कंपनी आपल्या कर्मचा-याला त्याच्या कामासाठी प्रथम खर्च करायला सांगते. त्यात कंपनीचा व्यावसायिक खर्च असेल, प्रवास खर्च, विमा, बाहेरील प्रवासातील खाणेपिणे, राहाणे या सर्वांवर केलेल्या खर्चाला बिलासाहित सादर करावे लागते. खर्च केलेली प्रत्येक बाब ही गरजेची होती हे मान्य झाल्यावरच झालेल्या सर्व खर्चाची परतफेड/ रिअम्बर्समेंट केली जाते. यालाच Reimbursement Claim देखील म्हणतात.
What is Reimbursement in Insurance?
खाजगी आरोग्य विमा कंपन्या किंवा राज्य सरकार (सीएमएस, व्हीए, इ.) हे आपल्या ग्राहकांच्या आरोग्याविषयी काही प्रमाणात तरतुदी करतात. जसे की आपल्या कामगार किंव्हा त्याच्या घरातील कुणी आजारी पडल्यास त्या कर्मचा-यावर अचानक खर्चाचा ताण येतो आणि त्याचे मानसिक व आर्थिक संतुलन ठासळते. तसे होऊ नये म्हणून या कंपन्या (खाजगी किंव्हा सरकारी) आपल्या कर्मचा-यांच्या पगारातून काही रक्कम कापून त्याचा “ग्रुप विमा” करतात. जेंव्हा केंव्हा असाएखादा प्रसंग एखाद्या कर्माचा-यांच्या आयुष्यात येतो. तेंव्हा त्याच्याकडे दोन प्रकारचे सुरक्षा कवच असते. एक म्हणजे पहिली रुग्णालयाची बिले भरायची आणि नंतर तेच खर्च केलेले पैसे कंपनीकडून (विमा कंपनी) परत मिळवायचे. तर दुसरा मार्ग म्हणजे एका ठराविक रकमेपर्यंत होणारा पैसा रुग्णालय पेशंट घेण्याऐवजी सरळ विमा कंपनीकडून वसूल करतात. उदाहरणार्थ एखाद्या रूग्णा अगदी घाईघाईने जरी चांगल्या रुग्णालयात दाखल केले आणि पैसे नसतील तरी फक्त विम्याच्या आधारावर त्याला भरती करून त्यावर उपचार केले जातात. यालाच विम्याची परतफेड/Reimbursement म्हणतात.
what is reimbursement in law
- भारतीय करार कायदा, 1872 मधील कलम 73 [संपूर्ण कायदा] भरपाई.
- आयकर कायदा, 1995 मधील कलम 17 [संपूर्ण कायदा] घराचे भाडे मूल्य म्हणून घेतले जाते.
- केंद्रीय विक्री कर अधिनियम, 1956 मधील कलम 15 [संपूर्ण कायदा] दोन राज्यात विक्री करणा-या विक्रेत्यांसाठी
- दिल्ली विकास प्राधिकरण विरुद्ध कर्णधार बांधकाम कंपनी (पी)6 मे, 1996. जागा/बिल्डींग मधील घर खरेदी करण्यासाठी रक्कम दिल्यावर जर ती वस्तू वेळेत हस्तांतरित करणे. नाही तर ग्राहकाला त्याने दिलेली रक्कम ठराविक व्याजासहित परत घेण्याचा अधिकार आहे. अजून ही बरेच कायदे आहेत.
Best Short Stories Book – Vyathanmagachya Katha – व्यथांमागच्या कथा –
what is Reimbursement in Healthcare? आरोग्यसेवा मध्ये प्रतिपूर्ती काय आहे?
आरोग्य विम्यासाठी प्रतिपूर्तीचा दावा केला जाऊ शकतो. जर पॉलिसीधारक आजारी असल्यास त्याच्या/ तिच्या पसंतीच्या रुग्णालयात जाण्याचा पर्याय निवडतो. जर ते नॉन-एम्पेनल्ड (त्याच्याशी सलग्न नसलेले) हॉस्पिटल आहे. अशावेळी विमाधारकाला त्याच्या सर्व वैद्यकीय बिले आणि रुग्णालयातील सर्व खर्च भरावे लागतात. आणि नंतर प्रतिपूर्तीसाठी दावा करावा लागतो. यालाच आरोग्यसेवा मध्ये प्रतिपूर्ती म्हणतात.
https://www.mastersfinancejobs.com/