Home Uncategorized Social Media : एका उज्ज्वल भविष्याची नांदी....

Social Media : एका उज्ज्वल भविष्याची नांदी….

- Advertisement -

Social Media : सोशल मीडिया म्हणजे लोकांमधील परस्परसंवादाचे आभासी माध्यम, ज्यामध्ये लोकं आपल्या कल्पना, आपल्याकडील माहिती यांची एकमेकांशी देवाणघेवाण करतात. यासाठी मुख्यतो ते फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, लिंक्डइन, यूट्यूब, कु, स्नॅपचॅट आणि ब्लॉग यांचा सुनियोजित वापर करतात. याच सोशल मिडीयाच्या वापराने दुनिया खूप जवळ आल्या सारखी वाटते. आज मास मिडीयाच्या अभ्यासक्रमामध्ये सोशल मिडीयाचा शिरकाव झाल्याने, शिक्षणाबरोबरच रोजगाराचे देखील वेगळे पर्याय निर्माण झाले आहेत.

सोशल मिडीयाचा वापर : what is social media?

social media marketing, what is social media, social media logo, social media platforms, social media post

आजच्या अलम दुनियेत सामान्यपणे सोशल मीडियाचा वापर हा दुरावलेल्या व्यक्ती, मित्र, विस्तारित कुटुंब (कामानिमित्त दूरदेशी रहाणारी)  यांच्याशी संपर्क साधण्याच्या दृष्टीकोनातून केला जातो. काही लोक इतरांशी संपर्क वाढवण्यासाठी आणि करियरच्या संधी शोधण्यासाठी देखील याचा प्रभावी वापर करत आहेत. तर काही जगातील समविचारी, सारखी रुचि असणा-या लोकांशी संपर्क साधून एकमेकांचे विचार, भावना आणि आंतरिक व्यक्तिमत्त्व जाणून घेण्यासाठी देखील या सोशल मीडियाच्या विविध पर्यायांचा वापर करतात. जे आपण रोज करतो तेच व्यवसायिक दृष्टीकोनातून केले तर त्यातून सहज रोजगार निर्माण होऊ शकतो. असंच सोशल मिडीया हे एक प्रभावी साधन ठरत आहे.  

सोशल मीडिया परिणाम

सोशल मीडिया चांगले आणि वाईट असे दोन्हीही परिमाण वापरकर्त्यांवर पडताना दिसतात. इतर माध्यमांच्या तुलनेने हे नवीन तंत्रज्ञान असल्याने, सोशल मीडिया वापराचे दीर्घकालीन, चांगले किंवा वाईट परिणाम असे निश्चित अनुमान अजून तरी निघालेले नाही. तरीही सोशल मीडियाच्या अतिवापराने नैराश्य, चिंता, एकटेपणा याची शिकार काही लोक ठरत आहेत. याच्याच दुष्परिणामातून वापरकर्ता कधीकधी स्वत:ला इजा पोहचवून घेणे किंवा आत्महत्येसारख्या विचारांत गुंतून, कदाचित काही अघटीत देखील करण्याचा संभव असतो.

तरीही आज लोकं मोठ्या प्रमाणात या सोशल मिडीयाच्या जाळ्यात गुंतलेले आहेत. तरीही आपण जेंव्हा मास मिडीयाचे शिक्षण घेतो, तेंव्हा आपल्याला या यातील दुर्लक्षित संधी देखील दिसू लागतात. लक्षात घ्या, संधी कधीही दैप्यमान प्रकाशात चालून येत नाहीत तर त्या नेहमीच अंधारलेल्या वाटेवर आपली वाट पाहत दडलेल्या असतात. परंतु ब-याचदा आपण नियमित पायवाट सोडून जातच नसल्याने, त्या दडलेल्या संधी सामान्य लोकांना कधी दिसत नाही. आज आपण याच “मास मिडीयाचा” एक हिस्सा असलेल्या सोशल मिडीयातील संधी पाहू.

बारावी नंतर काय?

सोशल मीडियाचा व्यवसायीक अवजार म्हणून वापरण्याचा ट्रेन्ड हा अलीकडेच विकसित झाला आहे. म्हणून, अशा व्यवसायात गरजवंत लोकांना निवडणे आज थोडेशे अवघड असले तरी अशक्य मात्र नक्कीच नाही. आपल्याकडे सामान्य मार्केटिंगची पार्श्वभूमी, थोडंसं कौशल्य आणि सोशल मीडिया नेमका वापर करण्याची क्षमता असेल, तर मोठ-मोठ्या कंपन्या आपली निवड एका अनोख्या भूमिकेसाठी करू शकतात. 

सोशल मीडियातील संभाव्य पदे : social media post

 • कंटेंट रायटर,
 • Content डिझायनर,
 • कंटेंट मॅनेजर,
 • सोशल मिडीया स्पेशालिस्ट,
 • डिजिटल मिडिया सुपरवायझर,
 • सोशल मीडिया विश्लेषक,
 • ऑनलाइन कम्युनिटी मॅनेजर,
 • पब्लिक रिलेशन मॅनेजर,
 • डिजिटल मार्केटिंग मॅनेजर,
 • ब्रँड मॅनेजर,
 • सोशल मीडिया स्ट्रॅटेजिस्ट,
 • सोशल मीडिया मार्केटिंग मॅनेजर

Social Media : सोशल मीडियामध्ये करिअर करण्यासाठी खालील सहा टिप्स नेहमी लक्षात ठेवा

 1. आपल्या करिअरची निवड :  सोशल मीडियाची निवड करिअर म्हणून केली करणार असाल तर यातील कारकीर्द एक स्वतंत्र, अनियंत्रित आणि कधीही बदलणारे क्षेत्र आहे, याची जाणीव ठेवा. त्यामुळे व्यवसायात यशस्वी होण्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाच्या बदलणा-या ट्रेंडनुसार अद्ययावत रहावे लागेल. हेच यातील चॅलेंज आहे.
 2. स्वत:ला सुशिक्षित करा : येथे टिकण्यासाठी शैक्षणिक शिक्षणाबरोबर एखादे कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देखील घ्यावे लागते. त्याचप्रमाणे सोशल मीडियावरील सेमिनार्सनां नियमित हजेरी लावावी लागते जेणेकरून, नवीन तंत्रज्ञान शिकता येते. शिवाय संधी मिळाल्यास लोकांसमोरील आपल्यातील कलागुणांना सादरीकरण करण्याची संधी देखील मिळते. उज्ज्वल भविष्यासाठी “आपल्या कला-गुणांचे सादरीकरण” हीच  एक सर्वात प्रभावी बाब ठरते.   
 3. करत असलेल्या कामातून शिका : आपण नियमाने करत असलेल्या कामात कौशल्यानुसार बदल करत चला. शिवाय कामातील खाचखळगे जाणून घेऊन इतरांना शिकवण्याचा प्रयत्न करा. कारण त्यांच्याच प्रश्नातून आपल्याला नव-नवीन गोष्टींचा शोध लागेल आणि त्याचे शंकाचे निरासन करण्यासाठी शोधून शिकण्याच्या कलेत वाढ होईल.      
 4. कामाचे प्रदर्शन करा : आपण करत असलेले कामाचे अपडेट नियमिपणे आपल्या सोशल मिडीयाच्या विविध मंचावर मांडत जा. ज्यामुळे लिखाणाची आणि सादरीकरणाची सवय जडेल. त्याच बरोबर सोशल मिडीयावर आपल्या नावाला एक वलयही प्राप्त होत असते.
 5. आपला वैयक्तिक ब्रँड तयार करा : कामातून सिद्ध झालेले वलय नेहमीच एका ‘ब्रँड’मध्ये परावर्तीत होत असते, म्हणून सिद्ध करा. याचाच अर्थ सोशल मीडियातील कोणत्याही एका प्लॅटफॉर्मवर वर्चस्व मिळावा. जेणेकरून त्या मोनोपॉलीतूनच आपण आपला रोजगार निर्माण करू शकतो.        
 6. आपले नेटवर्क वाढवा : आपले नेटवर्क वाढवण्याचा सर्वात सोपा पर्याय म्हणजे फेसबुकच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचणे. शिवाय निरनिरळ्या सेमिनार्सला हजेरी लावणे, जेणेकरून नवीन ओळखी बनत राहतात. आपली आवड आणि गरज लक्षात घेऊन काही ग्रुप जोडा जेणेकरून आपले विचार मांडण्यासाठी एक व्यवसायिक मंच देखील उपलब्ध होईल आणि एक्स्पर्ट लोकांचे विचार देखील जाणून घेता येईल.

In Conclusion : निष्कर्ष

सोशल मीडियामध्ये करिअरची सुरूवात करण्यासाठी वरील महत्वाच्या पाय-या आहेत. सोशल मीडिया करिअरसाठी सोशल मिडीयाचा सुनिश्चित वापर आणि त्यातील बदलते ट्रेंड आत्मसाद करणे हाच सर्वोत्तम पर्याय आहे. आजकाल, बहुतेक सर्वच कंपन्या त्यांचे मार्केटींग बजेट आखताना सोशल मीडिया मार्केटिंगचा सुद्धा गांभीर्याने विचार करतात. त्याचमुळे येथे करिअरच्या अधिक संधी आहेत. शिवाय आपल्याकडील कला आणि कौशल्यापुढे व्यवसायिक बोली-भाषा दुय्यम बनत असल्याने, इंग्रजीचा बागलबुवा नगण्य बनून जातो.

प्रा.भानुदास पानमंद (७५०६९१७७८९)

(लेखक मास मिडियाचे प्राध्यापक आहेत)      

- Advertisement -
Marathi Guidehttps://marathitrailer.com/
Has come a long way from its beginnings in Maharashtra. When Group of Marathi Trailer first started out, their passion for helping Farmers and help them to start their own business.
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Related eBooks