PVC Aadhaar Card : पोस्टाने आलेलं आधार कार्ड असो. इंटरनेटवरून काढलेलं ई-आधार .अथवा मोबाईलवरून डाऊनलोड केलं गेलेले एम-आधार. या प्रत्येकाला टिकावूपणाची एक काळमर्यादा आहे. आज प्रत्येक सरकारी योजनेत स्वत:ची ओळख सिद्ध करण्यासाठी फक्त “आधार कार्डच” स्वीकारले जाते. त्यावेळी आपल्याकडे असणारे आधार ओरिजिनल असेलच का? याबाबत नेहमीच शंका घेतल्या जातात..

कारण कदाचित ते थोडंसं खराब झालेले असेल, त्याची प्रिंट चांगली निघाली नसेल किंवा फोटो काळपट दिसत असेल. या सगळ्या नैसर्गिक बाबी असल्या तरी त्याचा फटका वापरकर्त्यालाच बसतो. याचाच विचार करून UIDAI ने पहिल्यांदाच वर्षानुवर्ष टिकणारे आणि सहज हाताळता येणारे प्लास्टिक आधार कार्ड बनवले आहे. हे आपल्या खिश्यातील पॅन-कार्ड किव्हा आताचे नवीन ड्रायव्हिंग लायसन्स सारखेच दिसते. शिवाय पॉकेट मध्ये सहजगत्या सामावणारे आहे. शिवाय यात बारकोड सिस्टम असल्याने त्याची सत्यता आपण कुठेही तपासू शकतो. अगदी आपल्या मोबाईल मधील बारकोड रीडरने देखील.

आधार पीव्हीसी कार्ड यूआयडीएआयने सुरू केलेल्या आधारचे नवीन सर्वोत्तम प्रकार आहे. प्रवासात आपण याला सहज बरोबर ठेवू शकतो. या पीव्हीसी-आधारित आधार कार्डावर अनेक सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत. आधारकार्ड धारकाचा फोटो आणि डेमोग्राफिक तपशीलांसह डिजिटल स्वाक्षरी केलेला सुरक्षित क्यूआर कोड आहे.

print pvc aadhaar card online, janadhar pvc aadhaar card, janaadhaar pvc aadhaar card, pvc aadhaar card online order, pvc aadhaar card online,
https://marathitrailer.com/pvc-aadhaar-card

आधार स्मार्ट कार्डचा उपयोग काय आहे?

सामान्य कागदावर किंवा एमए-आधारवर छापलेले आधार कार्ड किंवा डाउनलोड केलेले आधार कार्ड. या सर्व प्रकारच्या आधारपेक्षा हे PVC आधार कार्ड वापरासाठी सुलभ आहे. जर एखाद्या व्यक्तीकडे पोस्टाने आलेले आधार कार्ड असेल तर तो त्याचे आधार कार्ड लॅमिनेटेड करून घेऊ शकतो. अशा प्रकारेलॅमिनेटेड आधार देखील खूप दिवस टिकते परंतु त्याची झेरॉक्स काढता येत नाही. किंवा मोबाईल मध्ये डाऊनलोड केलेले एम-आधार देखील मोबाईल सोबतच राहते.परंतु वरील दोघांनाही काही मर्यादा आहेत. कागदी आधार सारखे हाताळल्यास खराब होऊ शकते. तर एम-आधार दाखवण्यासाठी किंवा त्याची सत्यता पडताळण्यासाठी, वापरकर्त्याच्या मोबाईलमध्ये इंटरनेटची सुविधेची आवश्यकता असते. परंतु PVC कार्ड वापरताना आपल्याला या दोन्ही समस्यांचा सामना करावा लागत नाही. म्हणजे PVC कार्ड भिजलं म्हणून खराब होत नाही तर ज्याला तपासणी करायची आहे त्याच्या मोबाईलमध्ये इंटरनेट सुविधा लागते. आपल्या मोबाईलचा काही वापरच नसतो.    

pvc aadhaar card online कसे मागवावे?

ज्या प्रमाणे आपण आधार कार्ड डाऊनलोड करतो अथवा आधार रि-प्रिंट सहजगत्या मागवतो. अगदी त्याच स्वरूपात आपण याची देखील ऑर्डर UIDAI च्या पोर्टलवर देऊ शकतो. त्यासाठी आपण आधार क्रमांक, व्हर्च्युअल आयडी किंवा नावनोंदणी आयडी वापरुन ऑर्डर करू शकतो. या संपूर्ण प्रक्रियेची फी फक्त 50 रुपये आहे. आपण ऑर्डर केल्यानंतर पुढच्या ५-७ दिवसात हे आधार पीव्हीसी कार्ड स्पीड पोस्टद्वारे रहिवाशाच्या पत्त्यावर येते. (सध्या कोरोनाच्या काळात थोडा फार उशीर होऊ शकतो).

In Conclusion / निष्कर्ष 

 आधार पीव्हीसी कार्ड यूआयडीएआयने सुरू केलेल्या आधारचे नवीन प्रकार आहे.   टिकाऊ आणि वापरास अगदी सोपे शिवाय पीव्हीसी-आधारित आधार कार्ड विशेष   वैशिष्ट्येपूर्ण आहे. त्यावर सुरक्षा वैशिष्ट्यांसह फोटो आणि डेमोग्राफिक तपशीलांसह   डिजिटल स्वाक्षरी केलेला सुरक्षित क्यूआर कोड देखील आहे.

ई-आधार डाऊनलोड कसे करावे?

आधार पीव्हीसी कार्डसंदर्भातील ही संपूर्ण माहिती तुम्हांला कशी वाटली. यासाठी “Comment” बॉक्स मध्ये तुमचा अभिप्राय जरूर द्या. तसेच कोणत्याही सरकारी योजनेच्या संदर्भात माहिती असल्यास ती देखील निसंकोच विचारा…!