PM Kisan Samman Yojana : भारत शेतीप्रधान देश असून, भारताची संपूर्ण अर्थव्यवस्था हे शेतीच्या एकूण उत्पन्नावर अवलंबून असते. बळीराजाच्या याच कष्टाची कृतज्ञता म्हणून “pm kisan samman yojana” अंतर्गत अल्प भूधारक शेतक-यांना दरवर्षी ६००० कृतज्ञता निधी देण्यास सुरवात झाली आहे. या kisan samman yojana चा आजपर्यंत १९ करोड शेतक-यांनी फायदा घेतला असून, दर चार महिन्यांनी त्यांच्या बँक खात्यामध्ये २००० जमा होऊ लागले आहेत.
काही प्रमाणात ही योजना यशस्वी ठरली असली तरी आता पर्यंत फक्त ४०% शेतक-यांनाच या योजनेचा प्रत्यक्ष लाभ झाला आहे, अजूनही खूपशे शेतकरी या योजनेपासून दूरच आहेत. शिवाय बरेचशे शेतकरी असे आहेत की त्यांनी या योजनेचा अर्ज केला परंतु तो अपूर्ण असल्याने तो शेतकरी या योजनेपासून वंचित राहिला आहे.
pm kisan samman yojana apply online : पीएम किसान सम्मान योजनेची ऑनलाईन प्रक्रिया.
पीएम किसान सम्मान योजनेची ऑनलाईन प्रक्रिया आहे. त्यामुळे ज्यांच्या नावावर २ हेक्टर पेक्षा कमी शेती किंवा नावावर शेती नाहीच, परंतु ते शेतीसाठी काम करतात. ते सगळे शेतकरी अथवा मजूर पा योजनेसाठी. ते आपला अर्ज online पद्धतीने भरू शकतात. त्यासाठी त्यांना www.pmkisan.gov.in/ या संकेत स्थळावर जाऊन farmer Corner मधील new farmer Ragistration/नवीन शेतकरी नोंदणीकरण या टॅब क्लिक करावी. जेणेकरून योजनेसाठी आपली नोंदणी करता येईल. यात नोंदणी दोन प्रकारे करू आहेत, (१) एजन्सी मार्फत आणि (२) स्वत: मार्फत. आज आपला शेतकरी सुशिक्षित असला तरी तो टेक्नॉलॉजीने प्रगत असेलच असं नाही. शिवाय सरकारकडून येणा-या योजनांची जागरुकता करण्यावर यंत्रणेचा भर नसल्याने, बहुतांशी लोकं अशा कल्याणकारी योजनेच्या फायद्यापासून वंचित रहातात.
पीएम – किसान योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्लायक आहेत.
- आधार कार्ड
- बँक खाते
- सातबारा उतारा
- रहिवाशी प्रमाणपत्र (जर शेत मजूर असेल तर…)
आपली नोंदणी झाल्यानंतर देखील शेतकऱ्यांनी www.pmkisan.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन आपल्या अर्जाची माहिती वेळोवेळी घ्यायला हवी.

kisan samman yojana online registration कसे करावे?
यासाठी आपल्याला काही कागदपात्रांची आवश्यकता लागते. आधार कार्ड, बँक खाते, सातबारा उतारा, रहिवाशी प्रमाणपत्र इत्यादी आपल्या जवळ असावीत. जेणेकरून अर्ज भरताना आपल्याला त्याच्यावरील तपशिलाची मदतच होते.
www.pmkisan.gov.in/ या संकेत स्थळावर जाऊन farmer Corner मधील new farmer Ragistration/नवीन शेतकरी योजना या टॅब क्लिक करून, आपण आपली नोंदणी चालू करू
New Farmer Registration Form
- Select Language/भाषा : आपल्याला जर इंग्लिशमध्ये, अर्ज भरण्यास अडचण येत असेल तर आपण दिलेल्या पर्यायातून आपल्याला बिनचूक येणारी भाषा निवडावी.
- State/राज्य : या ठिकाणी भारतातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची नावं त्यांच्या क्रमवारी प्रमाणे दिलेली असतात. त्यातून आपली जमीन असलेलं राज्य निवडावे. (जसे महाराष्ट्र).
- District/जिल्हा : आपण निवडलेल्या राज्यातील आपला जिल्हा
- Sub-District / उप-जिल्हा : हा ठराविक भागांपुरता वेगळा असू शकतो, नाहीतर आपण आपला तालुकाच निवडावा
- Block /ब्लॉक : जर आपला तालुका किंवा जिल्हा महानगरपालिका यामध्ये रुपांतरीत झालेला असेल तर त्याला सिटीचा दर्जा असतो आणि उर्वरित जिल्हा ग्रामीण भागात मोडतो. (पुणे सिटी आणि उर्वरित पुणे जिल्हा).
- Village/गाव :- जेथे आपली जमीन आहे ते गाव, कारण आपण लाभार्थी त्या गावाचे असतो.
Farmer Personal Details – Mandatory Parameters / शेतक-याची वैयक्तिक अनिवार्य माहिती
- Farmer Name : शेतक-याचे संपूर्ण नाव (हे नाव ७/१२ आणि आधारवर सारखंच असायला हवं)
- Gender /लिंग : पुरुष / स्त्री / इतर
- Category : जातीचा तपशील : SC, ST, Open
- Farmer Type : लहान शेतकरी / इतर (शेत मजूर)
- Select ID Type : Aadhaar Card (आधार कार्ड असल्याशिवाय नोंदणी होत नाही)
- Type of Identity Proof : आधार कार्ड (आपोआप येते)
- Aadhaar Number : जो आपण टाकला आहे तो बाय डीफॉल्ट घेतो.
- IFSC Code : ज्या बँकेत खातं त्यांच्या शाखेनिहाय कोड
- Bank Name :– ज्या बँकेत आपल्याला ही सुविधा चालू करायची आहे तिचे नाव
- Account Number : बँक खाते क्रमांक
- Address :– हा आपण निवडलेला गावाचं नाव आणि त्याचा क्रमांक दाखवतो
- Consent Given / संमती देणे : ( प्रमाणीकरण संमती – मी, गणपत धोंडू बेलवणकर (अर्जदार शेतक-याचे नाव), आधार क्रमांक ११११२२२२३३३३ (त्याचा १२ अंकी आधार क्रमांक) धारक, याद्वारे यूआयडीएआयकडे पंतप्रधान किसन सम्मान योजनेच्या प्रमाणीकरणासाठी माझा आधार क्रमांक, नाव आणि फिंगरप्रिंट / आयरिस (बायोमॅट्रिक प्रमाणीकरण) देण्यासाठी संमती देत आहे. मला या योजनेची पूर्ण माहिती असून, माझे प्रमाणीकरण फक्त डीबीटी (डायरेक्ट बेनेफिट ट्रान्स्फर) करण्यासाठी वापरले जाईल. या योजनेअंतर्गत डीबीटी लाभ आणि माझी बायोमेट्रिक्स कोणाशीही शेअर केली जाणार नाही. केवळ प्रमाणीकरणाच्या उद्देशाने सीआयडीआरकडे सादर केली जाईल हे मला माहित आहे.)
- Yes, Aadhaar Authenticated Successfully : होय, आपले आधार प्रमाणीकरण यशस्वी झाले. (हा संदेशयेणे अनिवार्य आहे अन्यथा आपला अर्ज अपूर्ण रहातो.)
- वरील सर्व माहिती योग्य असेल तर (Submit for Aadhaar Authentication) या बटन क्लिक करावे.
येथे आपल्या अर्जाचा वैयक्तिक माहिती हा पहिला टप्प पूर्ण होतो.
आता चालू होतो अर्जाचा दुसरा टप्पा.
शेतीची माहिती यासाठी आपला ७/१२ जवळ ठेवावा. आपल्या जमिनीचं खातं वैयक्तिक आहे का सयुंक्त (एकत्रित)
- single :- (जमीन फक्त आपल्या नावावर असेल तर पर्याय निवडावा.
- Joint :- (आपली जमीन एकत्रित कुटुंबाची असेल तर हा पर्याय निवडावा)
Add Land Detail जमिनीची माहिती
- Survey/Khata No- सर्वे नंबर / खाता क्रमांक : आपल्या नावावर असलेल्या जमिनीच्या ७/१२ उता-याचा सर्वे नंबर अथवा ८-अ क्रमांक
- Dag / Khasra No. डाग/खासरा क्रमांक : जमिनीचा काही भाग (२० गुंठ्यापेक्षा कमी) फक्त राहण्यापुरता नावावर आला असेल तर त्याचा क्रमांक.
- Area (in Ha) जमिनीचे क्षेत्र हेक्टरमध्ये : आपल्या जमिनीचे क्षेत्र हेक्टरच्या पद्धीतीने लिहिणे उदा. आपल्या नावावर जर सव्वा एकर असेल तर ०.६० असे त्याचं मूल्य लिहावे. ७/१२ वर देखील ते याच स्वरूपात असते.
- Add – वाढ : जर आपल्या नावावर एकापेक्षा अधिक जमिनी असतील तर तसा तपशील द्यावा.
Farmer Other Details Non Mandatory Parameters : शेतक-यांचा इतर तपशील अनिवार्य नसलेला. (तरीही हा पूर्ण भरावा)
- मोबाईल नंबर – १२३४५६७८९० (दहा अंकी मोबाईल नंबर)
- जन्म तारीख – आधार कार्ड वरील जन्म तारीख लिहावी (०१/०४/१९६५)
- वडील/आई/नवरा :- पूर्ण नाव लिहावे. (आपल्या नावापुढील मधले नाव आणि आडनाव जसेच्या तसे लिहावे)
- Self Declaration Form – I certify that all the given details are correct
- सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म :- मी असे प्रमाणित करतो की दिलेली सर्व माहिती योग्य आहे.
सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म :
- घटनात्मक पदावरील माजी व विद्यमान व्यक्ती.
- माजी व विद्यमान मंत्री / राज्यमंत्री व लोकसभा / राज्यसभा / राज्य विधानसभा / राज्य विधानपरिषदेचे माजी / विद्यमान सदस्य, माजी व विद्यमान सदस्य किंवा महानगरपालिका, जिल्हा पंचायतचा आजी/माजी सभापती.
- सेवानिवृत्त अधिकारी, केंद्र / राज्य सरकार मंत्रालय कार्यालय / विभाग आणि त्याचे फील्ड युनिट सेंट्रल किंवा स्टेट पीएसई आणि सरकारी कार्यालयात संलग्न कार्यालय / स्वायत्त संस्था तसेच स्थानिक मंडळाचे नियमित कर्मचारी (मल्टी-टास्किंग स्टाफ / वर्ग चतुर्थ / गट वगळता).
- वृद्ध / निवृत्त निवृत्तीवेतनधारक ज्यांचे मासिक १०००० किंवा त्यापेक्षा जास्त पेन्शन सुरु आहे.
- मागील वर्षात प्राप्तिकर उपभोक्ता.
- डॉक्टर, अभियंता, वकील, चार्टर्ड अकाउंटंट आणि आर्किटेक्ट सारखे व्यावसायिक, व्यावसायिक संस्थेत नोंदणीकृत व्यवसाय करतात.
कारण वरीलपैकी मी कुणीही नाही. (वरील व्यक्ती किसान सम्मान योजनेसाठी पात्र ठरत नाही मग त्यांच्या नावे अतिअल्प का शेती असो.)
यानंतर SAVE या बटनला क्लिक करून आपली संपूर्ण माहिती PMkisan या पोर्टल मध्ये साठवून ठेवली जाते.

जेंव्हा वरील संदेश येतो तेंव्हा आपला अर्ज PM Kisan Samman Yojana या पात्रतेसाठी पूर्ण झाला. यानंतर आपल्या अर्जाचा तपशील आधार क्रमांकाच्या सहाय्याने सतत तपासात राहावे. जेणेकरून काही त्रुटी अथवा चूक असेल तर दुरुस्ती करता यावी. शेवटी आपल्याला लाभ मिळवणे हे आपल्याच हातात आहे.