Home Government Documents How To Link Pan Card With Aadhar Card?

How To Link Pan Card With Aadhar Card?

- Advertisement -

Pan Card Link With Aadhar Card : केंद्रीय अर्थसंकल्प २०१७ मध्ये सरकारने प्रत्येक व्यक्तीने आपले पॅनकार्ड हे आधार क्रमांकाशी जोडणे बंधनकारक केले आहे. पॅनकार्डला आधारशी जोडण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2021निश्चित केली आहे.

 1. सर्वोच्च न्यायालयाने पॅनला आधारशी जोडण्यास अल्पशी मुदत वाढ दिलेली आहे. तसेच नवीन पॅनसाठी बनवण्यासाठी आणि केंद्र व राज्य सरकारच्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी  तसेच आयकर विवरणपत्र (आयटीआर) भरणे यासाठी देखील पॅन आणि आधारमधील लिंकिंग अनिवार्य असल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
 2. जर आपण आपला पॅन आपल्या आधारशी जोडला नाही तर आपले पॅनकार्ड    १ एप्रिल २०२१ पासून निष्क्रिय होऊ शकतो. त्यामुळे जेथे जेथे पॅनकार्ड आवश्यक आहे, ती सगळी कामे ठप्प होतील. या त्रासापासून सुटका करून घ्यायची असेल तर पॅनकार्ड आणि आधार कार्डा यांची लिंकिंग लवकर करून घ्या.

Pan Aadhaar Link Status : पॅनकार्ड आणि आधार कार्ड लिंकचा स्टेट्स कसा तपासावा?

 1. जर आपण आधी पासूनच आपल्या पॅनकार्डाची लिंक आधार कार्डशी केली असेल तर तसा स्टेटस तपासून घेणे गरजेचे आहे.
 2. त्यासाठी आयकर ई-फाईलिंग वेबसाइट https://www1.incometaxindiaefiling.gov.in/e-FilingGS/Services/AadhaarPreloginStatus.html या लिंक करा.
https://marathitrailer.com/pan-card-link-aadhar-card/
 1. PAN   : – या ठिकाणी आपला १० अंकी पॅनकार्ड क्रमांक लिहावा
 2. Aadhaar Numbar   : – या ठिकाणी आपला १२ अंकी आधार क्रमांक लिहावा
 3. View Link Aadhaar Status : – या बटनला क्लिक करावे .
https://marathitrailer.com/pan-card-link-aadhar-card/(opens in a new tab)
 • तुमचे पॅनकार्ड XXXX XXXX 1291 या आधार क्रमांकाशी लिंक झाले आहे.
 • यामध्ये आधारचे फक्त शेवटचे ४ क्रमांक दाखवले जातात.

For non- registered users : जर यापूर्वी आपण नोंदणी केलेली नसेल तर….

जर आयटी रिटर्ईन फाईल करत नसला किंव्हा आपले वार्षिक उत्पन्न इन्टकमटॅक्ससाठी पात्र नसल्यास, आपण या पोर्टलवर स्वत:ला कधीही रजिस्टर करवून घेत नाही. त्यावेळी देखील आपण याच पोर्टलवरून पॅन आणि आधार लिंक करू शकतो. ई-फाइलिंग वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर आणि प्राप्तिकर वेबसाइट http://incometaxindia.gov.in/Pages/default.aspx या लिंकला क्वलिक करा.

https://marathitrailer.com/pan-card-link-aadhar-card/(opens in a new tab)


वरील वेबसाईटवर फक्त “आधार लिंक/Aadhaar Link” या टॅब क्लिक करून लिंकिंग प्रोसेसिंग चालू करा.

 

https://marathitrailer.com/pan-card-link-aadhar-card/(opens in a new tab)
 1. PAN – आपला १० अंकी पॅनकार्ड नंबर.
 2. आधार नंबर – आपला १२ अंकी आधार नंबर.
 3. आधार प्रमाणे नाव – आपले संपूर्ण नाव (आधारवर आहे तसेच) (जर चुकीचे असेल तर पहिली दुरुस्ती करून घ्या).
 4. माझ्या आधारवर फक्त जन्म वर्ष लिहिलेलं आहे. (तरच या समोरील चौकटीत टिक करावी अन्यथा टिक करू नये).
 5. मी माझ्या आधारचा तपशील यूआयडीएआयला देण्यास सहमत आहे. (या समंतीपत्राला टिक करावे).
 6. कॅप्चा कोड – हा ६ अंकी कोड जसा असेल तसाच लिहावा.
 7. जर आपणांस डोळ्यांनी पाहण्यास असमर्थ असला तर या खालील OTP पर्यायाचा अवलंब करा.
 8. OTP साठी Request पाठवा आणि आलेला OTP मोकळ्या जागेत लिहा.  
 9. नाहीतर Link Aadhaar या बटनला क्लिक करून, पॅनकार्डची आधार क्रमांकाशी लिंकिंग प्रक्रिया पूर्ण करा.
 10. लक्षात घ्या पर्याय ७ & ८ फक्त अंध व्यक्तींसाठीच आहे.

SMS पद्धत

 1. जर ई-फाईलिंग वेबसाइट वापरुन आपला पॅन आणि आधार लिंक करण्यास असमर्थ असाल.  तर पॅनकार्ड आणि आधार जोडण्यासाठी एसएमएस सेवा वापरू शकता.
 2. आपल्या मोबाईल मधून  एसएमएस  पाठवून आपला पॅनकार्ड आणि आधार कार्ड लिंक करू शकता. त्यासाठी आपल्याला NSDL e-Governance Infrastructure Limited किंवा UTI Infrastructure Technology and Services Limited (UTIITL) या पॅन सेवा प्रदात्यांपैकी एकास एसएमएस पाठवणे आवश्यक आहे.
 3. त्यासाठी  567678 किंवा 56161  यावर एसएमएस पाठवावा लागेल. तोही (UIDPAN <111122223333> <ABCDE9999Q>) या स्वरूपात.
 4. यासाठी एनएसडीएल आणि यूटीआय आपल्याकडून कोणतेही शुल्क आकारणार नाहीत.  
 5. मात्र मोबाइल ऑपरेटर एसएमएस शुल्क लागू करतील.

ठळक मुद्दे:

 1. जर ऑनलाइन पध्दती वापरत असताना, आपल्या पॅनकार्डवरील नाव आधार कार्डशी जुळत नाही. परंतु आपली जन्म तारीख आणि लिंग जुळत असल्यास त्यांच्या माध्यामतून एक आधार ओटीपी तयार केला जातो. तो OTP आधार क्रमांकावरील नोंदणीकृत मोबाइल नंबरवर पाठविला जातो. तो OTP आपल्याला वापरून पुढील प्रक्रिया पूर्ण करावी लागते.
 2. जर आधार आणि पॅनकार्ड यांच्यातील बहुतांशी डेटा/माहिती जुळत नसल्यास. नागरिकाला दोघांपैकी चुकीची माहिती दुरुस्त करून घेण्याचा सल्ला दिला जातो.

 

- Advertisement -
Marathi Guidehttps://marathitrailer.com/
Has come a long way from its beginnings in Maharashtra. When Group of Marathi Trailer first started out, their passion for helping Farmers and help them to start their own business.
- Advertisment -

Most Popular

Recent Comments