Twitter Account : ट्विटर हे इंटरनेट SMS सुविधा असली तरी तिचा थेट माणसाच्या विचारावर परिणाम होतो. याचा अर्थ असा की लोक प्रवासात असताना, येणारे अनुभव इतर लोकांशी सामायिक करत असतात, दिवसाच्या घडामोडी सहज त्यावर लिहित असतात. हे मोबाईल यंत्रणेशी संबधित असल्याने याच्या लिखाणाला अथवा पोस्ट करण्यसाठी वेगळी कोणतीही यंत्रणा लागत नसल्याने लोकं दिसतील ते चित्रांच्या माध्यामातून अथवा व्हिडीओच्या सहाय्याने टिपतात आणि सहज अपलोड करतात. अर्थात हे साधन वापरायला सुटसुटीत आणि सहज शक्य असल्याने, ट्विटर अकाऊंट त्याचा प्रसार आणि परिणाम जास्त झाला आहे.
तर चला पाहूयात ट्विटर अकाऊंट कसे उघडायचे…
- twitter.com – कॉम्पुटर अथवा लॅपटॉपवरून ट्विटर चालू करायचं असल्यास इंटरनेट वरील ब्राऊझरमध्ये “Twitter.com” या वेबसाईट क्लिक करा….
(……मोबाईलवर Twitter चालू करण्यासाठी “google play store” मध्ये जाऊन या “ट्विटर अॅप्लिकेशन” डाऊनलोड करा.)

२) ट्विटरमध्ये आपले अकाऊंट उघडण्यासाठी “साईन अप” या बटनला क्लिक करा. एक नवीन विंडो ओपन होईल….

३) ट्विटर वर अकाऊंट
- Name –याठिकाणी वापरकर्त्याचे नाव लिहा
- जवळ असलेला फोन नंबर लिहा (यावरच OTP येतो)
- Date of Birth – आपली जन्म तारीख लिहा
- शेवटी NEXT या बटनला क्लिक करा…

- एक नवीन उघडणा-या विंडोमध्ये “तुमचा ट्विटर कुणी पहावा” असा प्रश्न आहे परंतु आपण आपला ट्विटर सर्वांसाठी खुला ठेवणार आहे.
- या विंडोमधील फक्त देखील NEXT या बटनला क्लिक करा.
- तिस-या स्टेप्समध्ये “SIGN UP” या बटनला क्लिक करा… (कारण यापूर्वीच आपण आपले नाव, मोबाईल नंबर आणि जन तारीख लिहिलेली आहे.)

- “sign up” केल्या नंतर काही वेळातच रजिस्टर केलेल्या मोबाईल क्रमांक आपल्याला दाखवला जातो.
- यात काही बदल करायचा असल्यास “EDIT” या बटन क्लिक करा.
- नंबर बदल्याचा नसल्यास, OTP मिळवण्यासाठी “OK” बटनला क्लिक करा…

- रजिस्टर केलेल्या मोबाईल वर एक “OTP” SMS स्वरूपात येतो.
- आलेला सहा अंकी OTP खालील विंडोमधील मोकळ्या जागेत लिहा.
- आणि NEXT बटनला क्लिक करा…

- खालील विंडोमध्ये आपला पासवर्ड बनवा लिहा
- शक्यतो आपला पासवर्ड हा युनिक असावा.
- आणि आपला “लॉगीन आयडी-पासवर्ड” हा कुणालाही वापरायला देऊ नये. कारण यावरून ट्विट होणारी प्रत्येक गोष्ट ही आपली नैतिक जबाबदारी आहे.

- आपल्या प्रोफाईलसाठी आपला एखादा चांगला डिसेंट वाटणारा फोटो निवडा.
- अथवा नव्याने एखादा मोबाइलमधून सेल्फी घ्या

- या ठिकाणी ट्विटर अकाऊंट उघडण्याची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली.
- खालील प्रकारे आपले “ट्विटर अकाऊंट” दिसू लागले असून, आता आपण सहज “ट्विट” करू शकतो.

IN Conclusion : निष्कर्ष
ट्विटर अकाऊंट उघडणे ही सामान्य प्रक्रिया आहे. तर आपल्या अकाऊंट वरून ट्विट करणे, एक जबाबदारी आहे. आपण जे ट्विट करणार आहोत ते कुणाच्या तरी विरोधात असू शकते. त्याने त्याच्या इमेजला धक्का पोहचू शकतो. त्यामुळे आपल्याला विनाकारण कुणाचेही सामाजिक आयुष्य मलीन करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे ट्विट किंवा रिट्विट करताना विचार करून करा.
“करून विचारात पडण्यापेक्षा, विचार करून कृती करा”