Home Uncategorized online seed distribution : मुग, उडीद आणि तूर बियाणे वाटप

online seed distribution : मुग, उडीद आणि तूर बियाणे वाटप

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

online seed distribution : मुग, उडीद आणि तूर बियाणे वाटप अगदी मोफत…. केंद्र शासनाची योजना – असा भरा ऑनलाईन अर्ज….: भारताला डाळींच्या उत्पादनात स्वयंपूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारकडून खरीप हंगाम 20२१ साठी नवीन धोरण जाहीर. महाडीबीटी पोर्टलवर – मोफत मुग, उडीद आणि तूर बियाणे ऑनलाईन अर्ज भरणे सुरु झाले आहे. “सध्या महाडीबीटी अंतर्गत बियाणे औषधे खते यासाठी अर्ज भरण्याची तारीख 15 मे करण्यात आली होती. त्यात नुकतीच वाढ देण्यात आलेली आहे. जे शेतकरी महाडीबीटी च्या अंतर्गत या बियाण्यांची मागणी करतील, त्यांनाच हे बियाणं मोफत उपलब्ध होणार आहे.”

मोफत मुग, उडीद आणि तूर बियाणे : online seed distribution

आपल्या देशाला डाळीं उत्पादनात स्वयंपूर्णता करण्यासाठी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने २०२१ साठी विशेष खरीप धोरण घोषित केले आहे. यात देशातील प्रमुख डाळी जसे तूर,मूग आणि उडीद डाळीचे लागवडीचे क्षेत्र आणि उत्पादकता वाढवण्यासाठी “मोफत बियाणे” ही योजना तयार केली आहे. या योजनेच्याच्या अंतर्गत उत्तम पीक देणा-या जातीचे बियाणे केंद्रीय बिज-संस्थाकडे अथवा राज्याच्या बियाणे केंद्राकडून उपलब्ध करून, त्या बियाणांचे नोंदणीकृत शेतकऱ्यांनामोफत वाटप केले जाणार आहे. या बियाण्यांची शेतक-यांना आंतरपीक अथवा मुख्य-पीक म्हणून लागवड करता येईल.

“तूर, मुग, आणि उडीद” यां मोफत बियाण्यांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया…..

1.या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांचा मोबाईल नंबर आधार-कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे. 2.https://mahadbtmahait.gov.in/farmer/login/login या वेबसाईटला क्लिक करून आपला “आधार क्रमांक” किंव्हा “वापरकर्ता आयडी” वापरून फार्मर पोर्टल वर लॉगिन करू शकतो….

मोफत बियाणे मुग | उडीद | तूर

असा भरा अर्ज…

  तर पुढे तूर, मुग आणि उडीद या पिकांच्या बियांण्यावरील संपूर्ण प्रक्रिया समजावून घेऊयात.

मोफत मुग, उडीद आणि तूर बियाणे : या खरीप हंगामात 82.51 कोटी रुपये किमतीच्या २०,२७,३१८ बियाण्यांच्या पिशव्याचे वाटप केले जाणार आहे. हे वाटप 2020-21 पेक्षा दहापट अधिक आहे. या संपूर्ण बियाण्यांचा खर्च केंद्र सरकार उचलणार आहे. तूर, मूग आणि उडीद डाळींचे उत्पादन आणि उत्पादकता वाढविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

मोफत बियाणे  योजने  अंतर्गत प्रमाणित बियाणे आणि त्यांची उत्पादकता :

 1. तूर बियाण्याच्या १३,५१,७१० छोट्या पिशव्या – HYV प्रमाणित, ज्यांची  गेल्या दहा वर्षांत सर्वाधिक लागवड झाली आहे. शिवाय  त्याची उत्पादकता आंतरपीक म्हणून प्रती हेक्टर १५ क्विंटल पेक्षा कमी नसेल.
 2. मूग बियाण्यांच्या ४,७३,२९५ छोट्या पिशव्या – गेल्या दहा वर्षात त्यांची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. ज्याची उत्पादकता १० क्विंटल प्रति हेक्‍टर असेल.
 3. उडीद बियाणे ९३,८०५ HYV चे उत्तम बियाणे.  ज्यांची मागील दहा वर्षात मोठ्या प्रमाणावर लागवड झाली आहे. याची आंतरपीक म्हणून उत्पादकता १० क्विंटल प्रति हेक्‍टर आहे.
 4. १,०८,५०८  पिशव्या HYV प्रमाणित उडीद बियाणे, मुख्य पिक ज्याची उत्पादकता १० क्विंटल प्रति हेक्‍टर पेक्षा कमी नसेल.
online seed distribution system, seed distribution, online subsidy seed distribution, e seed distribution

मोफत बियाण्यांची वाटप यंत्रणा…

 • उडीद हे मुख्य-पीक व आंतरपीक म्हणून खरीप हंगामात एकूण ४.०५ लाख हेक्‍टर क्षेत्र लागवडीसाठी निश्चित  केले आहे. त्याशिवाय केंद्र आणि राज्यातील विभागणीनुसार महाराष्ट्रासह इतर काही राज्यांनाही या यापेक्षा जास्त आंतरपीक आणि लागवड क्षेत्र वाढवता येईल.
 • तूर या आंतरपीक लागवड देशातल्या ११ राज्यातील १८७ जिल्ह्यात केली जाणार आहे. यात महाराष्ट्राचाही समावेश आहे.
 • उडिदाची आंतरपीक लागवड महाराष्ट्रासह इतर ६ राज्य आणि इतर ६ जिल्ह्यात केली जाणार आहे.
 • तर उडिदाची मुख्य-पीक म्हणून लागवड महाराष्ट्रासह  ६ राज्यांमध्ये केली जाणार आहे.

तूर, मुग आणि उडीद – डाळींसाठी आत्मनिर्भर भारत…

 • या योजनेसाठी पुरवल्या जाणाऱ्या मिनी कीट म्हणजे छोट्या पिशव्या केंद्रांच्या अथवा राज्याच्या स्वतंत्र्य यंत्रणेद्वारे जिल्हा स्तरावर पोहोचले जातील.
 • १५ मेला निश्चित करण्यात आलेल्या धोरणानुसार त्याची अंमलबजावणी होणार आहे.
 • भारत आजही ४ लाख टन तूरडाळ, ०.६ लाख टन मुगडाळ, आणि १३ लाख टन उडीद डाळीची आयात करतो.
 • या विशेष योजनेमुळे या तीनही पिकांची उत्पादकता वाढणार असून, डाळींच्या क्षेत्रात भारत आत्मनिर्भर होण्यास हातभार लागणार आहे.
 • https://marathitrailer.com/kusum-solar-scheme/(opens in a new tab)

In Conclusion : निष्कर्ष

online seed distribution : सध्या महाडीबीटी अंतर्गत बियाणे, औषधे खते यासाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 15 मे होती, परंतु त्यात नुकतीच वाढ देण्यात आलेली आहे. जे शेतकरी महाडीबीटीच्या अंतर्गत या बियाण्यांची मागणी करतील, त्यांनाच हे बियाणं मोफत उपलब्ध होणार आहे.

“करा सन्मान शेतक-यांचा, मिळेल आनंद आयुष्याचा”

- Advertisement -
Marathi Guidehttps://marathitrailer.com/
Has come a long way from its beginnings in Maharashtra. When Group of Marathi Trailer first started out, their passion for helping Farmers and help them to start their own business.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

IFFCO कडून नॅनो UREA लाँच

UREA : इफकोकडून शेतकऱ्यांना खरिप हंगामापूर्वी गिफ्ट, नॅनो युरिया लाँच, पैसेही वाचणार आणि फायदाही दुप्पटीने मिळणार...! एक गोणी खताऐवजी केवळ अर्धा लिटर...

Social Media : एका उज्ज्वल भविष्याची नांदी….

Social Media : सोशल मीडिया म्हणजे लोकांमधील परस्परसंवादाचे आभासी माध्यम, ज्यामध्ये लोकं आपल्या कल्पना, आपल्याकडील माहिती यांची एकमेकांशी देवाणघेवाण करतात. यासाठी मुख्यतो...

Salary : मास मिडीयामधील करिअरच्या उत्तम संधी…

Salary : आजच्या स्पर्धात्मक जीवनात १२वी नंतर बहुसंख्य पर्याय असलेला “मास मिडीया” हा करिअरच्या दृष्टीने  उत्तम पर्याय बनला आहे. यात शिक्षण घेण्यासाठी...

Bmm : १२ वी नंतर “मास मिडीया” करियरचा एक उत्तम पर्याय…!

Bmm : १२ वी नंतर “मास मिडीया” करियरचा एक उत्तम पर्याय! फक्त शिक्षण की करिअर विषयक शिक्षण, याच विवंचनेत आज बहुतांशी विद्यार्थी...

Recent Comments