On-Page SEO म्हणजे ग्राहक मिळवण्याच्या दृष्टीकोनातून आपल्या वेबपेज किंवा ब्लॉग-पोस्टची सर्च इंजिनला हवी असणारी अनुकूल मांडणी. या मांडणीमध्ये शोधलेली कीवर्ड्स आणि सर्च इंजिनचे हवे असणारे सर्व पॅरामिटर्स (मापदंड) यांची योग्य अशी केलेली गुंफण. ज्यामुळे सर्च इंजिनला आपली वेबसाईट अथवा ब्लॉग-पोस्ट शोधणे सोपे होऊन जाते. शेवटी आपण लिहिलेली माहिती आणि “एचटीएमएल सोर्स कोड” हे दोन्ही एकमेकांत सहज मिसळून जाणे गरजेचे आहे. ते एकमेकांत उत्तमरीत्या मिसळल्यानेचे आपले पेज सहज रँक (सर्च इंजिनमधील पहिल्या पानावर येणे) होऊ शकते. सर्च इंजिनचे पॅरामिटर्स (मापदंड) म्हणजेच पोस्टचे शीर्षक (title), प्रतिमा (image), परिच्छेद, कीवर्ड्स, लिंक्स (इंटर्नल आणि एक्स्टर्नल) इत्यादी. या सर्वांची व्यवस्थितपणे मांडणी केली, तर आपली पोस्ट अथवा पेज आपल्याला सहज रँक करता येईल. on page seo steps खाली दिलेल्या आहेत.

उदाहरणार्थ आपल्याकडे चहा सरार्स पिला जातो, म्हणून तो विकलाही जातो. आतापर्यंत चहा हा टपरीवर किंवा होटेल्समध्ये मिळणारा एक उत्तेजक पेय पदार्थ होता. परंतु “येवले अमृततुल्य” यांनी त्याला ब्रँड बनवले. आणि लोक खास चहा पिण्यासाठीही वेळ देऊ लागली. टपरीवर, हॉटेल्समध्ये किवा अमृततुल्य या सर्वच ठिकाणी चहातील विरघळणारे घटक सारखेच असतात. पाणी, चहापत्ती, साखर, इलायची, आद्रक आणि स्पेशल मसाला यांच्या कमीजास्त वापरणे फक्त चवीमध्ये थोडाफार फरक पडतो. हेच विरघळणारे पदार्थ म्हणजे आपले On-Page SEO. जे आहेत पण दिसत नाहीत तरीही त्यांचे अनन्य साधारण महत्त्व आहे.

    

on page seo checklist 2018, on page seo definition, on page seo meaning, check on page seo, on page seo steps

SEO म्हणजे काय?

THINGS YOU NEET TO DO ON-PAGE SEO – आपण पृष्ठावरील एसइओ करण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी

1) Content with images – प्रतिमांसह लिखाण

2) Target keywords – उद्धिष्टसाधक कीवर्ड्स

3) YOAST PLUGIN – योस्ट प्लगिन

ON-PAGE SEO CHECKLIST 2018

 1. पोस्टच्या टायटलमध्ये (शीर्षकात) फोकस कीवर्ड्स वापरा, शक्य असेल तर टायटलची सुरवातचे “कीवर्ड्स”ने करावी.
 2. पोस्टची URL लहान आणि स्पष्ट बनवा त्या “स्लग”मध्ये प्राथमिक(फोकस) कीवर्डचा वापर करावा.
 3. आपला प्राथमिक कीवर्ड पोस्ट पहिल्या (मेटा डिस्क्रीप्शन) आणि शेवटच्या परिच्छेद (निष्कर्ष/Conclusion) यामध्ये जरूर करावा.
 4. आपल्या संपूर्ण पोस्टमध्ये “प्राथमिक कीवर्ड”चा वापर (Density) हा साधारणता 0.5% पर्यंत ठेवावा.
 5. आपला प्राथमिक कीवर्ड 1 किंवा २ उप-शीर्षका (Sub-Heading) मध्ये जरूर वापरावा.
 6. दुय्यम (Secondary) कीवर्डचा वापर संपूर्ण पोस्टच्या 0.2% ते 0.5% इतका जरूर ठेवावा.
 7. पोस्टमध्ये वापरलेल्या सर्व फोटोंपैकी पहिल्या फोटोला “अल्ट टॅग” (Alt Tag) म्हणून प्राथमिक कीवर्डचाच वापर करावा.
 8. मेटा डिस्क्रीप्शनमध्ये मुख्य कीवर्डचा वापर जरूर हा शक्यतो सुरवातीलाच करावा. (अपवाद – काही वेळेला ते शक्यही नसू शकते)
 9. प्राथमिक कीवर्ड्स आणि इतर सर्व दुय्यम कीवर्ड्सचा वापर – मेटा डिस्क्रीप्शनमध्ये करण्याचा प्रयत्न करावा. (हा, जबरदस्तीने त्यात कीवर्ड्स घुसवू नयेत.)  
 10. पोस्टमध्ये लहान लहान परिच्छेद लिहा. (शक्यतो कोणताही परिच्छेद/पॅरेग्राफ १५० शब्दांपेक्षा कमी असावा.)    
 11. Use H1 For Title And Headings H2 To H6 In The Content – पोस्टच्या लिखाणामधील शीर्षकसाठी H1 हा टग मुलभूतरित्या (बाय-डीफॉल्ट) घेतला जातो. म्हणून इतर उपशीर्षकांसाठी H2 ते H6 वापर करावा.
 12. महत्त्वपूर्ण शब्दांना विभिन्न रंगांनी हायलाइट करावे.
 13. शक्य तेथे अंतर्गत दुवे (इंटर्नल लिंक) द्याव्यात. 
 14. इतर वेबसाईटवरील पब्लिकला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी बाहेरील लिंक (एक्स्टर्नल लिंक) देखील आपल्या पोस्टमध्ये वापराव्यात.
 15. क्लिक-थ्रू-रेट (CTR) मॅग्नेट मेट शीर्षक आणि वर्णन वापरा. (नैसर्गिकरीत्या विझिटर/ग्राहक मिळविण्यासाठी एसईओ मधील सीटीआर चुंबक पद्धतवापरली जाते. याचा वापर शक्यतो “अॅफिलेट मार्केटिंग किंवा ब्लॉग मोनिटाईजेशनच्या नंतर केला जातो.)  
 16. पोस्टमध्ये सोशल मीडियाची बटन्स वापरावीत जेणेकरून दर्शकांना आपली पोस्ट शेअर करणे सोपे जाते.
 17. आपली पोस्ट अथवा पेज लवकरात लवकर ओपन होण्यासाठी त्याच्या गतीमध्ये सुधार करावा. (यासाठी वेगळे पॅरामिटर्स/मापदंड वापरावे लागतात.)  
 18. बाउन्स रेट सुधार जरूर करावा (बाउन्स रेट म्हणजे आपल्या कुठल्याही एका पोस्टवर आलेला विझिटर दुस-या कुठल्याही पेजवर गेला नाही. म्हणजे आपण पेज/पोस्टमध्ये वापरलेल्या इंटर्नल किंवा एक्स्टर्नल लिंकला क्लिक केलंच नाही. म्हणजे तो आपल्यासाठी फक्त सिंगल पेज व्हिवर ठरला)

PM किसान सन्मान योजनेचा फॉर्म कसा भरावा ?

In conclusion : निष्कर्ष

ON-PAGE SEO करताना आपल्याला पोस्ट किंवा वेबपेज यामध्ये आपले सर्व सर्च केकेले कीवर्ड्स (फोकस आणि दुय्यम) हे कंटेंटमध्ये सहज सामाविष्ट व्हायला हवे.