Home Education Bmm : १२ वी नंतर “मास मिडीया” करियरचा एक उत्तम पर्याय...!

Bmm : १२ वी नंतर “मास मिडीया” करियरचा एक उत्तम पर्याय…!

- Advertisement -

Bmm : १२ वी नंतर “मास मिडीया” करियरचा एक उत्तम पर्याय! फक्त शिक्षण की करिअर विषयक शिक्षण, याच विवंचनेत आज बहुतांशी विद्यार्थी आणि पालक सापडले आहेत. आज पारंपारिक शिक्षण प्रणाली केंव्हाच संपुष्टात आली असताना देखील आपण त्याच प्रणालीवर लक्ष ठेवून आहोत. आजचं युग हे आधुनिकीकरणाचे असले तरी आपण मात्र पुरातन शिक्षणा प्रणालीला कवटाळून बसलो आहोत. “बदल हा घडत नसतो तो घडवायचा असतो” म्हणूनच शिक्षणामध्ये देखील आपल्या थोड्याश्या जोखमीची पायवाट शोधावीच लागते. आणि हीच मेहनतीची आणि करिअर विषयक शिक्षणाची परिपूर्ण पायवाट म्हणजे “Bmm मास मिडीया”.

इंटर्नशिप म्हणजे काय आणि कशासाठी?

आज बहुतांशी विद्यार्थी हे पदवी शिक्षण पूर्णकेल्या नंतर इंटर्नशिपसाठी मोठ्या कंपन्यांच्या दाराशी धडपडताना दिसतात. नेमकं काय असतं हे इंटर्नशिप? कधी विचार केलाय. तर इंटर्नशिप म्हणजे ‘कार्यानुभव’ अर्थात कामाचा अनुभव. या इंटर्नशिपमध्ये आपल्या शिक्षणाच्या अनुषंगाने कामामध्ये काही कौशल्य देखील शिकावी लागतात, कामाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा लागतो, त्यासाठी ही ढोर आणि त्या बदल्यात काय मिळतं? तर थोडंसं मानधन, त्यालाच स्टायपेंड म्हणतात. या सगळ्या प्रकाराला इंटर्नशिप म्हणतात. आणि हे सगळं कधी तर “पदवीधर” झाल्यानंतर. म्हणजे पुढची २-३ वर्ष यातच घालवावी लागतात. तेंव्हा जाऊन कुठे एखाद्या चांगल्या ठिकाणी आपली वर्णी लागते. (तेही थोडंसं लक आपल्या बाजूने असेल तर!) हे झालं पारंपारिक शिक्षण.     

bmm full form, bmm course, bmm infocenter, bmm colleges in mumbai

परंतु आपण जेंव्हा मास मिडीयामध्ये जॉईन होता, त्याच दिवसापासून आपलं इंटर्नशिप चालू झालेली असते. त्यात तुम्हांला कामाचा अनुभव मिळतो, नवनवीन कौशल्य शिकावी लागतात हा मात्र मानधन मिळत नसलं तरी पदवी नंतर हेच शिकण्यासाठी जो वेळ देतो त्याची भरपाई येथेच होते. तोच वाचलेला वेळ म्हणजे आपलं स्टायपेंड असतं. खरंच हे सत्य आणि शक्य आहे का?

नाविन्याच्या दृष्टीकोनातून : BMM अभ्यासक्रम

होय, जेव्हा आपन मास मिडीयाच्या अभ्यासक्रमाला सुरवात करतो तेंव्हाच आपण नाविन्याच्या दृष्टीकोनातून विचार चालू करावा लागतो. तुम्ही कोण आहात यापेक्षा आता तुम्ही काय म्हणून स्वत:ला सिद्ध करू इच्छाता हे येथे फार महत्त्वाचं असतं. अर्थात येथे पारंपारिक शिक्षणाला कौशल्याची साथ दिली गेली असल्याने आपल्याला नेहमीच काही ना काही अचंबित करणा-या गोष्टी शिकावयाच लागतात. कारण ती आपली आणि काळाची गरज असते.

आता पाहूयात नेमकं आपण मास मिडीयामध्ये काय शिकणार आहोत.  

  • पत्रकारिता (प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, वेब)    
  • सामाजिक माध्यमे (सोशल मिडीया-सर्व वेब माध्यमे)
  • चित्रपट (लेखन, दिग्दर्शन, संगीत संयोजक)    
  • दूरदर्शन (बातमीपत्र आणि डॉक्युमेंटरीज) 
  • रेडिओ (आरजे, बातमीपत्र लेखन) 
  • जाहिरात (लेखन)  
  • जनसंपर्क (कॉर्पोरेट कंपनी, मिडीया एजन्सीज्, पॉलिटिकल लीडर/पार्टीज)     
  • पुस्तके, मासिके, वर्तमानपत्रे आणि नियतकालिके (लेखन, डिझाईन, कार्टूनिस्ट) 

यातील सर्वच प्रकार हे एकमेकांशी जोडलेले असल्याने आपल्या प्रत्येकासाठी वेगळा वेळ आणि कौशल्य शिकावी लागत नाही. म्हणजे जर तुम्हांला थोडं जरी नेटकं लिहिता येत असले तर त्यात तुम्ही लवकरच पारंगत होऊ शकता. मग त्याच लिखाणाला बातमी, लेख, ब्लॉगपोस्ट, ट्विट, संवाद, जाहिरात किंवा डॉक्युड्रामा स्वरूपात लिहिण्यासाठी आपल्याला फक्त त्या विशिष्ट प्रकारची मांडणी समजावून घ्यावी लागते. म्हणजे एकदा लिखाण जमलं का त्याला कोणत्या माध्यामात मांडायचं याचं कौशल्य नियमित कामातून सहज प्राप्त होत असते.

मास मीडियातील मुख्य घटक :

मास मीडियातील मुख्य घटक म्हणजे आपल्या कामाची जाहिरात आपणच करणे. आज सर्वांनाच काहीनाकाही बनवता येत असतं. पण विकण्याचं काय? आपण नेमकं येथेच कमी पडतो परंतु मास मिडीया मध्ये विकण्याच्या दृष्टीकोनातूनच कसं बनवावं याचं प्रशिक्षण पहिल्या दिवसापासूनच द्यायला सुरवात केली जाते. एक उदाहरण पाहू, आपण एक कथा लिहिली, तिला एका वेब पोर्टलवर आपण प्रकाशित केली. परतू खूप दिवस होऊनही तिला जास्त प्रतिसाद मिळालाच नाही. याचा अर्थ आपण असा काढला की आपली कथाच चांगली नव्हती. पण जेंव्हा त्या कथेची लिंक आपण आपल्या फेसबुक पोस्ट नेटकी लिहिली, कथेला साजेसे फोटोग्राफ टाकले प्रकाशित केली. त्याच कथेची लिंक फेसबुक प्रमाणेच, ट्विटर, इंस्टाग्राम, लिंक्डइन, व्हॉट्सअप ग्रुप आणि इतर काही सोशल मिडीयावर प्रकाशित केल्यानंतर आपल्या त्याच साधारण कथेला अनेक वाचक मिळाले. काहींना ती कथा आवडली म्हणून इतरांशी शेअर केली, त्यामुळे वाचकांमध्ये आणखीनच वाढ झाली.

याचा अर्थ काय? पहिली लिहिलेली कथा साधारण होती आणि आता कोणताही बदल न करता एकदम चांगली झाली. ती चांगली पहिलीच होती फक्त लोकांपर्यंत ती पोहचली नव्हती.

आज जाहिरातीच्या माध्यमाने तिचा बोलबाला झाला. याचाच अर्थ “जे विकलं जातं तेच मास मिडीया मध्ये पिकवायला शिकलं जातं.”

म्हणूनच आजच्या स्पर्धात्मक जीवनात १२वी नंतर बहुसंख्य पर्याय असलेला “मास मिडीया” हा उत्तम करिअर पर्याय आहे. यात शिक्षण घेण्यासाठी १२ वी पास ही एकमेव अट असली तरी तुम्हांला लिखाणाची आवड, नवीन टेक्नोलॉजी शिकण्याची जिद्द आणि नाविन्य जाणून घेण्याची हाव असायलाच हवी. तरच आपण या मास मिडियामध्ये उत्तम करिअर करू शकतो.

Farmer Producer Company with Success Mantra’s! | Marathi Trailer

Bmm अशा बहु-करियर पर्याय असणा-या आणि सातत्याने वाढ होणा-या “मिडीया” या क्षेत्रात इंग्रजी बरोबरच आता मराठीमधून देखील शिक्षण प्रणाली निर्माण झाली आहे. तेंव्हा जर आपल्याला वेळ जाया न करता उत्तम करिअरची संधी हवी अशी तर मास मिडीया हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.

क्रमश: (करिअरच्या उत्तम संधी पुढील भागात)

प्रा.भानुदास पानमंद (७५०६९१७७८९)

(लेखक मास मिडियाचे प्राध्यापक आहेत)       

कुसुम सौर कृषिपंप योजना

- Advertisement -
Marathi Guidehttps://marathitrailer.com/
Has come a long way from its beginnings in Maharashtra. When Group of Marathi Trailer first started out, their passion for helping Farmers and help them to start their own business.
- Advertisment -

Most Popular

Recent Comments