Home Government Documents Mahadbt : Online application process

Mahadbt : Online application process

- Advertisement -

MahaDBT – Aaple Sarkar Mahadbt, या पोर्टलवर कृषी उन्नती योजने अंतर्गत कृषि-यांत्रिकीकरण सन 2020-21साठी, या पोर्टलवर अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. तरी  इच्छुक शेतकरी बांधवांनी MahaDBT च्या वेबसाईटवर अर्ज भरावेत.

Aaple Sarkar Mahadbt Application process has started on this portal for Agricultural Mechanization Year 2020-21 under Krishi Unnati Yojana. However, interested farmers should fill up the application form on MahaDBT’s website.

यात काही शंका अथवा अडचण आल्यास आपापल्या भागातील कृषी सहायक/ पर्यवेक्षक /मंडळ कृषी अधिकारी अथवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा. लाभार्थी निवड सोडत (लॉटरी) पद्धतीने काढण्यात येईल.

In case of any doubt or difficulty, you should contact the Agriculture Assistant / Supervisor / Board Agriculture Officer or Taluka Agriculture Officer’s Office in your area. Beneficiaries will be drawn by lottery.

आपले सरकार या MAHADBT पोर्टल वर अर्ज पुढीलप्रमाणे भरावा.

१) https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Login/Login ला क्लिक करावं,

mahadbt login, mahadbt applicant login, mahadbt portal, aaple sarkar mahadbt, aaple sarkar dbt, aaple sarkar dbt portal, aaple sarkar dbt portal login,

२) mahadbt वेबसाईट च्या उजव्या बाजूला असणा-या “नवीन अर्जदार नोंदणी” याला क्लिक करावं.नवीन अर्जदार नोंदणी या बटनला क्लिक करा…

Click on “New Applicant Registration” on the right side of the mahadbt website. Click on the New Applicant Registration button …

mahadbt login, mahadbt applicant login, mahadbt portal, aaple sarkar mahadbt, aaple sarkar dbt, aaple sarkar dbt portal, aaple sarkar dbt portal login,
user ID Creation window
 • New Registration करण्यासाठी सर्व अनिवार्य घटक भरा.( * marks fields are mandatory)
 • Applicant Name : अर्जदाराचे पूर्ण नाव (आधार कार्डावरील)
 • Username : येथे आपला युजर आयडी बनवा (नोट : Username हा फक्त अक्षर आणि नंबर टाकूनच बनवावा. तोही कमीत कमी ४  अक्षरं आणि जास्तीत जास्त १५ अक्षरं) उदा. Bhanudas१९७७
 • Password – पासवर्ड बनवा (नोट: पासवर्ड हा कमीत कमी ८ अक्षरी आणि जास्तीत जास्त २० अक्षरी असावा ) उदा. mahaDBT२०२०  (नोट : Email ID हा अनिवार्य घटक नाही, परंतु टाकल्यास त्याला Email ID ला Verification करावं लागेल. अर्थात त्यावर एक OTP येईल आणि टाकल्याशिवाय पुढे सरकता येणार नाही)
 • Mobile Number : ९३२२८४१९११ (आपला मोबाईल क्रमांक लिहा) (नोट : मोबाईल Verification आहे. आपण दिलेल्या मोबाईल नंबरवर OTP येईल आणि टाकल्याशिवाय पुढे सरकता येणार नाही.)
 • निळ्या अक्षरात असणारा CAPTCHA (कॅप्चा) त्याखालील बॉक्स मध्ये लिहा.
 • आतापर्यत भरलेली माहिती बरोबर असल्यास Registar (नोंदणी करा) या बटन ला क्लिक करा.
 • आता आपला युजर आयडी आणि पासवर्ड निर्माण झाल्याचा मेसेज नवीन विंडो मध्ये दिसेल.
mahadbt login, mahadbt applicant login, mahadbt portal, aaple sarkar mahadbt, aaple sarkar dbt, aaple sarkar dbt portal, aaple sarkar dbt portal login,

आता आपण mahadbt च्या मुख्य पोर्टलवर लॉगीन करू शकतो.

 1. मेन वेबसाईटवरील “अर्जदार लॉगीन” या टॅबवर क्लिक करा.
 2. लॉग इन – अर्जदार येथे लॉगिन करा – लॉगिन प्रकार निवडा १) वापरकर्ता आयडी आणि २) आधार क्रमांक
 3. आपण पहिला प्रकार १) वापरकर्ता आयडी निवडणार आहोत….
mahadbt login, mahadbt applicant login, mahadbt portal, aaple sarkar mahadbt, aaple sarkar dbt, aaple sarkar dbt portal, aaple sarkar dbt portal login,
Ragistar Members Only

Aadhaar Card Download कसे करावे?

mahadbt login – च्या मुख्य पानावर आपण रजिस्टर केलेला लॉगीन आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगीन इन करा .

mahadbt login, mahadbt applicant login, mahadbt portal, aaple sarkar mahadbt, aaple sarkar dbt, aaple sarkar dbt portal, aaple sarkar dbt portal login,
 • वरील विंडोमध्ये नवीन नोंदणीतील आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यावर पुन्हा आपण मेन स्क्रीनवर येतो.
 • पुन्हा USER ID आणि PASSWORD टाकून LOGIN करा.
 • INFORMATION नावाचा विंडो उघडतो.
 • आपले प्रोफाईल अपूर्ण आहे, कृपया घातक लागू करण्यासाठी आपले प्रोफाईल तपशील पूर्ण करा….(हा मॅसेज पहायला मिळतो)
 • OK या बटनवर क्लिक करा. 
mahadbt login, mahadbt applicant login, mahadbt portal, aaple sarkar mahadbt, aaple sarkar dbt, aaple sarkar dbt portal, aaple sarkar dbt portal login,

लाल चौकटीतील “इथे क्लिक करा” या लिंकवर क्लिक करून प्रोफाईलमध्ये जा…

सुरवातीलाच आपण आधारची नोंदणी केली असल्याने, सिस्टम आपल्या आधारच्या आधाराने आपली वैयक्तिक काही माहिती तेथूनच घेतो. वैयक्तिक माहिती जशी आधार क्रमांक, नाव, ईमेल, आयडी, मोबाईल क्रमांक, जन्मतारीख, वय आणि लिंग…  

उर्वरित सर्व माहिती भरणे गरजेचं आहे. भरावयाची माहिती

 • पहिले नाव
 • वडिलांचे /पतीचे नाव
 • आडनाव
 • पॅन क्रमांक
 • जात तपशील : यामध्ये तीन प्रकार आहेत
 • (SC) अनुसूचित जाती
 • (ST) अनुसूचित जमाती
 • इतर

जर आपल्याकडे वरीलपैकी “जात” प्रमाणपत्र असेल तर….?
होय किंवा नाही
जर जात प्रवर्गात “होय” म्हणावं….

 • उत्पन्नाचा तपशील – कौटुंबिक वार्षिक उत्पन्न –
 • आपल्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र आहे?
 • आहे किंवा नाही (येथे वार्षिक उत्पन्नाचा आकडा लिहावा-जो आपल्याला तलाठ्याने दिलेला असेल तोच, नसेल तर नाही या टिक करावं.)
 • वैयक्तिक अपंगत्व तपशील
 • कोणत्याही प्रकारचे अपंगत्व – आहे / नाही? (जर असेल तर….)
 • आहे म्हंटल्यावर –
 • अपंगत्वाचा प्रकार – कायम किंवा प्रगतीशील
 • विकलांग व्यक्ती – Blindness, Hearing, Laprosy Dures, Locomotor Disability, Low Vision, Mental Illness, Mental Retardation, Severly Handicaped, Severly Orthopaedically Handivavaped
 • आपल्याकडे अपंगत्वाचे प्रमाणपत्र आहे का? होय / नाही (जर आपल्याकडे प्रमाणपत्र नसेल तर अपंगत्व नाही हेच गृहीत धरले जाते.)
बँक तपशील
 • टिप : आपला आधार क्रमांकाशी जोडलेला बँक खाते क्रमांक हा अंतिम बँक खाते क्रमांक आहे ज्याच्याशी आपण आपला आधार क्रमांक यशस्वीरित्या जोडला आहे.
 • तुमचे आधार-जोडलेले बँक खाते एक जन धन / युवक खाते आहे का किंवा खात्यातून पैसे काढण्याची किंवा ठेवण्याची मर्यादा आहे का?
 • होय / नाही (यातील नाही हे डिफॉल्ट आहे)

बँक खाते क्रमांकआयएफएससी कोडशाखेचे नाव (आयएफएससी कोड टाकल्यावर आपोआप दिसेल)

योजनेंतर्गत शासनातर्फे देण्यात येणारे अनुदान आधार संलग्न बँक खात्यात जमाकरण्यात येणार आहे याची कल्पना असून मी नमूद केलेले बँक खाते आधार संलग्न केलेले आहे. (चौकटीत क्लिक करा)

जर भरलेली संपूर्ण माहिती योग्य असेल तर (जतन करा) या बटन क्लिक करा म्हणजे प्रोफाईल मधील “वैयक्तिक माहिती” हा कॉलम पूर्ण होईल.

mahadbt login, mahadbt applicant login, mahadbt portal, aaple sarkar mahadbt, aaple sarkar dbt, aaple sarkar dbt portal, aaple sarkar dbt portal login,

यानंतर “पत्ता” अर्थात राहण्याचा तपशील पूर्ण करावा. (सर्व * चिन्हांकित भरणे अनिवार्य आहेत)

कायमचा पत्ता या खाली
पत्ता – येथे निवासी पत्ता लिहावा
राज्य
– महाराष्ट्र
जिल्हा – पुणे (आपला जिल्हा निवडावा)
तालुका – खेड (आपला तालुका)
गाव / शहर – (राहत गावाचं/शहराचं नवा)
पिन कोड – ६ अंकी पिनकोड नंबर (पिनकोड जर माहित नसेल तर google मध्ये जाऊन शोधावा)

 • पत्रव्यवहाराचा पत्ता व कायमस्वरुपी पत्ता एकच आहे काय? होय / नाही
 • होय असेल तर पत्रव्यवहारचा पत्ता अपोआप भरलेला दिसेल.
 • नाही असे म्हंटलं तर… पुन्हा खालील बाबी भराव्या लागतील….
 • पत्ता – येथे निवासी पत्ता लिहावा
 • राज्य – महाराष्ट्र
 • जिल्हा – पुणे (आपला जिल्हा निवडावा)
 • तालुका – खेड (आपला तालुका)
 • गाव / शहर – (राहत गावाचं/शहराचं नवा)
 • पिन कोड – ६ अंकी पिनकोड नंबर (पिनकोड जर माहित नसेल तर google मध्ये जाऊन शोधावा)
 • माहिती पूर्ण बरोबर असल्याचा पडताळा करून घ्या आणि “जतन करा” या बटन वर क्लिक करून पुढे जा…

शेत जमिनीचा तपशील –

 • (आपल्या मालकीची शेतजमीन एका पेक्षा जास्त गावात असल्यास प्रत्येक गावातील शेत जमिनीची माहिती सर्व्हे नंबर निहाय भरावी.)
 • आपल्याकडे एका पेक्षा अधिक गावांमध्ये जमीन आहे का? होय / नाही (असल्यास तपशील द्या)
 • राज्य – महाराष्ट्र
 • जिल्हा – जिथे आपली जमीन आहे तो सिलेक्ट करा
 • तालुका – आपला तालुका
 • गाव / शहर –
 • 8 ए खाते तपशील (वर निवडलेल्या गावासाठी)
 • 8 ए खाते क्रमांक – आपल्या जमिनीचा खाता क्रमांक
 • कृषी जमीन क्षेत्र (हेक्टर आणि आर) – खात्यावर असलेली जमीन
 • 7/12 उता-य़ाचा तपशील -:
 • सर्वेक्षण क्रमांक / गट क्रमांक -: आपल्या जमिनीचा गट क्रमांक
 • वैयक्तिक मालकी (हेक्टर आणि आर) – मालकीचा प्रकार आणि जमीनीचं निर्धारित क्षेत्र
 • संयुक्त मालकी (हेक्टर आणि आर) – असेल तर एकूण जमीन
 • सामायिक मालकी (हेक्टर आणि आर) – सर्वांचं मिळून असेल तर त्याचा तपशील
 • आपल्या मालकीचे एकूण क्षेत्र (हेक्टर आणि आर) – याचा तपशील वरील आधारे अपोआप येतो…
 • सिंचनाखालील क्षेत्र – आपल्या मालकीच्या क्षेत्रापैकी किती क्षेत्र संचनाखाली आहे.
 • कोरडवाहू क्षेत्र – जर सिंचनाखाली नसेल तर संपूर्ण क्षेत्र दिसतं नाहीतर सिंचनाचं वजा करून उर्वरित क्षेत्र दिसतं…

शासनाच्या योजना/ कार्यक्रम/ उपक्रमांसाठी मी पुरविलेल्या वैयक्तिक माहितीचा उपयोग करण्यास माझी सहमती आहे. मी पुरविलेली माहिती खरी असून सदर माहिती पैकी कोणतीही माहिती खोटी असल्याचे आढळल्यास मला योजनेंतर्गत कोणताही लाभ घेण्यास अपात्र ठरविण्यात येईल याची मला कल्पना आहे.

mahadbt login, mahadbt applicant login, mahadbt portal, aaple sarkar mahadbt, aaple sarkar dbt, aaple sarkar dbt portal, aaple sarkar dbt portal login,
जर अजून कुठेही जमीन असेल तर त्याचा तपशील देण्यासाठी
 1. त्याच गावातील अन्य सर्व्हेक्षण क्रमांकाची माहिती सादर करण्यासाठी पर्याय १ निवडा
 2. अन्य गावातील शेत जमिनीचा तपशील देण्यासाठी पर्याय २ निवडा
 3. अन्यथा पुढे जा हा पर्याय निवडा

अशा प्रकारे आपण आपल्या प्रोफाईलची संपूर्णता पूर्ण करून…. mahadbt अंतर्गत येणा-या कृषी योजनेसाठी पात्र ठरतो.

mahadbt login, mahadbt applicant login, mahadbt portal, aaple sarkar mahadbt, aaple sarkar dbt, aaple sarkar dbt portal, aaple sarkar dbt portal login,

mahadbt : एक शेतकरी – एक अर्ज

केवळ एकाच अर्जाद्वारे कृषी विभागाच्या विविध योजनांमधील सर्व बाबींना अर्ज करण्याची सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. शेतकरी बांधवांनी पोर्टलवरील उपलब्ध बाबींपैकी आपल्या पसंतीच्या बाबी प्रथमतः निवडाव्यात व त्यांचा अर्जात समावेश करावा. आपल्या पसंतीच्या सर्व बाबी निवडून झाल्या नंतरच ‘अर्ज सादर करा’ या बटनवर क्लिक करावे. अशाप्रकारे, आपण निवडलेल्या सर्व बाबींसाठी एकच अर्ज तयार होईल व या बाबींसाठी ज्या-ज्या योजनेतून लाभ देणे शक्य असेल त्या पैकी कोणत्याही एका योजनेतून ऑनलाईन लॉटरीद्वारे लाभ देण्यात येईल.

mahadbt login, mahadbt applicant login, mahadbt portal, aaple sarkar mahadbt, aaple sarkar dbt, aaple sarkar dbt portal, aaple sarkar dbt portal login,

कृषी यांत्रिकीकरणासाठी अर्ज भरण्यासाठी (All * marks fields are mandatory)  

यंत्रणा / अंमलबजावणी निवडा – तालुका आणि गाव हे घटक आपल्या पहिल्या माहितीतून येतात, जर आपली जमीन १ पेक्षा गावात असेल तरच आपल्याला गाव हा घटक निवडावा लागतो. 

मुख्य घटक – (खालील पर्यायापैकी एकाची निवड करा)
 1. कृषी यंत्र औजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य
 2. भाडे तत्वावरील सेवा सुविधा केंद्र ( जर आपण हा पर्याय निवडला तर यालाही २ पर्याय आहेत १) उच्च तंत्रज्ञान, उत्पादन सेवा सुविधा केंद्राची स्थापना २) कृषी अवजारे बँकेची स्थापना)
तपशील (खालील पर्यायापैकी एकाची निवड करा)
 1. काढणी पश्चात तंत्रज्ञान
 2. ट्रॅक्टर
 3. ट्रॅक्टर/पॉवर टिलर चलित औजारे
 4. प्रक्रिया संच
 5. पॉवर टिलर
 6. फालोत्पादिन यंत्र औजारे
 7. बैलचलित औजारे
 8. मनुष्य चलित औजारे
 9. वैशिष्ट्येपूर्ण औजारे
 10. स्वयं चाळीत औजारे
 • व्हील ड्राइव्ह प्रकार निवडा – (जर आपण ट्रॅक्टर निवडला तरच हा पर्याय active होतो)  
 • एचपी श्रेणी निवडा – (यामध्ये यंत्राची पावर निश्चित केलेली असते.)  
 • यंत्रसामग्री, अवजारे / उपकरणे – (यामध्ये निश्चित हवं ते यंत्र / अथवा अवजार) उदा. कापणी यंत्र
 • प्रकल्प खर्च श्रेणी – (जोपर्यंत आपला लॉटरीमध्ये आपला क्रमांक लागत नाही तोपर्यत हा बंदच असतो) 
 • मशीनचा प्रकार – (यामध्ये अनेक प्रकरच्या मशीन असतात, आपल्याला हवी ती आपण निवडावी) उदा. बटाटा काढणी यंत्र
 1. मी पूर्व संमतीशिवाय कृषी यंत्र / औजारांची खरेदी करणार नाही, पूर्व संमतीशिवाय खरेदी केल्यास मी अनुदानास पात्र असणार नाही याची मला जाणीव आहे.
 2. माझ्या कुटुंबातील सदस्याच्या / माझ्या मालकीचा ट्रॅक्टर / पॉवर टिलर आहे
 3. वरील दोन्ही पर्यायांपुढील चौकटीत टिक करा.
 4. आणि जतन या बटनाला क्लिक करून माहिती जतन करा.
 5. माहिती जतन केल्याबरोबर त्याच विंडोमध्ये अजून एक पट्टी दिसू लागते त्यावर ज्या यंत्रासाठी मागणी केली आहे. त्याचा तपशील पहायला मिळतो.
 6. तो योग्य असल्यास “मेनूवर जा हा पर्याय निवडा”
 7. आपण पुन्हा “एक शेतकरी : एक अर्ज” या पानावर येतो.

आपल्या पसंतीच्या सर्व बाबी निवडून झाल्या आहेत म्हणून “अर्ज सादर करा” या बटनाला क्लिक करून      

mahadbt login, mahadbt applicant login, mahadbt portal, aaple sarkar mahadbt, aaple sarkar dbt, aaple sarkar dbt portal, aaple sarkar dbt portal login,

जोडले घटक यादी

सूचना: आपण ज्या बाबींसाठी अर्ज केलेला आहे त्या करिता ऑनलाईन सोडत पद्धतीने आपली निवड झाल्यास आपणास पुढील कागदपत्रे सादर करावी लागतील.
 1. आपल्या शेतजमिनीचा ७/१२ उतारा व ८-अ उतारा
 2. आपण अनुसूचित जाती / जमाती प्रवर्गातील अर्जदार असल्यास जातीचे प्रमाणपत्र
 3. अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील अर्जदारांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अथवा बिरसा मुंडा कृषी क्रांती योजने अंतर्गत अर्ज केला असल्यास अर्जदाराचा उत्पन्नाचा दाखला
 4. आपली ज्या बाबीसाठी निवड होईल त्याच्याशी निगडित अन्य कागदपत्रे(या बाबतच्या सूचना सोडतीनंतर मोबाईल क्रमांकावर कळविण्यात येईल).

In conclusion : याठिकाणी आपल्या अर्जाच्या दोन्ही बाजू पूर्ण झाल्या असल्याने सरकारी नियमानुसार असणारी फी (Payment) आपल्याला क्रेडीट/ डेबिट कार्ड, UPI Net Banking एखादा पर्याय निवडून पेमेंट भरावे. तरच आपली mahadbt अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाली असेल गृहीत होते.

- Advertisement -
Marathi Guidehttps://marathitrailer.com/
Has come a long way from its beginnings in Maharashtra. When Group of Marathi Trailer first started out, their passion for helping Farmers and help them to start their own business.
- Advertisment -

Most Popular

college reopen | अखेर महाविद्यालये सुरू झाली…

Maharashtra college reopen : "बागेत फुले आणि महाविद्यालयात मुले नसतील तर दोन्हीही ठिकाणे बेरंगीच! गेल्या १८ महिन्यांपासून covid-19 च्या प्रादुर्भावामुळे केंद्र सरकारने "लॉकडाऊन" लावला...

what is beat reporting / बीट रिपोर्टिंग म्हणजे काय?

what is beat reporting / बीट रिपोर्टिंग म्हणजे काय? बीट रिपोर्टिंग, यालाच विशेष अहवाल/रिपोर्ट म्हणूनही ओळखले जाते. हा पत्रकारितेचा एक महत्त्वपूर्ण प्रकार आहे. जो एका...

Recent Comments

Related eBooks