Laxmii Review: लक्ष्मीच्या ‘भावनात्मक वेदनेने’ घातला प्रेक्षकांच्या काळजाला हात… “लक्ष्मी बॉम्ब”, या चित्रपटाचे प्रमोशन पासून ट्रेलरपर्यंत हे प्रेक्षकांना कळून चुकलं होतं की, ही “लक्ष्मी” नावाच्या एका किन्नर “ट्रान्सजेंडर” ची गोष्ट आहे. आणि त्या लक्ष्मीची भूमिका “अक्षय कुमार” ने केली आहे. शिवाय हा सिनेमा भूतप्रेत, बुरी आत्मा, यावर आधारित असून. कांचना या साऊथच्या मुव्हीचा रिमेक आहे. यावर प्रेक्षकांनी देखील ‘अक्षय कुमार’ या आगळ्यावेगळ्या भूमिकेचं जोरदार स्वागत केलं. (हा… काही प्रमाणात हिंदू संघटनांनी काहीसा विरोध केल्याने, दिग्दर्शक आणि प्रोड्युसर यांनी चित्रपटाचं नाव बदललं.)

मुव्हीच्या सुरवातीला एका सोसायटी मध्ये रहाणा-या दोन मुलींना आपल्या सोसायटीच्या बाजूला असणा-या मोकळ्या जागेवर काहीतरी असल्याची जाणीव होते. त्याचवेळी एका मुलीचा लाल रंगाचा वाळत घातलेला दुपट्टा उडून नेमका त्याच मोकळ्या मैदानावर पडतो. ज्या मुलीचा दुपट्टा आहे ती तो घेऊन घरात येते, तेंव्हापासून तर तिला प्रत्येक गोष्टीत भास व्हायला सुरवात होते. अचानक एके रात्री एक ‘काळा साया’ तिच्या पायाला धरून तिला खेचत खेचत त्याच जागी घेऊन येतो. जेथून तिने दुपट्टा उचललेला असतो. तिला काही समजण्याच्या आतच बाजूला पडलेली झाडाचे लाकूड उचलून तिच्या पोटात मारले जाते. आणि ती किंचाळून जागी होते. शांत झाल्यावर ती आपल्या पोटुशी असणा-या मोठ्या बहिणीला सर्व प्रकार सांगते. तेंव्हा ती त्या लाल रंगाच्या दुपट्ट्याला उचलून पुन्हा फेकून देते. बस्स हाच एकमेव सीन आहे जो प्रेक्षकांच्या अंगावर येतो आणि त्यांच्या अपेक्षा वाढवतो.
परंतु त्यानंतर मात्र पूर्ण फॅमिली ड्रामा चालू होतो. हिंदू घराण्यातली मुलगी पळून जाऊन एका मुस्लीम समाजातील मुलाबरोबर लग्न करते. त्यामुळे तिच्या वडिलांनी तीचं नावाचं टाकून दिलं आहे. त्या मुस्लीम मुलाचा मोठा भाऊ आणि भावजय यांचा एका कार अपघातात मृत्यू झाल्याने त्यांचा मुलगा या दोघांच्या सोबतच राहत आहे. तर इकडे त्या मुलीचे आई-वडील भाऊ दीपक आणि त्याची बायको व त्यांचा एक मुलगा. हे पाचच मंडळी एका अलिशान घरात राहत असतात.
आईला मुलीविषयीचं प्रेम जागं होतं आणि आपल्या मुलीला आणि जावयाला त्यांच्या लग्नाच्या २५व्या वाढदिवसाला बोलावते. ते जेंव्हा मुलीच्या माहेरी येतात तेंव्हा त्याच मोकळ्या जागेच्या गेटसमोर यांच्या गाडीतून एक बॅग खाली पडते. आता काहीतरी घडणार असं वाटत असताना काहीच घडत नाही येथे प्रेक्षकांचा भ्रमनिरास होतो. तरीही वाटत राहत आता काहीतरी घडेल. पण तसं काहीच घडत नाही.
शेवटी हिंदू कुटुंबात मुस्लीम जावयाला स्वीकारलं जातं आणि त्याच वेळी भयपटाचा खेळ सुरु होतो. आपल्या सास-यासाठी गवतीचहा बनवण्यासाठी अक्षय कुमार घराबाहेरील कुंडीतून गवताची काही पती आणून चहात टाकतो. तो उकळलेला चहा आपल्या सास-याला देणारच तर पुतण्या हिंदू मुस्लीम वरून डोंघानाही tont करतो. त्यामुळे सास-याचा स्वाभिमान दुखवतो आणि “मला शुगर आहे, मी गोड खात नाही”, ही सबब देऊन चहा न पिताच निघून जातो. आता आपण बनवलेल्या चहाच काय करायचं म्हणून तो जावई तो चहा पितो. त्याचबरोबर त्याच्या शरीरात एका अज्ञात शक्तीचा शिरकाव होतो.
आपल्या सासू-सास-याच्या २५व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण कुटुंब खरेदीला एका साड्यांच्या दुकानात जातात. आणि ख-या अर्थाने आपल्या जावयातील बदल त्या कुटुंबाला दिसू लागतात. लाल साड्यांचा त्याच्यावर प्रभाव पडतो तसा तो बाईच्या लाडील आवाजात बोलू लागतो. “ये हलकट” या शब्दावर जावयाच्या हरकतीचा सगळ्यांनाच अदमास येतो. काही वेळाने त्याच्यातील त्या अज्ञात शक्तीचा असर कमी होताच तो पुन्हा आपल्या पहिल्या अवतारात येतो. आपल्या अंगावरील साडी पाहून, “लाज नाही वाटत आपल्या जावयाची अशी मस्करी करयाला”. म्हणत सगळ्यांना ओरडून निघून जातो.

सिनेमातील पुढील सगळे सीन फक्त अक्षय कुमारच्या आतील अज्ञात शक्तीच्या असण्यावर खर्ची पडतात. पण धड ना कॉमेडी होते ना भीती वाटते. तेवढ्यात एका पीर बाबाच्या (मुस्लीम बाबा) येण्याने भयाची मालिका चालू होते. पण जास्त काहीही न घडता तो त्या अज्ञात शक्तीला वश मध्ये करतो.
येथून सुरु होतो लक्ष्मीचा खरा प्रवास. आपल्या मुलाचे हावभाव किंवा त्याचं राहणीमान हे मुलींप्रमाणे आहेत. आणि त्याने समाजात आपली छी तू होईल याच एका सामाजिक भीतीमुळे तो आपल्या मुलाला घरातून चपला मारून हुसकावून देतो. त्याच वेळी एका मुस्लीम माणसाला त्या “अर्धनारीनटेश्वराची” दया येते आणि तो त्याला आसरा देतो. त्याच दिवशी लक्ष्मण चा लक्ष्मी होतो आणि मुलगा आपल्या आवडत्या वेशात राहू लागतो. त्याच्यासारख्या एका मुलाला आसरा देऊन त्याला शिकवण्याची जबाबदारी “लक्ष्मी” घेते. त्याला शिकवते, मोठे करते आणि आपणही या समाजातील आपल्या सारख्या मुलांसाठी काहीतरी करायला हवं म्हणून एक जमीन विकत घेते. त्यावर शाळा, वसतिगृह आणि बरंच काही चालू करायचं असतं. लक्ष्मीच्या मुलाची सत्कार समारंभाला “लक्ष्मीचं भाषण” म्हणजे या चित्रपटाचा आत्मा. “आम्हीही माणसं आहोत, आम्हांलाही माणसाप्रमाणे जगण्याची इच्छा आहे, फक्त तुम्ही जगू द्यावं.” जसं मुलगा किंवा मुलगी तुम्ही स्वीकारताना तसचं ट्रांजेंडर यालाही स्वीकारा, हे भावनिक आवाहन करत लक्ष्मी थांबते.
त्यानंतर तिची जागा एक बिल्डर बळकावतो, त्या जागेसाठी तिचा खून करतो आणि त्याच जमिनीत तिला गाडतो. तीच मोकळी जमीन म्हणजे ती मोकळी जागा. लक्ष्मीची गोष्ट संपते पण तिचा इच्छा अधुरीच राहते. अशा तृतीयपंथी लोकांसाठी काहीतरी करायची. तो पीर बाबा लक्ष्मीचा आत्मा बाटलीत बंद करून बाटली समुद्रात फेकून देतो. पण अक्षयच्या आत घुसमट चालू होते. आणि तो हातातला तावीज काढून फेकून देतो, तसा लक्ष्मीचा बंद आत्मा पुन्हा त्याच्यात येतो. मग पुढे फक्त सूडनाट्य.

या संपूर्ण चित्रपटात शेवटच्या फक्त १५ मिनिटांसाठी आलेला शरद केळकरचा “लक्ष्मी” भाव खाऊन जाते, प्रेक्षकांना अक्षयचाही विसर पडायला भाग पडतो. काही वर्षांपूर्वी दामिनी नावाचा एक सिनेमा आला होता. चित्रपटाचा हिरो, ऋषी कपूर, हिरोईन मीनाक्षी शेषाद्री आणि व्हिलन अमरीश पुरी. चित्रपटाच्या शेवटाला एका दारुड्या वकिलाची एन्ट्री होते आणि अख्ख्या चित्रपट खाऊन जाते. अगदी राष्ट्रपती पुरस्कार देखील घेवून जाते. असचं आज वाटतंय, भलेही सिनेमा चालला नाही. समीक्षकांनी त्याला कमी रेटिंग दिलं असेल. तरीही कुणीही लक्ष्मीला विसरलेलं नाही. तिच्या भावनेला डावलेलेलं नाही हेच या चित्रपटाचं खरं यश.

टीप :- हा चित्रपट साऊथचा चित्रपट “कंचना” याचा रिमेक आहे. पण कंचना हा एक भयपट आहे.
एक भेट अशाच एका “लक्ष्मीशी”
[…] thing that makes this movie even more entertaining than it should be is that no one ever really questions the logic behind […]