Home Agriculture Kisan Credit Card?

Kisan Credit Card?

“Kisan Credit Card” : आत्मनिर्भर भारत अंतर्गत किसान क्रेडिट कार्ड देण्याची योजना भर सरकारने फेब्रुवारी २०२० चालू केली. देशाच्या शेतक-यांचे उत्पन्न वाढवायचे असेल तर त्यांना फक्त सम्मान निधी देऊन उपयोग नाही तर त्यांना शेतीपूरक व्यवसायात वाढ करायला हवी. म्हणजे जरी निसर्गाच्या लहरीपणाने शेती पिकाचे नुसकान झाले तरी शेतकरी आपल्या पूरक व्यवसायाने स्वत:ला सावरू शकतो. अन्यथा निसर्गाने झोडपलेला शेतकरी फक्त सरकारी मदतीची वाट पाहतो आणि वेळेत मदत न मिळाल्यास स्वत:चा आत्मघात देखील करून घेतो.    

आज भारताची संपूर्ण अर्थव्यवस्था हे शेती आणि शेतीपूरक व्यवसायावर अवलंबून असेल तर आपण देखील त्या अर्थव्यवस्थेचा कणा मजबूत करायला हवा. याच भविष्याच्या विचारातून किसान क्रेडीट कार्ड बिनव्याजी पशुधन कर्ज या संकल्पनेची सुरवात झाली.     

 1. किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय?
 2. या कर्जासाठी कोण अर्ज करू शकते?
 3. किसान क्रेडीट कार्ड या योजनेची ठळक वैशिष्ट्ये?
 4. लागणारी आवश्यक कागदपत्रे?
pm kisan credit card,pashu kisan credit card apply online,kisan credit card pdf,kisan credit card online apply maharashtra,kisan credit card form,kisan credit card apply online csc,kisan credit card online apply bihar,sbi kisan credit card
pm kisan credit card,pashu kisan credit card apply online,kisan credit card pdf,kisan credit card online apply maharashtra,kisan credit card form,kisan credit card apply online csc,kisan credit card online apply bihar,sbi kisan credit card

याविषयीची सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊ.

kisan credit card scheme : किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय?

किसान क्रेडिट कार्ड म्हणजेच (केसीसी) ही एक केंद्र शासनाची देशव्यापी योजना आहे. जिचा उद्देश शेतकऱ्यांना शेती आणि शेतीला पूरक व्यवसायांसाठी आर्थिक मदत करणे हा आहे. आजपर्यंत केसीसीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फक्त बी-बियाणे, खतं, कीटकनाशकं इ. शेतीच्या कामांसाठी कर्ज दिलं जातं असे. परंतु 2018-19च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर शेतक-यांचे उत्त्पन्न दुप्पट करण्याच्या दुष्टीकोनातून एक पाऊल उचलण्यात आले. ज्याप्रमाणे KCC मधून शेती करण्यास कर्ज उपलब्ध करून दिले जाते. त्याच प्रमाणे शेतीला पूरक   पशुपालन (शेळीपालन, मेंढीपालन कुक्कुटपालन इ.) आणि मत्स्यपालन (animal husbandry and fisheries) करणाऱ्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ देण्यात यावा. जेणेकरून प्रत्येक शेतकरी हा फक्त शेतीवर निर्भर न रहाता, शेतीपूरक व्यवसायातून आपल्या आत्मनिर्भरतेला संधी मिळेल.   

या कर्जासाठी कोण अर्ज करू शकते?

ज्या शेतक-यांनि स्वत:ला “पंतप्रधान किसान सम्मान योजने”च्या अंतर्गत नोंदणीकृत केले आहे. तो प्रत्येक शेतकरी अथवा शेतमजूर या योजनेसाठी लाभार्थी ठरू शकतो. जरी आपण पंतप्रधान किसान योजनेचे लाभार्थी नसाल तरी या योजनेसाठी पात्र ठरू शकता. त्यासाठी आपल्याला आपण किसान सम्मान योजनेचे लाभार्थी नसल्याचे बँकेला सांगावे लागते.  

kisan credit card benefits : किसान क्रेडीट कार्ड या योजनेचे फायदे आणि ठळक वैशिष्ट्ये

 1. ही केंद्र सरकारची योजना असल्याने सर्व राष्ट्रीय बँकांना या योजने अंतर्गत शेतक-यांना मदत करणे बंधनकारक आहे.  
 2. शेतक-याकडील जमिनीच्या क्षेत्रफळावरून त्याच्या क्रेडीटची मर्यादा ठरवली जाते. किमान मर्यादा १लाख तर कमाल मर्यादा ३लाख रुपये आहे.
 3. १ लाख रुपयांपर्यंतचं कर्ज बिनव्याजी व विनातारण दिले जाते.
 4. १.६० लाखापर्यंत कर्ज हे अल्पव्याजी (४%) आहे.
 5. तर १.६० पेक्षा म्हणजेच ३ लाखांसाठी व्याजदर ७ % तर तारण ठेवणे अनिवार्य आहे.     
 6. या कर्जावरील व्याजदर हा ७% आहे परंतु कर्जाची रक्कम १ वर्षात फेडल्यास त्यात ३% सूट मिळून फक्त ४% व्याज भरावे लागते.
 7. किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत लोन घेणाऱ्या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाला किंवा अपंगत्व आलं, तर त्याला 50 हजार रुपयांचं विमा संरक्षण दिलं जातं, तसंच इतर धोक्यांसाठी 25 हजार रुपयांचं विमा संरक्षण दिलं जातं.
 8. या संपूर्ण प्रक्रियेसाठी बँक कोणतेही शुल्क (फी) आकारात नाही.

आवश्यक कागदपत्रे

 1. जमिनीच्या ७/१२ आणि ८-अ चा उतारा.
 2. अन्य कर्ज न घेतल्याचं शपथपत्र,
 3. आधार कार्ड,
 4. पॅन कार्ड
 5. तीन पासपोर्ट साईज फोटो.

In Conclusion : निष्कर्ष

शेतक-यांचे दरडोही उत्पन्न वाढवायचे असेल तर त्याला पशुधनाचा सांभाळ केल्याशिवाय पर्याय नाही. पशुधन हे शेतक-यांचे हक्काचा बेअरर चेक आहे जो केंव्हा वठवू शकतात. शिवाय पशुधनाचा नीट वापर केल्यास त्याला नियमित उत्पन्न मिळता राहते. म्हणजे त्याला छोट-छोट्या गोष्टींसाठी इतरांवर अवलंबून राहावे लागत नाही. मग दुग्ध व्यवसायासाठी गायी अथवा म्हैस पालन असो. मांस विक्रीसाठी केलेलं शेली-बकरी-वराह (डुक्कर)-कुक्कुटपालन-बदकपालन असो. अथवा अंडी निर्मितीसाठी केलेलं परसबागेतील गावरान कोंबडी पालन असो. किंवा मत्सपालन आणि त्यावर आधारित केलेलं बदकपालन असो. हे सगळे शेतक-याला आर्थिक विकासाला हातभार लावणारे घटक तर आहेत. परंतु यांनाच व्यवसायिकतेतून केलं तर यातून मोठा आर्थिक लाभ देखील शेतक-याला मिळू शकतो. तरीही या सर्वांसाठी लागतं भांडवल आणि शेतक-याकडे नसल्याने तो हा आर्थिक उन्नतीचा मार्ग निवडू शकत नाही. म्हणूनच भारत सरकारने “किसान क्रेडीट कार्ड” ही योजना आणून शेतक-यांना स्वयंपूर्ण करून आत्मनिर्भर करण्याचा मानस केला आहे. शेतक-यांनी याचा फायदा घेवून स्वत:च्या विकासाबरोबर देशाला आर्थिकदृष्ट्या सबळ बनवायला हवं.        

किसान क्रेडीट कार्डसाठी अर्ज कसा करावा?           

Marathi Guidehttps://marathitrailer.com/
Has come a long way from its beginnings in Maharashtra. When Group of Marathi Trailer first started out, their passion for helping Farmers and help them to start their own business.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

18-Step On-Page SEO Checklist

On-Page SEO म्हणजे ग्राहक मिळवण्याच्या दृष्टीकोनातून आपल्या वेबपेज किंवा ब्लॉग-पोस्टची सर्च इंजिनला हवी असणारी अनुकूल मांडणी. या मांडणीमध्ये शोधलेली कीवर्ड्स आणि सर्च...

How to tweet?

एखाद्या गोष्टीवर आपलं लिखित स्वरूपातून, इंटरनेटच्या माध्यमातून “मत” प्रदर्शित करणे यालाच Tweet असे म्हणतात. ते ट्विट हे थेट एखाद्या व्यक्तीच्या किंवा संस्थेच्या...

How to open Twitter Account?

Twitter Account : ट्विटर हे इंटरनेट SMS सुविधा असली तरी तिचा थेट माणसाच्या विचारावर परिणाम होतो. याचा अर्थ असा की लोक प्रवासात...

SEO म्हणजे काय ?

Seo, what is seo, seo full form, on page seo, off page seo, seo course, seo meaning, seo services, seo tutorial, seo tools, google seo, seo company,

Recent Comments