Pm Kisan Credit Card apply करण्याच्या दोन पद्धती आहेत Online आणि Offline. या दोन्ही पद्धतीने शेतक-यांना या योजनेसाठी फॉर्म भरता येतो. आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे किसान क्रेडीट कार्ड हा अर्ज फक्त पीएम-किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी नाही. जरी तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी नसाल तरी तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड मिळवता येते. त्यासाठी तुम्ही बँकेत गेला आणि सांगितलं की, तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी नाही. परंतु आम्हांला किसान क्रेडिट कार्ड काढायचे आहे, तर तिथं तुम्हाला इंडियन बँक असोसिएशननं कृषी कर्जासाठी बनवलेला स्टँडर्ड फॉरमॅटमधील अर्ज देतात. तुम्ही तो फॉर्म भरून, योग्य कागदपत्रांसहित बँकेतच सबमिट करायचा असतो. हे झालं ऑफलाईन अर्ज करण्याच्या बाबतीत. पण, किसान क्रेडिट कार्डसाठी ऑनलाईन पद्धतीनंही अर्ज करता येतो. त्यासाठी मात्र शेतक-याला मात्र CSC सेंटरलाच जावे लागते.

Pm Kisan Credit Card : किसान क्रेडीट कार्डचा ऑफलाईन अर्ज कसा भरायचा?
शेतक-याला बँकेतून एक फॉर्म (अर्ज) मिळतो. या फॉर्मच्या सगळ्यात वरती “टू ब्रँच मॅनेजर” आहे. त्याखाली आपण ज्या बँकेत हा अर्ज करणार आहोत, त्या बँकेचं नाव आणि शाखेचं नाव लिहावे.
फॉर्मचा “A” : फॉर ऑफिस यूझ
त्यानंतर अर्जातील “A” या भागासमोर “फॉर ऑफिस यूझ”(फक्त कार्यालयीन कामाकरिता) लिहिलं आहे. या भागातील माहिती बँक भरणार आहे. शेतकऱ्यांनी यात कुठल्याही स्व्रुपतिअल माहिती भरू नये..
फॉर्मचा “B” : किसान कार्ड विषयी
“B” या भागात तुम्हाला कोणत्या प्रकारचं केसीसी हवं आहे. जसं की केसीसी नवीन नोंदणी, जुनं केसीसी पण त्याची कर्ज मर्यादा वाढवायची आहे. अथवा पूर्वी KCC काढलं होतं परंतु काही कारणानं केसीसी बंद पडलं असेल, तर पुन्हा सुरू करणे. (त्याची तृती दूर करून अपडेट करून चालू करणे) त्यानंतर आता किती रुपयांचं कर्ज हवंय त्या रकमेच्या आकडा लिहावा.
फॉर्मचा “C” : वैयक्तिक माहिती
“C” या भागात अर्जदाराचं नाव, पीएम-किसान सन्मान योजनेचे पैसे (वार्षिक ६००० रुपये) ज्या बँक खात्यात जमा होतात, तो खाते क्रमांक. जर का शेटकर-याला प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजनेचा लाभ घ्यायचा आहे. त्यांनी इन्शुरन्स त्यासमोरच्या “YES” या पर्यायाला टिक करावं.
जेंव्हा आपण इन्शुरन्सचा पर्याय चालू करतो. तेंव्हा प्रतीवर्षी प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजनेसाठी 12 रुपये (वार्षिक) आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजनेसाठी 330 रुपये (वार्षिक) म्हणजे एकूण 342 रुपये तुमच्या खात्यातून वजा केले जाणार आहेत. मात्र या दोन्ही योजनांसाठी शेतक-याला 2 लाख रुपयांचं विमा संरक्षण मिळणार आहे.
फॉर्मचा “D” : फॉर ऑफिस यूझ
“D” या रकान्यात शेतक-याने त्याने घेतलेल्या सध्याच्या कर्जाचा तपशील द्यायचा आहे. त्यामध्ये कोणत्या बँकेकडून कर्ज घेतलंय, कर्ज घेतलेल्या शाखेचं नाव, कर्जाची शिल्लक रक्कम आणि काही थकबाकी असेल तर, तेही नमूद करायचं आहे.
फॉर्मचा “E” : जमिनीचा तपशील
“E” या रकान्यात जमिनीचा तपशील द्यायचा आहे. यात गावाचं नाव, सर्वे किंवा गट क्रमांक, जमीन मालकी हक्काची आहे की, भाडेतत्वावर फक्त कसण्यासाठी घेतलेली आहे. अथवा आपल्या सामायिक मालकीची आहे. जे योग्य असेल तो पर्याय टिक करायचा आहे. शेवटी शेतक-याची एकूण शेतजमीन एकरमध्ये आणि खरीप, रबी आणि इतर कोणती पीकं घेतली जातात, त्याबद्दल इत्यंभूत माहिती द्यायची आहे.
फॉर्मचा “F” : पशुपालनाची माहिती
“F” रकाना हा मत्स्यपालन आणि पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठीचा आहे. यात शेतक-याकडे एकूण दुध देणारे प्राणी(गाय व म्हैस), शेळ्या आणि मेंढ्या, डुकरं (पाळीव) तसंच कोंबड्या (व्यावसायिक) किती आहेत, यांची पुरेपूर माहिती द्यायची आहे.
किसान क्रेडीट कार्ड म्हणजे काय?
त्या खालोखालच्या रकान्यात आपण मत्स्यपालन शेततळ्यात करत आहात (इनलँड फिशरिज म्हणजे टँक, पाँड). अथवा समुद्रात जाऊन मासेमारी (मरिन फिशरिज ) करत आहात त्याची माहिती द्यायची आहे.
फॉर्मचा “G” : गहाणखता संबधी
“G” हा सिक्युरिटीचा रकाना आहे. बँकेकडून कर्ज घेताना शेतकरी बँकेला गहाणखत म्हणून काय मालमत्ता देणार, त्याची माहिती. सगळ्यात शेवटी शेतक-याची सही करायची (शक्यतो तीही बँकेत असणारी).
या रकान्यातील शेवटचा पर्याय म्हणजे Acknowledgment. हा भाग बँकेने भरायचा असतो. त्यात शेतकऱ्याने स्वत:हून कोणतीही माहिती भरायची आवश्यकता नाही.
हा अर्ज भरल्यानंतर शेतकऱ्यांनी त्याची प्रिंट-आऊट घेऊन बँकेत भरण्यासाठी जायचं आहे. त्यासोबत आपल्या जमिनीचा सातबारा उतारा आणि 8-अचा उतारा जोडावा. (तलाठ्याच्या सही शिक्क्यावाला अथवा डिजिटल सिग्नेचर असणारा). त्याचबरोबर दुसऱ्या बँकेतून कर्ज न घेतल्याचं शपथपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि तीन पासपोर्ट साईज फोटो. ही कागदपत्रं देखील बँकेत भरावी लागणार असल्याने ती बरोबर घेऊनचं जावे.
एकदा शेतक-याने ही कागदपत्रं बँकेत जमा करावीत. जेणेकरून पुढच्या दोन आठवड्यात शेतक-याच्या पत्त्यावर बँकेनं हे KCC कार्ड पाठवायला हवं, असं सरकारचा स्पष्ट आदेश आहे. केसीसी हे DBTसाठी शेतकऱ्याच्या बचत खात्याशी लिंक केलेलं असतं. त्याची वैधता 5 वर्षं आहे, तरी दरवर्षी ते ‘रिन्यू’ करणं देखील गरजेचं आहे.
किसान क्रेडिट कार्ड मिळवण्याची ही सगळी प्रक्रिया निशुल्क करण्यात आली आहे. 3 लाख रुपयांपर्यंतच्या कर्ज प्रक्रियेसाठी बँकांनी शेतक-याकडून कोणतेही शुल्क आकारू नये, असे स्पष्ट आदेश इंडियन बँक असोसिएशननं दिले आहेत.
आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे वरील अर्ज फक्त पीएम-किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आहे. पण, याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी नसाल तर तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड मिळणार नाही. तुम्हालाही किसान क्रेडिट कार्ड मिळेल.
त्यासाठी तुम्ही बँकेत गेला आणि सांगितलं की, “आम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी नाही, परंतु आम्हांला किसान क्रेडिट कार्ड हवं आहे. तर ते तुम्हांला इंडियन बँक असोसिएशननं कृषी कर्जासाठी बनवलेला स्टँडर्ड फॉरमॅटमधील अर्ज देतात. तुम्ही तो फॉर्म भरून कागदपत्रांसहित बँकेत सबमिट करू शकता.
हे झालं ऑफलाईन अर्ज करण्याच्या बाबतीत. पण, किसान क्रेडिट कार्डसाठी ऑनलाईन पद्धतीनंही अर्ज करता येतो.
online – PM kisan credit card apply
ज्यांना ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. त्यांनी CSC (Common Service Centre) किंवा आपले सरकार सेवा केंद्रावर जाणं गरजेचं असतं. कारण ही फॅसिलिटी फक्त त्यांच्याच पोर्टलवर उपलब्ध आहे. वैयक्तिकरित्या शेतकरी किसान क्रेडिट कार्डसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करू शकत नाही. त्यासाठी त्यांना CSC किंवा आपले सरकार सेवा केंद्रावरच जावं लागतं. तिथं जाऊन क्रेडिट कार्डसाठीचा फॉर्म भरावा लागतो. पण, हे करत असताना शेतकऱ्यांकडून एक ठरावीक शुल्क आकारलं जातं.
in short : आज प्रत्येक शेतक-याने शेती बरोबर शेतीला पूरक असणा-या पशुपालन व्यवसायाकडे देखील वळायला हवे. जेणेकरून शेतीला पूरक असणा-या सेंद्रिय खताची गरज भागवता येते. शिवाय त्यामुळे जमिनीची उपजकता (उपजाऊपणा) मोठ्या प्रमाणात वाढवला जातो. तेंव्हा ज्यांना शक्य असेल आणि मुळात आवड असेल त्यांनी पशुपालानासाठी तरी या किसान क्रेडीट कार्ड योजनेचा लाभ आवश्यक घेणे गरजेचं आहे.
[…] किसान क्रेडीट कार्ड कसे काढावे? […]
[…] किसान क्रेडीट कार्ड कसे काढावे? […]
http://slkjfdf.net/ – Ohoxuhata Afgoqu ale.iurh.marathitrailer.com.qnb.en http://slkjfdf.net/
http://slkjfdf.net/ – Iqkutezi Agazati mvn.mekb.marathitrailer.com.rhn.ko http://slkjfdf.net/
[…] Know how to apply to Kisan Credit Card? […]
[…] can find more information about PM Kisaan Credit Card […]