Home Festival Khun Saree ची बाजारात का आहे चलती? इथे पाहा नव्या डिजाईन्स

Khun Saree ची बाजारात का आहे चलती? इथे पाहा नव्या डिजाईन्स

Different Types Khun saree design

- Advertisement -
Khun saree, khun saree,khun saree online,khun sarees online,khun saree manufactures,khub fabric saree,khun fabric saree online
Source – Google

Khun Saree – बदलत्या जीवनशैलीनुसार साड्यांचे विविधरंगी प्रकार अस्तित्वात आले. परंतु खणाच्या साडीची (Khun Saree) चलती अजूनही कमी झाली नाही. गेल्या काही दिवसांपासून दिवाळीच्या पार्श्वभमीवर खणाच्या साडींची (Khun Saree) मागणी जोरात वाढली आहे. या साड्यांचं मॅन्युफॅक्चर (Khun Saree Manufacturer) करणाऱ्या अनेक कंपन्यांकडे खणाच्या साड्यांची मागणी होत आहे. तर रिसेलिंग करणाऱ्या अनेक महिलांनीही या साडीचीच सध्या चलती असल्याचं म्हटलं आहे. मुख्य म्हणजे टीपिकल खणाच्या साडीला छेद देत नक्षीदार खणाच्या साड्याही बाजारात उपलब्ध झाल्याने महिला ग्राहकवर्ग खणाच्या साड्यांचीच निवड करत आहेत. Why Khun sarree becoming in trend?

खणाच्या साडीचा इतिहास (History OF Khun Saree)

Khun saree

खणाच्या साडीचा इतिहास फार जुना आहे. अगदी ४०० वर्षांपूर्वीचा. चाणक्याच्या राज्यातील बायका खणाच्या साड्या परिधान करत असल्याचे इतिसाह संशोधक सांगतात. तसेच, उत्तर कर्नाटक आणि महाराष्ट्रातील विदर्भ व मराठवाडा हे खणाच्या कापडाचं माहेरघर असल्याचंही म्हटलं जातं. मध्यंतरीच्या काळात खणाचा कापड विस्मृतीत गेला होता. मात्र, काही फॅशन डिजायनर्सना या खणाच्या फॅब्रिकमध्ये नवं डिजाइन सापडलं आणि पुन्हा एकदा हे फॅब्रिक बाजारात इन झाले आहे.

मागणी का वाढली

खणाच्या साडीचा नखरा काही औरच आहे. या साडीचा इलेगन्स अत्यंत आकर्षक असल्याने प्रत्येक महिलेला खणाची साडी आपल्याकडे असावीच असं वाटतं. त्यातही Party, Traditional function, corporate function साठीही खणाची साडी बेस्ट असल्याचं अनेक महिला सांगतात. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून खणाच्या साड्यांची मागणी आणि गुगलवर सर्चिंग वाढलं आहे.

चला तर आपण बाजारात आलेल्या नव्या नक्षीदार खणाच्या साड्या पाहुयात

खणाच्या साडीवर नथीचा नखरा (designs of khun saree)

Khun saree

काही महिन्यांपूर्वी आपल्याकडे नथीचा नखरा नावाचं चॅलेंज आलं होतं. यावेळी अनेकींनी यात सहभाग घेतला होता. महाराष्ट्राच्या सौंदर्य परंपरेमध्ये नथीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळेच महाराष्ट्राची अस्सल साडी असलेल्या खणाच्या साडीवरही अनेक फॅशन डिजायनर्सने नथीचे डिजाइन केले आहे. साडीचा मिऱ्यांवर नथीची नक्षी काढण्यात आली असून काहींनी साडीच्या पदरावर नथीची नक्षी रेखाटली आहे. नथी नखरा असलेली खणाची साडी महिलावर्गांना फार आकर्षित करत आहे.

खणाच्या साडीवर सरस्वतीचं चिन्ह (Sarswati sign on khun saree)

Khun saree
Source – Google

सरस्वतीच्या चिन्हालाही आपल्याकडे फार महत्त्व आहे. म्हणूनच खणाच्या साडीवरही काही डिजायनर्सने सरस्वतीचं चिन्ह रेखाटलं आहे. खणाच्या साडीच्या पदरावर हे सरस्वतीचं चिन्ह फार उठावदार दिसतं. त्यामुळे या साडीचीही मागणी जोरात सुरू आहे.

दोन रंगांमध्ये खणाची साडी (Khun saree in two color)

Khun saree
Source – Google

एकाच रंगाच्या दोन शेडमध्ये खणाच्या साड्या उपलब्ध असतात. मात्र, हल्ली दोन विविध रंगात खणाची साडी मिळू शकते. लाल-काळी, हिरवी-लाल, गुलाबी-पिवळी अशा दुहेरी रंगात साड्या महिला वर्गांना पसंत पडत आहेत. शिवाय, काही ब्रॅण्ड्सने तिहेरी रंगातही खणाच्या साड्या डिजाईन केल्या आहेत.

खणाच्या साडीची किंमत किती? (Price Of Khun saree)

Khun saree
Source – Google

खणाच्या साध्या साडीची किंमत जवळपास बाराशे रुपयांपासून सुरुवात होते. यातही फॅब्रिक चांगल्या दर्जाचं असेल तर किंमत वाढत जाते. त्यामुळे चांगल्या दर्जाची खणाची साडी जवळपास १६०० ते १९०० रुपयांच्या किंमतीत मिळते. मात्र, नथीची नक्षी, सरस्वतीची नक्षी असलेल्या साड्यांची किंमत वाढत जाते. नथीची नक्षी असलेली साडी दोन हजारांपासून उपलब्ध आहेत. त्यातच काही ठिकाणी फॅब्रिक हलक्या दर्जाचे असेल तर नथीच्या नक्षीची साडी तुम्हाला पंधराशे रुपयांपर्यंतही मिळू शकेल. त्याचप्रमाणे, सरस्वतीचं चिन्ह असलेली खणाची साडीही दोन हजार ते बाविसशे रुपयांपर्यंत मिळू शकते. शिवाय साडीच्या फॅब्रिकनुसारही किंमत कमी-जास्त होऊ शकते.

- Advertisement -
- Advertisment -

Most Popular

college reopen | अखेर महाविद्यालये सुरू झाली…

Maharashtra college reopen : "बागेत फुले आणि महाविद्यालयात मुले नसतील तर दोन्हीही ठिकाणे बेरंगीच! गेल्या १८ महिन्यांपासून covid-19 च्या प्रादुर्भावामुळे केंद्र सरकारने "लॉकडाऊन" लावला...

what is beat reporting / बीट रिपोर्टिंग म्हणजे काय?

what is beat reporting / बीट रिपोर्टिंग म्हणजे काय? बीट रिपोर्टिंग, यालाच विशेष अहवाल/रिपोर्ट म्हणूनही ओळखले जाते. हा पत्रकारितेचा एक महत्त्वपूर्ण प्रकार आहे. जो एका...

Recent Comments

Related eBooks