UREA : इफकोकडून शेतकऱ्यांना खरिप हंगामापूर्वी गिफ्ट, नॅनो युरिया लाँच, पैसेही वाचणार आणि फायदाही दुप्पटीने मिळणार…! एक गोणी खताऐवजी केवळ अर्धा लिटर लिक्विडने शेतकऱ्यांचं काम होणार, IFFCO कडून नॅनो युरियाची निर्मिती. इंडियन फार्मर फर्टिलायजर्स कोऑपरेटिव्ह लिमिटेड म्हणजेच इफको ने शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी नॅनो यूरिया लाँच केला आहे. इफ्कोने बनवलेल्या नॅनो युरिया लिक्विडची ५०० मिलीची(अर्धा लिटर) एक बाटली सामान्य युरियाच्या ५० किलोच्या एका गोणीच्या बरोबरीची आहे. इफकोने शेतकऱ्यांसाठी या अर्धा लिटर नॅनो युरियाच्या एका बाटलीची किंमत २४० रुपये निश्चित केली आहे. जी सामान्य युरिया खताच्या किमतीपेक्षा 10 टक्क्यांनी कमी आहे. नॅनो यूरियाच्या अर्धा लिटरच्या बाटलीमध्ये 40 हजार पीपीएम ( parts per million ) नायट्रोजन असतो. त्यामुळे UREAच्या 50 किलोच्या बॅग इतकी पोषणतत्वे यामाध्यमातून पिकांना सहज मिळतील.

नॅनो UREAचा अर्थ काय?

नॅनो म्हणजेच आकार लहान आणि क्षमता मोठी, या दृष्टीने हे नॅनो युरिया लिक्विड तयार करण्यात आलं आहे. इफ्कोने बनवलेल्या नॅनो युरियाच्या वापरामुळे शेतकऱ्यांचा रासायनिक खतांवरील खर्च कमी होईल. नॅनो युरिया लिक्विडचा आकार लहान असल्याने ते खिशातही मावू शकतं, जेणेकरुन ने-आण करणं नक्कीच सोपं होणार आहे.

urea cycle, urea formula, urea fertilizer, urea normal range

शेतकऱ्यांना किफायतशीर पर्याय उपलब्ध

अलीकडच्या काळात रासायनिक खतांच्या किमती वाढत आहेत. या महागाईच्या काळात नॅनो यूरिया हा शेतकऱ्यांसाठी सामान्य यूरियाला चांगला पर्याय ठरणार आहे. बॉटलमध्ये द्रवरुपात नॅनो UREA उपलब्ध झाल्याने वाहतुकीवर होणारा खर्च देखील वाचणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी नॅनो यूरियाचा वापर नक्कीच फायेदशीर ठरेल. शिवाय हा द्रवस्वरूपात असल्याने त्याची फवारणी योग्य प्रमाणात आणि हवी त्याच ठिकाणी करता येणार असल्याने, वाया जाण्याचे प्रमाण देखील कमी होईल. अर्थात खर्चाचे प्रमाण घटल्याने निश्चित फायदा अधिक होणार आहे.  

IFFCO कडून नॅनो UREA लाँ

पिक उत्पादनात वाढ

नॅनो युरिया लिक्विड, हे रोपांच्या पोषणासाठी प्रभावी आणि परिणामकारक आहे. याच्या नियोजित वापरामुळे पिकांतील उत्पादन क्षमता वाढेल, तसंच पोषक तत्वांच्या गुणवत्तेत वाढ होणार आहे. नॅनो UREA लिक्विडमुळे जमिनीतील पाण्याच्या पातळीची गुणवत्तेत वाढ होईल तसेच जलवायू परिवर्तन आणि टिकाऊ उत्पादनावर देखील सकारात्मक परिणाम होणार आहे. त्यामुळे ग्लोबल वार्मिंग कमी होण्यास मदत होईल. नॅनो युरिया लिक्विड शेतकऱ्यांसाठी स्वस्त आहे आणि पिकांसाठी मस्त असल्याने, पिकांची उत्पादन क्षमता वाढते. अशाप्रकारे शेतकऱ्यांचा खर्चही कमी होणार आहे, तर उत्पादन वाढल्याने कमाई जास्त होणार आहे.

94 पिकांवर चाचणी

राष्ट्रीय कृषी संशोधन प्रणालीच्या अंतर्गत 20 ICAR, देशातील कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रांमध्ये ४३ वेगवेगळ्या पिकांवर चाचणी करण्यात आली. शिवाय यानंतर संपूर्ण भारतातील ९४ पिंकावर चाचणी करून त्या पिकांवरील परिणामकारकता तपासली गेली आहे. यातील लक्षात आलेला घटक म्हणजे नॅनो यूरियाच्या नियोजित वापरामुळे पिकांच्या ८ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.

फायदा नॅनो यूरिया वापराचा

नॅनो यूरियाची निर्मिती आत्मनिर्भर भारत, आत्मनिर्भर शेती यासाठी करण्यात आली आहे. इफको नॅनो यूरिया पिकांवर प्रभावी ठरला आहे. नॅनो यूरिया जमिनीतील पाण्याची गुणवत्ता वाढवतो. ग्लोबल वॉर्मिंग कमी करतो. शेतकऱ्यांनी नॅनो यूरियाचा प्रमाणात वापर केल्यास मातीची गुणवत्तेत देखील सुधारणा होण्यास मदत होणार आहे. त्याच बरोबर नॅनो यूरियामुळे पिकांची गुणवत्ता वाढण्यास देखील मदत मिळणार असल्याने, सर्वच बाजूंनी हा शेतक-यांचा मित्रच ठरणार आहे.

urea cycle, urea formula, urea fertilizer, urea normal range

किंमत कमी अधिक उत्पादनाची हमी : गोणीमधल्या युरियापेक्षा लिक्विड युरियाची किंमत कमी

इफ्को नॅनो UREAचं उत्पादनाला जून महिन्यातच सुरुवात झाली असून, विक्रीलाही लगेच सुरवात केली जाणार आहे. इफकोने शेतकऱ्यांसाठी ५०० मिली नॅनो युरियाच्या एका बाटलीची किंमत २४० रुपये निश्चित केली आहे, जी सामान्य युरिया खताच्या गोणीच्या किमतीपेक्षा 10 टक्क्यांनी कमी आहे.

भारतात दरवर्षी सुमारे ३५० लाख टन युरियाचा शेतक-यांकडून वापर केला जातो. नॅनो युरियामुळे खताचा वापर निम्म्याने कमी झाल्याने, अनुदानावरील वार्षिक ६०० कोटी रुपयांपर्यंतची बचत होणार आहे. त्यामुळे भारताला परदेशातून युरियाची आयात करावी लागणार नाही.

Farmer Producer Company with Success Mantra’s! | Marathi Trailer

Tags:farmers Fertilizers IFFCO Nano Urea Liquid

#IFFCONanoUrea #IFFCONano #NanoUrea #IFFCO