Home Education How to Create a Table of Contents in WordPress without the plugin?

How to Create a Table of Contents in WordPress without the plugin?

- Advertisement -

Table of Contents :अनुक्रमणिका किंव्हा अनुसूची, विषयानुसार पुस्तकातील महत्त्वाचे घटक. वाचक म्हणून आपल्याला पुस्तक/मासिक वाचायचे झाल्यास प्रथम आपण त्याचे मुखपृष्ठ (Cover Page) पाहतो. त्यानंतर त्या पुस्तकाच्या मागील बाजूस त्याची थोडक्यात वर्णन असलेली प्रस्तावना वाचतो. तरीही ज्या शिवाय आपण वाचनाचा कर्म ठरवत नाही त्यालाच अनुक्रमणिका अथवा अनुसूची अर्थात “टेबल ऑफ कंटेंट” (table of contents) म्हणतात. याच ठिकाणी पुस्तकातील नेमका कोणता भाग/धडा पहिल्यांदा आपल्याला वाचायचा त्याची निश्चिती करतो. म्हणजेच आपल्याला नक्की काय वाचायचे? आणि ते नेमकं कोणत्या पानावर आहे? याचा मागोवा घेण्यासाठी आपल्या त्या अनुसुचाचीचा (“टेबल ऑफ कंटेंट”) वापर होत असतो. तश्याच स्वरूपातील “TOC” (अनुक्रमणिका) आपल्या ब्लॉगपोस्ट/वेबसाईट वर बनवल्यास आपल्या वाचकाला देखील नक्की काय वाचायचे आहे. हे ठरवता येणे सहज शक्य आहे. शिवाय या TOC ममुळे आपल्या लिखाणाला एक उठावदारपणा दिसून येतो. त्यासाठी आपल्या फक्त “HTML” या विषयाचे थोडंसं जुजबी ज्ञान असायला हवे. नसेल तरी काही हरकत नाही, फक्त कुठे काय? आणि कसं? लिहावे हे समजून घेतले तरी आपले कार्य पूर्ण होते.

Table of Contents Meaning

जर आपण एक ब्लॉगकर्ते (रायटर/Writer) वा वेबसाइटचे मालक असू. तेंव्हा आपली इच्छा असते की, लोकांनी आपल्या ब्लॉग अथवा वेबसाईटला भेट/विझिट करावी. जेणेकरून आपले कंटेंट त्यांना सहज वाचता यावेत जेणेकरून आपल्या लेखाला जास्त प्रमाणात वाचक वर्ग मिळतील. कारण वाचकांची पसंदीचा डायरेक्ट फायदा आपल्या लिखित साहित्याला होत असतो. कारण जितके जास्त विझिटर, तितकी जास्त प्रसिद्धी आणि पैसेही. अर्थात SEO च्या आधाराने बनवलेला ब्लॉग अथवा वेबसाईट यांचा मुख्य उद्धेश पैसा कमावणे हाच असतो.

अशावेळी वाचकांच्या पसंदिला उतरण्यासाठी आपल्याला देखील अनेक क्लुप्त्या (Idea/कल्पना) कराव्या लागतात. त्यातीलच एक म्हणजे “अनुसूची/( टेबल ऑफ कंटेंट). आपल्या ब्लॉग अथवा वेबसाईटवरील लिखित साहित्य (writing Material) खूप लांबलचक असेल, तर सगळेच वाचक ते सगळं वाचत बसणार नाही. उलट आपल्या पोस्टची लांबी पाहून ते तेथून निघून जातील. याचाच अर्थ आपला बाऊन्स रेट वाढेल. ते आपल्या ब्लॉग/वेबसाईटसाठी हितकारक नसते. म्हणूनच वाचकांचा विचार करूनच लेखकाने आपल्याकडे संग्रहित केलेल्या माहितीचे नीटसे वर्गीकरण करून त्यांना चांगलंस हेडिंग द्यावेत. शिवाय त्यांची मांडणी वाचकाच्या प्राथमिकेते नुसार तयार करावी. म्हणजेच लिखित साहित्याला योग्य क्रमवारीच्या आराखड्यात (format for table of contents) बसवणे त्यालाच टेबल ऑफ कंटेंट म्हणतात.

चला तर या पोस्टमध्ये आपण पाहूयात, वर्डप्रेस सामग्रीचे सारणी (अनुक्रमणिका/ टेबल ऑफ कंटेंट) कशी बनवावी. TOC बनवण्यासाठी वापरण्यात येणा-या ३ पद्धती म्हणजे,

 1. वर्डप्रेस मध्ये “टेबल ऑफ कंटेंट” हे प्लगइन इन्स्टॉल/जोडणी करून,
 2. शॉर्टकोड (CSS) च्या सहाय्याने आणि
 3. एचटीएमएल मदतीने

यातील सर्वात सोप्पी शिवाय पैसे खर्च करून न करता HTML च्या सहाय्याने आपल्या लिखित साहित्याची अनुसूची तयार करणे. (कोणत्याही स्वरूपातील प्लगइन इंस्टॉल न करता.)

table of contents
table of contents कसे बनवावे…

वरील फोटोमधील माहितीच्या आधारे….

 1. लाल (RED) रंगाच्या चौकटीतील (BOX) मधील संपूर्ण भागाला कंटेंट रायटिंग एरिया म्हणतात. सध्या आपण त्यात एक टेबल (Word/Excel मध्ये बनवलेला) बनवून ठेवला आहे. ज्यात आपण संग्रहित केलेल्या माहितीच्या आधारे त्याचे क्रमवारी (Indexing) बनवलेली आहे. आता फक्त त्या क्रमवारीला त्याच्या नियोजित ठिकाणाशी जोडायचे आहे अर्थात लिंक करायचे आहे. म्हणजेच जर एखाद्या “आधार कार्ड अपडेट” (6.  Aadhar card update) याच्या निगडीत असणारी माहिती वाचायची असल्यास, तो नियोजित कंटेंट TOC मधील ६ व्या क्रमांकावरील हेडिंगला क्लिक करताच, त्याच्या समोर त्या लिंकसाठी लिहिलेली माहिती समोर दिसेल. मग ते लिखाण कितीही नंबरच्या पानावर का असेना. जेणेकरून वाचकाचा ते शोधण्यासाठी स्क्रोल(खाली) करण्याचा त्रास आणि वेळ दोन्हीही वाचतील.
 2. हिरव्या BOX मधील रंगात दिसणारे कंटेंट म्हणजे ज्यांची लिंकिंग बनवली गेलेली आहे. म्हणजे पहिल्या दोन्ही अथवा ८ नंबरच्या निळ्या शब्दांना क्लिक करताच वाचक थेट त्याच्यासाठी लिहिलेल्या मुद्देसूद माहितीवर पोहचतील.
 3. हिरव्या BOX मधील अनुक्रमणिकेत जी अक्षरे अजूनही काळ्या (Black) रंगात दिसत असतील त्यांना अजून लिंकिंग झालेली नाही. म्हणजे वाचकाने त्या TOC मधील घटकाला क्लिक जरी केले तरी त्याचा काहीही परिणाम आपल्या पानावर दिसू येणार नाही.
 4. चॉकलेटी रंगातील BOX मधील जे दोन घटक आहेत १) Visual आणि २) Text….. आता आपण यांच्या विषयी जाणून घेऊ… कारण यांच्याच आधारे आपण “Table of Contents in WordPress without plugin” बनवणार आहोत.

कंटेंट एडिटिंगचे दोन भाग

 1. Visual – जेंव्हा आपण कंटेंट लिहत असतो तेंव्हा तो कसा दिसेल हे दाखवण्याचा भाग म्हणजे “Visual”.
 2. Text – जर लेखकाला लिहिलेल्या माहितीमध्ये काही जुजबी बदल (Formatting) करायचे असतील आणि ते त्याला WordPress च्या Dashboard जर दिसत नसतील तर तो ते सर्व बदल याच HTML च्या एडिटरवरून करू शकतो.
 3. याच दोन्ही Format च्या आधारे आपण TOC ची लिंकिंग करणार आहोत.

जेव्हा आपण Text या TAB क्लिक करतो तेंव्हा आपली स्क्रिन पुढील प्रमाणे दिसते.

यामध्ये आपण दिसून येईल की Visual मध्ये आपल्या फक्त “wordpress”च्याच आधारे एडिटिंग करता येते. परंतु TEXT या फॉरमॅटमध्ये गेल्यावर आपल्याला HTML ची कोडींग दिसते. जर आपल्याला HTML येत असेल तर उत्तम नाही तर लिंकिंग करण्यासाठीच्या खालील स्टेप्स वापरा.

 • HTMLमध्ये लिहिलेल्या नॉर्मल लिखाणाला जे काही इफेक्ट दिले जातात त्याला कोडींग म्हणतात. यातील सर्व इफेक्ट <> च्या मध्ये लिहिले जातात.
 • Anchor अँकर म्हणजे (Greater Than “<” च्यापेक्षा मोठे) साईन/चिन्ह आणि (Less Than “<” च्यापेक्षा लहान) साईन/चिन्ह या दोघांच्या एकत्रित येण्याला Anchor अँकर म्हणतात. या चिन्हांच्या आत जिथे इफेक्ट (Source) हवे असतील त्यांची कोडींग दिल्यावर त्याचा इफेक्ट Target Content वर पहायला मिळतो.

Aadhaar Online च्या माध्यमातून आधार कार्डमध्ये केले जाणारे बदल!  | Marathi Trailer

आता आपण पाहूयात format for table of contents म्हणजेच वरील टेबलमधील ९ वा घटकाला, त्याच पानावरील नियोजित ठिकाणाशी लिंकिंग कसे करावे ते? आता आपण  Visual या TAB वर…

 1. 9 व्या घटकाला (Source Content) ला सिलेक्ट करा.
 2. TEXT या TAB ला क्लिक करा.
 3. आता आपण HTML कोडींग सिस्टममध्ये आलो आहोत.
 4. आपण Visual TAB मध्ये असताना ज्या कंटेंटला सिलेक्ट केले होते तो कंटेंट TEXT टॅब मध्येही सिलेक्ट असल्याचे आपल्याला पहायला मिळेल. त्याच निळ्या रंगातील सिलेक्शनच्या डाव्या बाजूला CURSER ठेवा आणि…. <a herf = “#यामध्ये Source कंटेंट लिहा”> (उदा. Aadhar card search by name and father name याला आपल्या लिंक द्यायची असेल तर, या संपूर्ण कंटेंटला कोणत्याही प्रकारची स्पेस न देता Anchor TAG मध्ये लिहा हॅशटॅग (#) वापरून लिहा…जसे <a herf = “#Aadharcardsearchbynameandfathername”>)
 5. #aadharcardssearchbynameandfathername या हॅशटॅग(#) सिलेक्ट करून कॉपी (CTRL+C) करून घ्या…..
 6. उजव्या बाजूला असणा-या PUBLISH या TAB खालील UPDATE या बटणला क्लिक करा….
 7. Visual या TAB ला क्लिक करून नॉर्मल मोड मध्ये या….
 8. TOC मधील ९ व्या घटक (कंटेंट) निळ्या रंगात अर्थात लिंकिंग मध्ये परावर्तीत झालेला असेल. (जर या ठिकाणी कंटेंट निळ्या रंगात आला नसेल तर समजावे लिंकिंग झालेली नाही. त्यावेळी Source कंटेंटला सिलेक्ट करा आणि Toolbar वरील लिंक या बटनला क्लिक करा. आणि TEXT या TAB वरून कॉपी केलेला हॅशटॅग(#) ला पेस्ट करून Apply करावे.)
 9. अन्यथा लिंक झालेल्या कंटेंटला क्लिक करा. तिथे एक POP UP (window) ओपन होईल. त्यात एक लिंक दिसून येते. त्याच्या उजव्या बाजूला pen सारख्या दिसणा-या एडीट (EDIT) या बटनला क्लिक करा. आणि त्या संपूर्ण TEXT (लिंक) ला सिलेक्ट करून कॉपी (CTRL + C) करा.
 10. आता TARGET Area म्हणजेच वरील लिंकला क्लिक केल्यावर जे दिसायला हवं, त्या कंटेंटच्या हेडिंगला सिलेक्ट करा…
 11. पुन्हा TEXT या TAB ला क्लिक करा, आपण पुन्हा HTML कोडिंग मध्ये येतो.
 12. या ठिकाणी पहिल्या ANCHOR (< >) मध्ये क्लिक करून तेथे असणा-या TAG च्या उजव्या बाजूला स्पेस देऊन id=“source link पेस्ट करा”….. उदाहरण (<H2 ID=“Aadharcardsearchbynameandfathername”) यामधील हॅशटॅग # काढून टाकावा….
 13. पुन्हा UPDATE करा
 14. VIsual TAB ला क्लिक करा… आपण दिलेला effect आला की नाही, हे चेक करण्यासाठी बाजूच्या Preview Changes ला क्लिक करा.
 15. नव्याने ओपन झालेल्या पेजवरील TOC मध्ये जाऊन लिंकिंग केलेल्या Source लिंकला क्लिक करा. तेंव्हा त्याचा टार्गेट कंटेंट आपल्या समोर लगेच उघडलेला दिसेल.

PM Kisan Samman Yojana अर्ज कसा करावा?

In Conclusion :

अशा प्रकारे आपल्याला कुठल्याही स्वरूपातील प्लगीन विकत घेण्नयाची आवशक्यता नाही. फक्त HTML कोडिंगचा थोडासा वापर करून, Table of Content  चा वापर आपल्या कंटेंटमध्ये सहज करू शकतो. त्यामुळे आपल्या कंटेंटची रूपरेषा सुंदर प्रकराची दिसून येते. शिवाय कंटेंट कितीही लांबट असले तरी वाचकांना जे वाचायचे आहे तेथे तो लगेच पोहचता येते. त्यामुळे आपल्या पेजवरील बाऊन्स रेट देखील कमी होतो. त्यामुळे आपल्या पेजवरील वाचकांची संख्या वाढते.

  SEO म्हणजे काय ? 

 

- Advertisement -
Marathi Guidehttps://marathitrailer.com/
Has come a long way from its beginnings in Maharashtra. When Group of Marathi Trailer first started out, their passion for helping Farmers and help them to start their own business.

1 COMMENT

- Advertisment -

Most Popular

Recent Comments