शरद पवार Gram-Samruddhi Yojana : यासाठीचा नेमका अर्ज कुठे आणि कसा करावा? या योजनेतून शेळी, कोंबड्या/कोंबडे, गाय-म्हैस पालनासाठी शेड बांधकामासाठी अनुदान दिले जाणार आहे. या शरद पवार ग्राम-समृद्धी योजने अंतर्गत येणा-या प्रत्येक लाभार्थीला गाय व म्हैस याकरिता पक्का गोठा बांधणे, शेळीपालन शेड बांधणे, कुक्कुटपालन शेड बांधणे तसेच भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग तयार करणे या चार वैयक्तिक कामांच्या माध्यमातून लाभ मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने ‘शरद पवार ग्राम-समृद्धी’ योजना चालू केली आहे. या योजनेतून शेळीपालन, कुक्कुटपालन, गाय-म्हैस यांच्यासाठीच्या शेड बांधकामासाठी अनुदान दिले जाणार आहे. 3 फेब्रुवारी 2021 रोजी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार ही योजना संपुर राज्यात राबवण्याची मान्यता देण्यात आली आहे. परंतु, ही योजना काय आहे आणि यासाठी अर्ज कुठे व कसा भरायचा, याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या भागात जाणून घेणार आहोत.

Sharad Pawar Gram-Samruddhi Yojana :
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून (मनरेगा) येणा-या काही योजनांच्या संयोगानातून ‘शरद पवार ग्राम-समृद्धी’ ही योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या मुख्य 4 कामांसाठी अनुदान दिलं जाणार आहे. यामध्ये…
- गाय व म्हैस यांच्यासाठी पक्का गोठा बांधणं
- शेळीपालनासाठी शेड बांधणं
- कुक्कुटपालनासाठी शेड बांधणं
- भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग
आता पाहूयात शरद पवार ग्राम समृद्धी योजनेत कोणत्या कामासाठी किती अनुदान दिलं जाणार ते….
१) गाय व म्हैस यांच्यासाठी पक्का गोठा बांधणे
यात 2 ते 6 गायी किंवा म्हैस अथवा दोन्ही एकत्रीत धरून एक गोठा बांधता येईल. त्या गोठा बांधकामासाठी 77,188 रुपये अनुदान दिले जाणार आहे. त्यापुढे म्हणजे 6 पेक्षा अधिक जनावरांसाठी 6 च्या पटीत अर्थात 12 गुरांसाठी दुप्पट, तर 18 पेक्षा जास्त गुरांसाठी तीनपट अनुदान मिळणार आहे.
२)शेळीपालन शेड बांधकाम
10 शेळ्यांकरता शेड बांधण्याच्या दृष्टीकोनातून 49,284 रुपये इतकं अनुदान लाभार्थ्याला मिळणारं आहे. १० पेक्षा अधिक जनावरांसाठी १० च्या पटीत म्हणजे 20 शेळ्यांसाठी दुप्पट, तर 30 शेळ्यांकरता तीनपट अनुदान दिलं जाणार आहे. परंतु समजा आजरोजी अर्जदाराकडे 10 शेळ्या नसेल तर कमीत कमी 2 शेळ्या तरी असायला हव्यात, असं शासन निर्णयात नमूद करण्यात आलेलं आहे.
३) कुक्कुटपालन शेड बांधकाम
100 कोंबड्यांचे शेड बांधण्यासाठी 49,760 इतकं अनुदान लाभार्थ्याला मिळेल. जाणार आहे. 150 पेक्षा जास्त कोंबड्या/कोंबडे असल्यास दोनपट निधी दिला जाणार आहे. पण, समजा एखाद्याकडे आजरोजी खुराड्या अभावी 100 कोंबड्या नसतील, तर त्या शेतक-याने 100 रुपयांच्या स्टॅम्पवर दोन जामिनदारांसह कोंबड्यांच्या शेडची मागणी करायची आहे. त्यानंतर शासानातून शेडची मंजुरी आणि बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शेडमध्ये 100 कोंबड्या आणणे बंधनकारक राहिल.
४) भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग
शेतातील कचरा याचं नाडेप पद्धतीने कंपोस्ट खत तयार करण्यासाठी 10,537 रुपये इतकं अनुदान मिळणार. वरील चारही बांधकामासाठीची लांबी, रुंदी जमिनीचे एकूण क्षेत्रफळ किती असावे? याची माहिती शासन निर्णयात सविस्तर दिलेली आहे.
अर्ज कसा करायचा?
- या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आपल्याला ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे. यासंबंधीच्या अर्जाचा नमुना पुढे दिलेला आहे .
- इथं सुरुवातीला आपण सरपंच, ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांच्यापैकी कुणाकडे अर्ज करत आहोत, त्यांच्या नावावर बरोबरचीखूण करायची आहे. त्याखाली ग्रामपंचायतचं नाव, तालुका, जिल्हा टाकावा. उजवीकडे दिनांक टाकून अर्जदाराचा फोटो चिकटवावा.
- त्यानंतर अर्जदाराचं नाव, पत्ता, तालुका, जिल्हा आणि मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. आता आपण ज्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज भरणार आहोत, त्या कामाच्या पुढे बरोबरची खूण करायची आहे.
- पुढे अर्जात आपण पाहू शकता की मनरेगा अंतर्गत दिल्या जाणाऱ्या कामांची यादी दिलेली आहे. पण, आपल्याला शरद पवार ग्राम-समृद्धी योजनेसाठी अर्ज करायचा असल्यानं नाडेप कंपोस्टिंग, गाय म्हैस गोठ्यांचं बांधकाम, शेळी पालन शेड, कुक्कुटपालन शेड यापैकी आपल्याला ज्यासाठी अनुदान हवं त्या कामासमोर बरोबरची खूण करायची आहे.

यात भरावयाचे महत्त्वपूर्ण माहिती खालील प्रमाणे आहे.
- सरपंच / ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी
- ग्रामपंचायत (आपल्या गावाचे नाव – ग्रुप ग्रामपंचायत असेल तसे नमूद करावे )
- तालुका / जिल्हा
- दिनांक – अर्ज करण्याची तारीख
- अर्जदाराचा फोटो
- अर्जदाराचे संपूर्ण नाव
- पता –
- मोबाईल नंबर आणि
- कोणत्या कामासाठी अर्ज करायचा आहे, (चार योजना )
- गाय व म्हैस यांच्यासाठी पक्का गोठा बांधणं
- शेळीपालनासाठी शेड बांधणं
- कुक्कुटपालनासाठी शेड बांधणं
- भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग
अर्ज करण्यासाठी लक्षात ठेवायच्या मुलभूत बाबी
- त्यानंतर आपल्या कुटंबाचा प्रकार निवडायचा आहे. यात जातीनिहान अर्ज करायचा आहे. शिवाय दारिद्रय रेषेखालील, महिलाप्रधान व शारीरिक अपंगत्व प्रधान असलेली कुटुंब, त्याचप्रमाणे भूसुधार आणि इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, व अन्य परंपरागत जंगल निवासी, २००८ च्या कृषी कर्जमाफी योजनेनुसार अल्पभूधारक किंवा सीमांत शेतकरी, यापैकी ज्या प्रकारात आपलं कुटुंब बसत असेल त्यासमोर बरोबरची खूण करायची आहे. कुटुंबप्रणालीचा आपण जो प्रकार निवडाल त्या संदर्भातील कागदपत्राचा पुरावाही देखील अर्जासोबत जोडावा लागेल. लाभार्थ्यांच्या नावे जमीन असल्यास त्यांच्या नावाचा सातबारा, आठ-अ उतारा आणि ग्रामपंचायत नमुना अर्ज 9 देखील जोडायचा आहे. तर नसल्यास नाहीच्या पुढे टिक करावी.
- लाभार्थी सदर गावचा रहिवासी असल्यास रहिवासी दाखला जोडायचा आहे. तसंच आपण निवडलेलं काम आपण रहिवासी असलेल्या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रामध्ये येत आहे का, ते नमूद करायचं आहे.
- अर्जदाराच्या कुटुंबातील 18 वर्षावरील पुरुष, स्त्री आणि एकूण सदस्यांची संख्या लिहायची आहे.
- शेवटी घोषणापत्रावर नाव लिहून सही किंवा अंगठा करायचा आहे.
अर्ज करताना भरावयाचे सर्व अर्ज पुढीलप्रमाणे आहेत…
- यासोबत मनरेंगाचं जॉब कार्ड, 8-अ, सातबारा उतारे आणि ग्रामपंचायत मालमत्ता नमुना उतारा जोडायचा आहे.
- यानंतर ग्रामसभेचा एक ठराव होईल. त्यात सरपंच आणि ग्रामसेवक हे आपल्या सहिचं एक शिफारस पत्र देतील. जर हे शिफारीस पत्र शेतक-यास मिळाले तरच तो या योजनेसाठी पत्र समाजाला जाईल.
- त्यानंतर आपल्या कागदपत्रांची छाननी होईल आणि आपल्याला पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या सही शिक्क्यानुसार पोचपावती दिली जाईल. यात आपण लाभासाठी पात्र आहात किंव्हा नाही ते नमूद केलेले असेल.
- महत्त्वपूर्ण सुचना : आपण मनरेगाचे लाभार्थी असाल तरच आपल्याला या योजनेचा लाभ घेता येईल. पण, जर आपल्याकडे मनरेगाचं जॉब कार्ड नसेल तर मात्र आपल्याला आधी ग्रामपंचायत कार्यालयातून हे जॉब कार्ड मिळवण्यासाठीचा अर्ज करावा लागणार आहे.
Conclusion / निष्कर्ष
- शरद पवार ग्राम-समृद्धी योजनेचे नोंदणीकरण नुकतेच चालू झाले आहे. या योजनेचा लाभ घेऊन आपण आपल्या उत्पन्नात नक्कीच वाढ करू शकतो.
- यातील मुख्य बाब म्हणजे शेतक-यांना नेहमीच अडचणीत टाकणारी प्राथमिक गुंतवणूक, हा भागच यात नसल्याने बहुतांशी लहान शेतकरी, शेतमजूर आणि भूमिहीन या योजनेचा नक्कीच लाभ घेतील.
- ही संपूर्ण माहिती तुम्हांला कशी वाटली यासाठी “Comment” बॉक्स मध्ये तुमचा अभिप्राय जरूर द्या. आणि कोणत्याही सरकारी योजनेच्या संदर्भात माहिती हवी असल्यास, ती देखील निसंकोच विचारा…!
आणि आमच्या युट्युब चॅनेलला देखील भेट द्या….
शरद पवार ग्राम समृद्धी योजना GR