Home Agriculture Farmer Producer Company with Success Mantra's!

Farmer Producer Company with Success Mantra’s!

- Advertisement -

१) Farmer Producer Company : शेतकरी उत्पादक कंपनी (FPC) म्हणजे काय?

Farmer Producer Company : काही शेतक-यांनी एकत्रित येऊन अनेक शेतक-यांच्या हितासाठी चालू केलेली हितकारक संस्था म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपनी. शेतकरी उत्पादक कंपनी हे सहकारी संथा आणि खाजगी मर्यादित कंपनी यांच्या संमिश्रानातून बनलेली आहे. अर्थात सहकारी संस्थांचा एकोप्याचा कारभार आणि सहकारी तत्वांचा फायदेशीर व्यापार या ध्येयात याचं बीज वसलं आहे.

सहकारी संस्थांनी आपल्याला एकत्रित काम कसं करावं हे शिकवलं (टीमवर्क) तर कमी भाग भांडवलात फायदेशीर व्यवसाय कसा करावा. हे गणित खाजगी मर्यादित कंपन्यांनी दाखवून दिलं. त्यामुळे एकत्रितपणे एकाचं स्वरूपातील काम (टीमवर्क) आणि फायद्याचा व्यापार हेच उद्धिष्ट यातून दिसून येतं.

farmer producer company, successful farmer producer companies in india, farmer producer company registration process, farmer producer company registration in maharashtra, farmer producer company guidelines in marathi, business plan for farmer producer company,
https://marathitrailer.com/farmer-producer-company-with-success-mantras/

२) Will the new agricultural policy mainly benefit farmers or corporate? : नव्या कृषी धोरणाचा मुख्यत: फायदा शेतक-यांना होणार की कॉर्पोरेट कंपन्यांना?

नव्या कागद्यानुसार १) शेतक-यांना बाजार समितीच्या व्यतिरिक्त कुठेही माल विकता येणार आणि कुठूनही विकत घेता येणार. २) शेतक-यांना कोणत्याही विदेशी कंपनीबरोबर खरेदी-विक्रीचा करार करता येणार. ३) शेतक-यांना कितीही मालाचा साठा करता येणार.

या तीनही कागद्याचा अर्थ एकच, बाजार समितींची मक्तेदारी संपेल, बाजारात स्पर्धा सुरु होईल त्यातून शेतक-यांच्या मालाला बाजार मिळेल. तरीही कोणत्याही कायद्यात किमान बाजार भाव हा मुद्दा नसल्याने खरेदी कंपनी भाव पाडूनच खरेदी करणार.

व्हेन कॉर्पोरेशन्स रुल्ड वर्ल्ड : डेविड कॉर्टन सांगतात की मोठ्या कंपन्या स्पर्धा करत नाहीत तर आपला जागतिक एकाधिकार बनवतात. जेणेकरून तयार माल विकता घेतानाच, शेतीसाठी लागणारा कच्चा माल (बियाणे, खते, यंत्रे, किटकनाशके) त्यांच्याकडूनच विकत घेण्याची अट घालतात. त्यामुळे शेतकरी नेहमीच त्यांच्यापुढे गरीब आणि शक्तिहीन रहातो. भारत सरकारने आणलेले धोरण ही जागतिक पातळीवर फसलेलं आहे.

३) Why farmer producer company is necessity of Indian farmer? शेतकरी उत्पादक कंपनी ही भारतीय शेतक-यांची गरज का आहे?

सध्याच्या कृषी धोरणाचा विचार करता आता शेतक-याला माल विकण्यासाठी तालुक्याच्या बाजार पेठेत जावं लागणार नाही. तरी खरेदीदार शेतक-याच्या बांधावर येऊन त्यांचा माल खरेदी करेल. हे ऐकायला खुप छान वाटत असलं तरी यात शेतक-याच्या हातात काहीच पडणार नाही. कारण संख्याबळ किव्हा बाजार भावाचा अंदाज नसल्याने त्याला मिळेल त्या किंमतीत माल विकावाच लागेल. क्रम त्याच्या माल साठवणुकीचा कोणताही पर्याय नसतो.

याचाच विचार करून जर आपण “शेतकरी उत्पादक कंपनी” माध्यम तयार केलं तर, अनेक शेतकरी एकत्रित येतात. त्यामुळे त्यांचं संख्याबळ वाढतं. संख्याबळ म्हणजे बार्गीनिंग पॉवर (सौदाबाजेची ताकद) वाढते. शिवाय माल जास्त प्रमाणात असल्याने साठवण्याची क्षमता देखील वाढवता येते. शिवाय मालाची प्रत आणि गुणवत्ता निर्माण करून मालाला मोठी बाजार पेठ मिळवता येते. त्यामुळे शेतक-यांना आर्थिक लाभ मिळू शकतो.

४) Who can starts the farmer producer company? शेतकरी उत्पादक कंपनी कुणाला चालू करता येते ?

शेतकरी उत्पादक कंपनी (FPC) हे कंपनीचे कायदेशीर स्वरूप आहे. त्याची नोंदणी कंपनी कायदा १९५६ व २०१४ च्या अंतर्गत होते. FPC ही अशी कंपनी आहे ज्यात फक्त शेतकरीच सभासद होऊ शकतात. त्यामुळे कंपनीचे संपूर्ण व्यवस्थापन देखील तेच करतात. शेतकरी उत्पादक कंपनी (FPC) च्या संकल्पनेमध्ये विविध शेतकरी गट, शेतीमाल उत्पादक अथवा किरकोळ स्वरूपातील शेतकरी एकत्रित येऊन कंपनी स्थापन करू शकतात. त्यामुळे त्यांना येणा-या कोणत्याही आव्हानाचा सामना एकत्रित स्वरुपात करावा लागत असल्याने, नुसकान होत नाही किंवा त्याचं प्रमाण किरकोळ स्वरुपात असते. त्यांच्या त्या एकोप्यातूनच प्रभावी संघटन तयार होते.

 • शेतकरी सहकार संस्था आणि शेतकरी उत्पादक कंपनी यातील फरक?

 1. शेतकरी उत्पादक कंपनी (FPC) ही “Company Act” या अंतर्गत नोंदणी होते. तर सहकारी संस्था ही “cooparate Act” अंतर्गत होते.
 2. एफपीसी ही अनेक उद्धिष्ट ठरवू शकते. परंतु, सहकारी संस्था ठरलेल्या उद्देशावरच चालते.
 3. एफपीसीचे कार्यक्षेत्र हे संपूर्ण भारतभर असू शकते.तर सहकारी संस्था मर्यादित कार्यक्षेत्रातच काम करू शकतात.
 4. एफपीसीमध्ये आपले शेअर्स विकता येत नसला तरी ते दुस-याला देता येतात. (वडिलांचा वारसा हक्क किंवा बक्षीसपत्र). तर सहकारी संस्थांमध्ये विकताही येत नाही आणि हस्तांतरितही येत नाही.
 5. एफपीसीमध्ये फक्त शेतक-यांनाच सदस्य बनता येते. तर सहकारी संस्थांमध्ये कुणीही व्यक्ती हा सदस्य बनू शकतो.
 • शेतकरी उत्पादक कंपनीची (FPC) नोंदणी आणि लागणारी कागदपत्रे?

कंपनी नोंदणी : शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणी ही कंपनी सेक्रेटरी करून देतात. तर कंपनी सचिवांनी मागितलेल्या कागदपत्रांची पुरतात करण्याची जबाबदारी प्रत्येक सभासदाची असते. कारण कंपनी सचिव हाच नोंदणी प्रक्रिया आणि कायदेशीर बाबींची पूर्तता करतो.

 • प्रत्येक सभासदाचे आणि संचालकाचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड.
 • ते नसल्यास ओळखपत्र म्हणून वापरण्यासाठी ड्रायव्हर लायसन्स, मतदान कार्ड अथवा पासपोर्ट.
 • रहिवासी पुराव्यासाठी लाईट बील (स्वत:च्या नावावर असेल तर) बँक पासबुक/ स्टेटमेंट किंवा रेशनिंग कार्ड.
 • शेतकरी असल्याचा पुरावा म्हणून ७/१२ उतारा. जरा आपल्या नावावर नसल्यास ज्यांच्याशी नाते आहे त्यांचा उतारा तोही तलाठ्याने सही/शिक्यासह दिलेला आणि स्वत:साठी नातेसंबंधाचा पुरावा. तेही तहसीलदार यांच्याकडून प्रमाणित केलेले.
 • सुरवातीचे सर्व सभासद आणि शेतकरी यांचे एकत्रित शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र, तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून तेही त्यांच्या सही शिक्क्यासह.
 • प्रत्येक सदस्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो. (जास्त जुना नको)
 • बनवण्यात येणा-या कंपनीसाठी नाव. (कमीत कमी सहा, जर आपण दिलेले नाव आपल्यापुर्वीच कुणीतरी निवडलं असल्यास आपल्याकडे पर्याय असावा म्हणून)
 • जेथे आपण आपल्या ऑफिसचा पत्ता देणार असू त्याचे भरलेले चालू लाईट बिल आणि मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र.                      
 • प्रत्येक संचालक आणि सभासदाचे नाव, मोबाईल नंबर, ईमेल अॅड्रेस, शैक्षणिक पात्रता, जन्म ठिकाण आणि शेअर्स रक्कम. (सुरवातीच्या भाग भांडवली)

५) How do you form a farmer producer organization? : शेतकरी उत्पादक संस्था कशी तयार करता येते?

शेतकरी उत्पादक कंपनी (FPC) नोंदणीच्या पाय-या (स्टेप्स) खालीलप्रमाणे आहेत.

१) संचालक ओळख क्रमांक :

५ संचालक आणि ५ प्रवर्तक नेमून नोंदणी करता येते. प्रत्येक संचालकाचा ओळख क्रमांक भारतीय वाणिज्य मंत्रालयाकडे ई-अर्ज करून काढावा लागतो. त्यासाठी लागणारी कागदपत्रे,

 • निवासी पुरावा
 • ओळखपत्र पुरावा
 • पासपोर्ट साईज फोटो

२) डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र :

आता आपण डिजिटल युगात वावरत असल्याने, बहुतांशी ठिकाणी आपल्याला ई-अर्ज करावे लागतात. म्हणून डिजिटल प्रमाणपत्र, MCA किंवा खाजगी कंपनी देखील हे डिजिटल प्रमाणपत्र मिळवून देते.

३) कंपनीच्या नावासाठी अर्ज :

कंपनी नाव काय असावे यासाठी देखील आपल्याला हवी असलेली किमान ५-६ नावं सुचवावीत. एक नाही मिळालं तर दुसरं, दुसरं नाही तर पर्याय म्हणून. यातही वेगळंपण असायलाच हवं.

४) कंपनीची नोंदणी :

एकदा ROC कडून नाव मंजूर झाले की ते आपल्यासाठी फफक्त ६-० दिवस राखीव असते. त्यासाठी त्यापूर्वीच आपल्याला कंपनीची नोंदणी करावी लागते. त्याच वेळी मेमोरँडम ऑफ असोसिएशन आणि आर्टिकल ऑफ असोसिएशनचा आराखडा तयार करावा लागतो.

 • कंपनीचा मेमोरँडम ऑफ असोसिएशन (MOA) कंपनीचे कायदे कानून.  सोप्या शब्दांत सांगायचे तर, एमओए हा कंपनीचा पाया आहे ज्यावर कंपनीची इमारत बांधली जाते. कुणी काय करावं आणि काय करू नये याची नियमावली म्हणजेच कंपनीचा MOA.
 • तर आर्टिकल ऑफ असोसिएशन AOA म्हणजेच कंपनीतील प्रत्येकाची महत्त्वपूर्ण जबाबदा-यांची विभागणी. थोडक्यात डायरेक्टर जे काही करतील त्याला सर्वांचा पाठींबा असायलाच हवा. कंपनी जे काही करेल त्याला सर्व सदस्यांची लिहित समंती घेणं म्हणजेच AOA बनवणं.
 • कंपनीचे सर्व उत्पादक(सदस्य) हे शेती किंवा शेतीपूरक व्यवसायातून असावेत. जसे पशुधन, फळबाग, भाजीपाला उत्पादक, मसाले उत्पादक इ. म्हणजे नुसता दुकानदार आहे, तर तो चालणार नाही.
 • मेमोरँडम ऑफ असोसिएशन (MOA) आणि आर्टिकल ऑफ असोसिएशन (AOA) याच्या आराखड्यावर सर्व संचालकांच्या इग्रजी भाषेत सह्या असणे ग्राह्य आहे. मराठीत सही करावयाची असल्यास तसे प्रतिज्ञापत्रक द्यावे लागेल.

५) संस्था नोंदणी करता अर्ज सादर करणे

 • फॉर्म १ : कंपनी इन्कॉरपोरेशन MOA, AFA आणि ROC कडे अर्ज फाईल करावा लागतो.
 • Form १८ : शेतकरी उत्पादक कंपनीचा पत्ता जिथे सरकारी नोटीस येऊ शकते.
 • फॉर्म ३२ : संचालकांच्या नियुक्त्या आणि त्याचे सहमती पत्रक जे त्यांनी सही केलेलं असेल. हे स्व-अर्ज फॉर्म ROC कडे अर्जदाराला सादर करावे लागतात. 

६) नोंदणीचे प्रमाणपत्र :

जर आपण सादर केलेल्या कागदपत्रांच्या बाबतीत ROC (रजिस्टर ऑफ कंपनी) यांचे समाधान झाले तरच ते आपल्याला कंपनी नोंदणीचे प्रमाणपत्र देतात. अन्यथा त्यांच्या मागणीप्रमाणे कागदपत्रांची पूर्तता करावी लागते.

७) संचालकांची बैठक :

कंपनीची अधिकृत नोंदणीचे प्रमाणपत्र आल्यानंतर ३० दिवसांच्या आत, सर्व संचालक मंडळाची एक बैठक (मिटिंग) घ्यावी लागते. या बैठकीतील सर्व मुद्दे स्थानिक भाषेत तयार करवून त्यावर उपस्थितांची स्वाक्षरी घ्यावी लागते. हा बनवलेला अजेंडा कंपनीच्या सर्व संचालकांना बैठकीच्या ७ अगोदर पाठवावा लागतो.

८) बैठकीचे विषय :

पहिल्या बैठकीत अध्यक्षांची निवड, नोंदणीच्या खर्चाला संमती, संचालकांची पदाप्रमाणे नेमणूक, व्यवस्थापकाची नियुक्ती, व्यवसाय आराखड्याची मांडणी आणि समंती, बजेटची आखणी आणि ऑडीटर (अधिकृत हिशोब तपाणीस) याची नियुक्ती. तसेच कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती हे सर्व निर्णय ROC ला कळवावे लागतात. दरवर्षी ३० जून पर्यंत कंपनीने ऑडिट रिपोर्ट ROC ला सदर करावे लागतात.

९) कंपनीचा मेमोरँडम ऑफ असोसिएशन आणि  आर्टिकल ऑफ असोसिएशन :

हे दोन्ही कागदपत्रे कंपनीला कायद्याची चौकट मिळवून देणारी मार्गदर्शक दस्तावेज आहे. शेतकरी उत्पादक कंपनीमधील सदस्यांनी निवडलेले डायरेक्टर हे कमीत कमी १ वर्ष आणि जास्तीत जास्त ५ वर्ष पदावर राहू शकतात.

मेमोरँडम ऑफ असोसिएशन म्हणजे नक्की काय?

 • आपल्या कोणता व्यवसाय करायचाय रूपरेषा स्पष्ट केली जाते.
 • आपलं कार्य काय? आणि कसं? पूर्ण केलं जाईल याची मांडणी दाखवली जाते.
 • भविष्याची दिशा ठरवणे.
 • यातून सर्व उत्पादकांना (सर्व सभासद) लाभ किती आणि कसा  होईल इत्यादी बाबी स्पष्ट करणे
 • वरील सर्व गोष्टी MOA च्या अंतर्गत येतात.

आर्टिकल ऑफ असोसिएशन म्हणजे काय?

 • कंपनीचे नियम
 • आपण काम कुठे करायचं – भौगोलिक कार्यक्षेत्र
 • कंपनीचा पत्ता
 • सदस्यत्वाचे नियम
 • सदस्यांकरिता नियम
 • संचालकांकरिता नियम
 • सदस्यांचे फायदे
 • संचालकांच्या वार्षिक बैठकांची चौकट
 • वार्षिक सर्वसाधारण बैठक
 • मूळ लाभाचे वाटप
 • फिरते संचालक पद ही संकल्पना राबवणे

६) Farmer Producer Company Guidelines : शेतकरी उत्पादक कंपनीची सरकारी नियमावलीनुसार मार्गदर्शक तत्त्वे

 • शेतकरी उत्पादक कंपनीत कमीत कमी ३०० शेतक-यांचा समावेश करावा. (सुरवातीची काही वर्ष सोडली तर)
 • त्यातील अर्धे सभासद हे अल्पभूधारक किंवा भूमिहीन (शेत मजूर) असावेत.
 • महिला शेतकरी वर्गाला सभासद करून घेण्याला प्राधान्य द्यावे
 • कंपनीच्या सहभागात एका सदस्याचा जास्तीत जास्त शेअर सहभाग १० टक्क्यांपेक्षा जास्त नसावा. (नाहीतर मालकी हक्क दाखवला जातो)
 • कंपनीला एका वर्षात १८ लाखांपेक्षा जास्त निधी वापरता येत नाही.
 • कंपनीला जास्तीत जास्त १५ लाख रुपये प्रशासकीय कामासाठी खर्च करण्याची परवानगी आहे.
 • कोणत्याही शेतक-याला एकापेक्षा जास्त कंपनीचा सभासद होता येणार नाही. 
 • Farmer Producer Company Guidelines, डाऊनलोड करण्यासाठी या लिंकला क्लिक करा.

७) Farmer Producer Company च्या माध्यमातून कोण कोणते व्यवसाय करता येतील?

 1. पोल्ट्री फार्मिंग
 2. गोट फार्मिंग
 3. डेअरी फार्मिंग
 4. मिल्क प्रोजेक्ट
 5. फिश फार्मिंग
 6. मशरूम प्रोजेक्ट
 7. अंडी प्रोडक्शन
 8. FMCG प्रोडक्ट प्रोडक्शन
 9. आयुर्वेदिक मेडिसीन प्लांट
 10. बायोफ्युल डेवलपमेंट प्लांट
 11. ऑरगॅनिक फार्मिंग
 12. कोल्ड स्टोररेज
 13. किसान सेवा केंद्र
 14. महिला व पुरुष गटांना प्रशिक्षण देणे
 15. पापड उद्योग
 16. फुलाची शेती
 17. शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे
 18. करार पद्धतीने शेती करणे शेतकऱ्यांना पिकासाठी मोफत मार्गदर्शन करणे
 19. शेतकऱ्यांना क्रेडीटवर रोपे अवजारे बी-बियाणे
 20. खत-बियाणे देणे
 21. प्रक्रिया उद्योग व विक्री
 22. आठवडी बाजार
 23. जलयुक्त शिवार अभियान
 24. समृद्ध शेतकरी अभियान
 25. वृक्षरोपण अभियान इत्यादी
 26. वर्षभर हमीभाव माल खरेदी- विक्री करणे.
 27. वखार पावती योजना

https://www.mastersfinancejobs.com/

- Advertisement -
Marathi Guidehttps://marathitrailer.com/
Has come a long way from its beginnings in Maharashtra. When Group of Marathi Trailer first started out, their passion for helping Farmers and help them to start their own business.
- Advertisment -

Most Popular

Recent Comments