Home Education Facebook page Creation?

Facebook page Creation?

- Advertisement -

Facebook page बनवणे हा एक व्यावसायिक दृष्टीकोन आहे. जे खासकरुन व्यवसाय, ब्रँड, सेलिब्रेटी, विशिष्ट कारणांसाठी आणि सामाजिक संस्थांसाठी तयार केले जाते. या फेसबुक पेजच्या माध्यमातून (सहाय्याने) आपण जगातील सर्वात मोठ्या सामाजिक नेटवर्कवर आपल्या ब्रँडची माहिती प्रसारित करू शकतो. जेणेकरून आपल्या व्यवसायात वाढ होऊन, जास्त नफा मिळवू शकतो. सेलिब्रेटी आणि सामाजिक संस्थां यांना तसा पैश्याच्या स्वरूपात नफा मिळत नसला तरी त्याच्या फॅन-फॉलवर्स (चाहते) वाढतात. फॅन-फॉलवर्समुळे त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळते. परंतु व्यावसायिकांसाठी ही एक खुली बाजारपेठ असून येथे खरेदीदार समोरून तुमच्याकडे येतात. यामध्ये ग्राहकांच्या दृष्टीकोनातून आपल्याही काही जबाबदा-या असतात. जसे की…  

 • ग्राहकांना मागणी प्रमाणे वस्तू दाखवणे (ऑनलाईन-फोटो अथवा विडीओच्या माध्यमातून)    
 • ग्राहकांच्या चौकशीस प्रतिसाद देणे
 • आपल्या ग्राहकांसोबत आणि इतर ब्रांडसोबत आपल्या मालाचे एकत्रीकरण करणे
 • आपल्या ग्राहकांसोबत चांगले हितगुज ठेवणे
 • नवीन मालाच्या वेळी त्यांना आवर्जून इंविटेशन पाठवणे  
 • आणि अधिक…

फेसबुक आणि फेसबुक पेज मधील फरक

फेसबुक हे आपले वैयक्तिक अकाऊंट(खाते) आहे. येथे आपण आपल्या लोकांना आपल्याबद्दलची माहिती सांगतो. त्यामुळे येथे आपण फक्त मर्यादित लोकांनाच जवळ करतो. किंवा ज्याच्याबद्दल जाणून घ्यायचे आहे. अथवा ज्यांना काही दाखवायचे आहे अशाच लोकांना आपल्या फेसबुक मध्ये जोडतो.

येथे सरळ पोस्ट लिहा आणि उपलोड करा येवढा एकच सरळ मार्ग आहे. अपलोड झालेली पोस्ट आपल्या मित्रांना, नातेवाईकांना, कुटुंबीयांना सहज पहायला मिळते. त्यावर ते आपली प्रतिक्रिया नोंदवतात.

Facebook page हे संपूर्णत: व्यवसायिक आहे. फेसबुक पेजवरून आपण आपल्या व्यवसायाची डिजिटल माहिती आपण देत असतो. (ब्रँड-सेलिब्रेटी हे फक्त लोकप्रियता टिकवण्यासाठी याचा वापर करतात) आपला व्यवसाय वाढविण्यात, ग्राहकांशी संपर्क साधण्यात आणि लोक आपल्या मालावर (प्रोडक्ट) कसा संवाद करतात हे जाणून घेण्यासाठी या फेसबुपेजचा आपल्या उपयोग होतो.

हा आपल्या व्यवसायाचा डिजिटल-शॉप आहे. ग्राहक आणि आपल्या व्यवसायात रस असलेल्या लोकांशी सहज संपर्क साधता येतो. आपली विक्री वाढविण्यासाठी आणि आपल्या उद्दीष्टांपर्यंत पोहोचण्यासाठी जाहिराती करता येतात. शेवटी जेव्हढी विक्री अधिक तेव्हढा नफा जास्त हे यशस्वी व्यवसायाचे गमक आहे.

युट्युब Custom URL कसे बनवावे?

How to Create Facebook page? फेसबुक पेज कसे बनवावे?

फेसबुक पेज बनवण्यासाठी पहिले तर आपले फेसबुक अकाऊंट (खाते) असायला हवे. नसेल तर ते पहिले तयार करून घ्या. त्यानंतर पुढील स्टेप्स वापरा…

 1. आपल्या Facebook ला Login करा.
 2. आपल्या प्रोफाईलच्या उजव्या बाजूला असणा-या + (Create – तयार करा) या चिन्हाला क्लिक करा.
how to delete facebook page, how to change facebook page name, facebook page cover photo size, how to create facebook page, how to delete a facebook page, facebook page plugin, facebook page create, create facebook page, facebook page login,
 • 3) Page (connect and share with customer’s or Fans) (आपल्या ग्राहकांना किंवा चाहत्यांना कनेक्ट होऊन आपले प्रोडक्ट त्यांच्याशी शेअर करा.)

या ठिकाणी ख-या अर्थाने आपण पेज बनवण्यासाठी तयार होतो. सध्या आपण कॉम्पुटरच्या सहाय्याने हे पेज बनवत आहोत.

यामध्ये महत्त्वपूर्ण तीन घटक आहेत.

 1. पानाचं नाव (Facebook page) – आपल्या व्यवसायाचे नाव, ब्रँड किंवा संस्थेचे नाव स्पष्ट करणारे नावच वापरणे अधिक फायदेशीर असते. उदा. आपण जर गाड्यांचे शोरूम चालवत असू तर आपल्या दुकानाचेच नाव पानाला देणे अनिवार्य आहे. परंतु आपण जर ऑनलाईन व्यवसाय करत असू तर आपल्या प्रोडक्टच्या अनुषंगाने नाव द्यावे. “प्रांजल साडी” (प्रांजल साडी ऑफलाईन साड्यांचे ऑनलाईन दुकान”) हे साडीच्या प्रोडक्ट साडी. आपल्या प्रोडक्ट प्रमाणे नाव द्यावे. जर सेलेब्रिटी असेल तर त्याने आपल्या नावाप्रमाणे अथवा चाहत्यांच्या आवडीप्रमाणे नाव द्यावे.
 2. कॅटेगरी (श्रेणी / प्रकार) – आपण ज्याप्रकारचा व्यवसाय करणार असू त्याचे वर्णन करणारा प्रकार निवडावा. यात तीन प्रकारच्या श्रेणी जोडता येतात. यात पहिली समर्पक श्रेणी निवडणे अत्यंत गरजेचं आहे. कारण पुढील दोन श्रेणी त्यानुसारच येतील. उदा. स्त्रियांच्या कपड्यांचे भांडार
 3. Description – वर्णन : येथे आपल्या फेसबुक पेजच्या प्रोडक्ट आणि सेवांबद्दल माहिती देणे गरजेचे आहे. यालाच आपल्या फेसबुक पेजचे थोडक्यात वर्णन म्हणतात. ज्याद्वारे आपण आपल्या प्रोडक्टविषयीची थोडक्यात माहिती आपल्या ग्राहकांना (चाहते) यांना देत असतो. याठिकाणी त्यांची उत्कंठा वाढीला लावणे हेच आपले उद्धिष्ट आहे. उदा. प्रांजल साडी (ऑनलाईन साड्यांची ऑफलाईन शॉपी) येवला पैठणी सहज उपलब्ध करुण देणे आमच्या खासियत आहे. शिवाय “नववधूच्या” संपूर्ण साड्या आणि इतर सर्व वस्तू खरेदींची जबाबदारी आम्ही घेतो. “दाम कमी मालाची हमी”

हे डिस्क्रिप्शन लिहिण्यासाठी २५५ शब्दांची मर्यादा आहे.

how to delete facebook page, how to change facebook page name, facebook page cover photo size, how to create facebook page, how to delete a facebook page, facebook page plugin, facebook page create, create facebook page, facebook page login,

शेवटी Create Page (पेज तयार करा) या बटणला क्लिक करून आपले पान बनवा.  

आपले पेज बनल्यानंतर त्याला साजेसं Create @Username देणं आपल्या व्यवसायाच्या दृष्टीने गरजेचं आहे.  

 1. आपल्या फेसबुकच्या मुख्य पानावर जा
 2. Home या बटनला क्लिक करा.
 3. डाव्या बाजूला उघडणा-या PAGE या भगव्या झेंड्याला क्लिक करा.
 4. ओपन झालेल्या आपल्या पेजच्या प्रोफाईल पिक्चरवर क्लिक करा. (फोटो अपलोड केला नसल्यास त्या गोलावर क्लिक करा.)
 5. पुन्हा डाव्या बाजूला Manage Page – या खाली “Edit Page Info” (पानाची माहिती बदलणे) याला क्लिक करा.
 6. नवीन उघडणा-या पानावरील सर्व माहिती भरा. यामध्ये नाव (प्रांजल साडी), Username (Pranjal.Geeta), Contact no. व इतर सर्व माहिती      

अशा प्रकारे आपले युजरनेम तयार झाले.  

how to delete facebook page, how to change facebook page name, facebook page cover photo size, how to create facebook page, how to delete a facebook page, facebook page plugin, facebook page create, create facebook page, facebook page login,

facebook page cover photo size : फेसबुक पेज कव्हर फोटो आकार किती असावी?

आपल्या पेजचा कव्हर फोटो : कॉम्पुटर जर तयार करत असू तर उंचीला 312 पिक्सेल आणि रुंदीला 820 पिक्सेल. आणि स्मार्टफोनसाठी उंचीला 360 पिक्सेल रुंदीला 640 पिक्सेल. या साईज प्रमाणे बॅनर बनवावा.   

In Conclusion : अशा प्रकारे आपले फेसबुक पेज तयार झाले. यानंतर आपण आपली पहिली पोस्ट करावी. त्यानंतर आपल्या या व्यावसायिक पानाला लोकांनी भेट द्यावी. म्हणून आपल्या नॉर्मल फेसबुक मध्ये असणा-या सर्व मित्रांना या पेजतर्फे एक निमंत्रण (इन्विटेशन) पाठवावे. जे लोक आपले निमंत्रण स्वीकारतील ते आपले ग्राहक किंवा चाहते आहेत हे समजावे. त्यानंतर आपल्या प्रत्येक पोस्टची सुचना (notification) त्यांना मिळत जाईल.         

महाडीबीटी ट्रॅक्टर योजना

- Advertisement -
Marathi Guidehttps://marathitrailer.com/
Has come a long way from its beginnings in Maharashtra. When Group of Marathi Trailer first started out, their passion for helping Farmers and help them to start their own business.

4 COMMENTS

- Advertisment -

Most Popular

college reopen | अखेर महाविद्यालये सुरू झाली…

Maharashtra college reopen : "बागेत फुले आणि महाविद्यालयात मुले नसतील तर दोन्हीही ठिकाणे बेरंगीच! गेल्या १८ महिन्यांपासून covid-19 च्या प्रादुर्भावामुळे केंद्र सरकारने "लॉकडाऊन" लावला...

what is beat reporting / बीट रिपोर्टिंग म्हणजे काय?

what is beat reporting / बीट रिपोर्टिंग म्हणजे काय? बीट रिपोर्टिंग, यालाच विशेष अहवाल/रिपोर्ट म्हणूनही ओळखले जाते. हा पत्रकारितेचा एक महत्त्वपूर्ण प्रकार आहे. जो एका...

Recent Comments

Related eBooks