Home Agriculture egramswaraj : ईस्वराज आपल्या गावासाठी सरकारनं दिलेला निधीचा वापर नक्की कुठे आणि...

egramswaraj : ईस्वराज आपल्या गावासाठी सरकारनं दिलेला निधीचा वापर नक्की कुठे आणि कसा?

- Advertisement -

egramswaraj : आपल्या गावाला सरकारकडून निधी हा दरवर्षी मिळत असतो. मग तो निधी येतोय का? आला तर नक्की कुठे खर्च होतो? येत नसेल तर का येत नाही? अशा सगळ्या प्रश्नांसाठी “लोकप्रतिनिधी”वर अवलंबून राहण्यापेक्षा आपणच ही माहिती घेऊन त्यांच्याशी ग्रामसभेत बोलायला हवं. कारण जसं आपल्या घराचं दर महिन्याचा बजेट असतं अगदी तसचं गावाचं देखील वार्षिक बजेट असते. त्या बजेटसाठी पैसे मात्र सरकारकडून गावातील नागरिकांच्या सार्वांगीण विकासासाठी येत असतात. मग तो आलेला पैसा नक्की गावाच्या प्रगतीच्याच कारणी लागला की मध्येच कुठे गळाला. हे जाणून घेणं प्रत्येक नागरिकाचा नैतिक अधिकार आहे. आपल्या काय करायचंय आणि ज्यांनी गावाचा ठेका घेतलाय घेतील ते पाहून. आपल्याला का मिळणारा आहे त्यातून. अशा पळकुट्या भूमिकेमुळे गावाचे सेवक असणारे हेच गावाचे मालक बनून जातात आणि आपल्याच बोकांडी बसतात. असं होऊ द्यायचं नसेल तर आपल्या गावासाठी आलेला पैसा/फंड नक्की कुठे आणि कसा खर्च होतोय हे पाहणं देखील गावाचे सुज्ञान नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे.

 • तर जाणून घेऊयात आपल्या गावाचं बजेट कसं ठरतं?
 • प्रत्यक्षात गावाच्या विकासकामासाठी नक्की निधी मिळतो का?
 • मिळतो तर नेमका किती आणि कसा?
 • शेवटी त्यातला किती निधी ग्रामपंचायत खर्च करते?

याच विषयीची सविस्तर माहिती आपण आता जाणून घेऊयात…

आपल्या गावाचं बजेट कसं ठरतं?

प्रत्येक वर्ष्याच्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ग्रामविकास समितीची बैठक बोलावली जाते. त्याबैठकीमध्ये आपल्या गावाच्या आरोग्य, शिक्षण, महिला कल्याण अशा वेगवेगळ्या गरजांवर विचार केला जातो. त्यानंतर या गरजा पूर्ण करण्यासाठी गावाकडे काही निधी उपलब्ध निधी आहे का? आणि सरकारकडून नक्की किती मिळू शकतो, यासंबंधीचं एक अंदाजपत्रक (बजेट) तयार केलं जातं. तर असे ठोकळ अंदाजाने गावातल्या सगळ्या योजनांचं एकत्रित बनवलेलं अंदाजपत्रक 31 डिसेंबरपूर्वी पंचायत समितीला पाठवलं जातं. हे अंदाजपत्रक पंचायत समिती राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवत असते.

 egramswaraj-8, egramswaraj portal, planning online gov, planning online villages report data, planning online gov action plan, planning online
egramswaraj-8, egramswaraj portal, planning online gov, planning online villages report data, planning online gov action plan, planning online

एका गावाकरता केंद्र सरकार, राज्य सरकार आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्था मिळून  जवळपास 1140 योजना असतात. आता कोणत्या गावासाठी कोणती योजना द्यायची, हे ते गाव कोणत्या जिल्ह्यात येतं आणि आपले गाव नक्की कोणत्या भौगोलिक क्षेत्रात येतं, त्यानुसार आपल्या गावाचा निधी ठरतो. त्यामध्ये,

जर आपल्या गावाला मिळणारी योजना राज्य सरकारची असेल तर 100 टक्के निधी राज्य सरकार देतं. आणि केंद्राच्या योजनांसाठी 60 टक्के निधी केंद्र सरकारसरकारकडून, तर उर्वरित 40 टक्के राज्य सरकार देते.

 1. नुकताच 1 एप्रिल 2020 पासून 15वा वित्त आयोग सुरू झाला आहे.
 2. त्यानुसार सरकार गावातल्या प्रति माणसी प्रति वर्षी सरकार 957 रुपये ग्रामपंचायतीला गावाचा विकास करायला देते.
 3. 14 व्या वित्त आयोगामध्ये ही रक्कम 488 रुपये इतकी होती.
 4. 14 व्या वित्त आयोगानं जो पैसा गावासाठी दिला होता, त्यातला 25 टक्के मानवविकास, 25 टक्के कौशल्य विकास, 25 टक्के केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा समन्वय आणि 25 टक्के पायाभूत विकासासाठी खर्च करण्यास सरकारनं सांगितलं होतं.
 5. तर आता 15 व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून गावाला मिळणारा एकूण निधीपैकी 50 टक्के निधी पाणीपुरवठा, ग्रामस्वछता आदी बाबींवर खर्च करण्यास सांगितलं आहे, तर उर्वरित 50 टक्के इतर गावाच्या गरजेच्या बाबींवर खर्च करण्यास सांगितलं आहे.

सरकारकडून आपल्या गावासाठी नक्की निधी किती आला आणि ग्रामपंचायतीनं तो कुठे खर्च केला, हे जाणून घेऊयात….

आपल्या गावाच्या प्रगतीचे रिपोर्ट कार्ड :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 एप्रिल 2020 म्हणजेच पंचायती राज दिवस या दिवसाचे औचित्यसाधून ‘ई-ग्राम स्वराज’ (eGramSwaraj-1) हे मोबाईल एप्लिकेशनचं लोकार्पण केलं.

 • या एपवर ग्रामपंचायतीच्या विकासकामांची सविस्तर माहिती मिळेल.
 • आपल्या ग्रामपंचायतीसाठी आलेला निधी, आणि तो निधी नक्की कुठे आणि कसा खर्च झाला, ही इत्यंभूत माहिती त्यावर उपलब्ध आहे.
 • या माहितीद्वारे गावाचा कोणताही नागरिक आपल्याला ग्रामपंचायतीत कसा सुरू आहे, सध्या कोणती कामे सुरू आहेत, आणि आज ती कामे कुठवर आली आहेत, सगळी माहिती आपल्याला वेबसाईट आणि मोबाईलवरून पहायला मिळेल.

आपल्या ग्रामपंचायतीनं किती पैसा खर्च केला?

हे जाणून घेण्यासाठी….

https://egramswaraj.gov.in/approveActionPlan.do 

egramswaraj-8, egramswaraj portal, planning online gov, planning online villages report data, planning online gov action plan,
egramswaraj-8, egramswaraj portal, planning online gov, planning online villages report data, planning online gov action plan,

 • गुगल प्ले स्टोअरवरून “ई-ग्राम स्वराज” हे एप्लिकेशन डाऊनलोड करायचं घ्या अथवा संगणकावर https://egramswaraj.gov.in/approveActionPlan.do” या लिंक क्लिक करा.
 • हे एप्लिकेशन ओपन केल्यावर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.
 • ज्या वर्षीच्या माहिती जाणून घ्यायची आहे ते वर्ष टाका. जसे 2016-17.
 • त्याखालील कॅप्चा / CAPTCHA जसाच्या तसा लिहा.
 • GET REPORT या बटनला क्लिक करा.
 • ओपन झालेल्या नवीन विंडोमध्ये “SEARCH / सर्च” मध्ये जाऊन सर्वप्रथम आपल्या आपले राज्य निवडायचे आहे. (Maharashtra)
 • त्यानंतर आपला जिल्हा (Pune)
 • तालुका (Khed)
 • आणि शेवटी गावाचं नाव निवडायचं आहे. (KOHINDE BK) कोहिंडे बुद्रुक
 • आपल्या गावापुढील “View” या बटनला क्लिक करा.

 

egramswaraj-8, egramswaraj portal, planning online gov, planning online villages report data, planning online gov action plan,
egramswaraj-8, egramswaraj portal, planning online gov, planning online villages report data, planning online gov action plan,

 • त्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. या पेजवर सगळ्यात खालच्या बाजूला SEC ON 5 Attached File पर्यायाला (Option) ला क्लिक करताच आपल्या गावाच्या बजेटचा संपूर्ण लेखाजोखा आपल्या समोर दिसू लागेल.   ज्यात……
 1. २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी आपल्या गावासाठी किती निधी आला. त्याची रक्कम receipt या पर्यायासमोर दिलेली असते. आणि त्यापैकी किती निधी खर्च झाला ही रक्कम expenditure या पर्यायासमोर दिलेली असते.
 2. व सर्वात शेवटी List of schemes हा पर्याय असतो. यामध्ये ग्रामपंचयातीला जो एकूण निधी मिळाला, त्याची विभागणी केलेली असते. यात कोणत्या योजनेअंतर्गत किती निधी मिळाला आणि आणि त्यापैकी निधी खर्च झाला याची सविस्तर माहिती दिलेली असते. आणि ही फाईल आपण PDF स्वरूपात देखील डाऊनलोड करू शकतो.

निधी उरला तर काय?

जर आपल्या गावाला मिळालेल्या 30, 40, ते 50 लाखांपेक्षाही अधिक रक्कम खर्च करता आली नाही. ग्रामपंचायतींनी खर्च न केलेला निधी सरकारला परत जातो आणि जर निधी परत जात असेल तर…..

 1. ती ग्रामपंचायत अकार्यक्षम आहे असं समजावं.
 2. पैसे खर्च करण्यासाठी सरपंचाकडे डोकं असावं लागतं.
 3. पैसे नेमके कुठे खर्च करायचे? हे त्याला कळायला हवं.
 4. पैसै परत गेले तर त्याचा अर्थ त्यांना गावाच्या विकासासाठी आलेला निधी वापरता आलेला नसतो.
 5. याचाच अर्थ ग्रामपंचायत गावाचा प्रॉपर विकास आराखडा तयार करू शकलो नाही, असा होतो.”

In Conclusion : निष्कर्ष 

अशा प्रकारे आपण आपल्या गावाच्या प्रगतीचे पुस्तक सहज वाचू शकतो. त्यावरून गावाचं पुढारीपण स्वीकारलेल्या लोकांचा खरा चेहरा आपल्याला दिसून येईल. मला वाटतं या निवडणुका दर ५ वर्षांनी होत असल्या तरी आपल्या गावाला सरकारकडून निधी हा दरवर्षी मिळत असतो. मग तो निधी येतोय का? आला तर नक्की कुठे खर्च होतो? येत नसेल तर का येत नाही? अशा सगळ्या प्रश्नांसाठी “लोकप्रतिनिधी”वर अवलंबून राहण्यापेक्षा आपणच ही माहिती घेऊन त्यांच्याशी ग्रामसभेत बोलायला हवं. तरच गावांची प्रगती होऊ शकेल अन्यथा गावाचं प्रगती पुस्तक “कोरं” राहिल्याशिवायरहाणार नाही.

- Advertisement -
Marathi Guidehttps://marathitrailer.com/
Has come a long way from its beginnings in Maharashtra. When Group of Marathi Trailer first started out, their passion for helping Farmers and help them to start their own business.
- Advertisment -

Most Popular

Recent Comments