Domain Meaning in Marathi : डोमेन म्हणजे आपल्या संकेतस्थळाचे/वेबसाईटचे नाव. यामुळे वाचक / ग्राहक / व्हिजिटर आपल्या ब्लॉगला, संकेतस्थळाला भेट देतात. काही वेळ घालवतात. जर त्यांच्या विषयाच्या निगडीत माहिती अथवा संदर्भ त्यांना आपल्या वेबसाईटवर मिळत असेल तर ते वारंवार आपल्या साईटला भेट देतात. त्यांच्या त्या भेटीचा फायदा आपल्याला होतो. अगदी तो पैशात नसेल तरी त्याने घालवलेल्या त्या वेळेत नक्कीच असतो.
डोमेन नाव (सहसा फक्त डोमेन म्हणतात) हे लक्षात ठेवण्यास सोपे नाव आहे. जे इंटरनेटवरील physical IP address च्या संदर्भातील आहे. साध्या भाषेत सांगायचे झाले तर हे आपल्या कामाविषयी अथवा व्यवसाया विषयीची माहिती पुरवणारे एक युनिक असे नाव आहे. जसे की, google.com, wikipedia.org आणि MarathiTrailer.com यामध्ये www च्या नंतर आणि .com / .org / .in / .edu यांच्या मध्यभागी असणा-या एका शब्दाला(जरी दोन शब्द असतील तरी त्यात स्पेस/मोकळी नसते) डोमेन असे म्हणतात. असे डोमेन नाव ख-या अर्थाने आपली इंटरनेट वरील ओळख आहे. म्हणून डोमेन नेम निवडताना खूप काळजी घेतली जाते. जर ते डिजिटल मार्केट अथवा सोशल मिडीया संदर्भातील असेल तर ते नाव निवडताना “Keyword” सर्च करूनच त्याची निवड केली जाते. जेणेकरून लोकांना शोधायला सोप्पं जावं आणि आपल्यालाही व्हिजिटर मोफत मिळावेत. म्हणून Domain नाव हे अतिशय काळजीपूर्वक निवडतात.
डोमेनची रचना
डोमेनची रचनेची विभागणी मुख्यतो तीन भागात केलेली असते.
- प्रोटोकोल
- डोमेन (मुख्य नाव)
- डोमेन एक्सटेंशन
- प्रोटोकॉल / Protocol : डोमेन प्रोटोकॉल म्हणजे वापरकर्ता (आपण) आणि सर्वर (वापरायला देणारा) यांच्यातील एक ब्रिज आहे. सर्व्हर त्याच्याकडील काही जागा आपल्याला भाडे तत्वावर एक ठराविक दिवसांसाठी वापरायला देत असतो. यासाठी २ प्रोटोकॉल वापरले जातात. १) HTTP आणि २) HTTPS.
- डोमेन (मुख्य नाव) (DOMAIN) : स्वत:ची ओळख निर्माण करणारे नाव अथवा क्षेत्र. जसं लहान बालकाचे नाव ठेवण्यापूर्वी त्याची कुंडली, त्याचे आई-वडिलांची पसंदी, व्यक्तिमत्त्व यांचा विचार केला जातो. तसाच येथेही तो विचारात घेतला जातो. डोमेन कशासाठी विकत घेतले जात आहे. त्याचे उद्धिष्ट काय आहे. डोमेनचे नाव ठेवताना ते सहज इतरांना सांगता यायला हवे. समोरच्याला सहज समजून त्याने ते सर्च इंजिनमध्ये शोधायला हवं. या सर्व बाजूंनी विचार करूनच डोमेनचे नामकरण केले जाते. शिवाय आपल्याला हवे असलेले नाव डोमेन विक्रेत्याकडे देखील उपलब्ध असायला हवे. जर आपल्याला हवे असणारे नाव पहिलेच कुणी मिळवलेले असेल तर तेच नाव आपल्याला मिळणार नाही. त्यावेळी आपण त्यात काहीसा बदल करून पाहू शकतो.
डोमेन तीन पद्धतीने निवडले जातात.
१) domainname.com (फक्त अक्षरे)
२) domainname678.com (काही अक्षरे आणि काही नंबर)
३) domain-name678.com (काही अक्षरे, काही नंबर आणि एखादे चिन्ह). - डोमेन एक्सटेंशन (Extensions) : अर्थात डोमेनचा विस्तार हा डोमेन नावातील तिसरा आणि अंतिम भाग आहे. MarathiTrailer.com यामधील .com हा भाग म्हणजे विस्तार अथवा एक्स्टेंशन. त्यांनाच टॉप-लेव्हल डोमेन (TLDs) म्हणतात.
-
पुढील 7 डोमेन एक्स्टेंशन सर्व परिचित आहेत.
१) .com – व्यावसायिक> व्यवसाय / ई -कॉमर्स
२) .org-संस्था> ना नफा / मंच / संसाधने
३) .net – नेटवर्क> इंटरनेट प्रदाता / सेवा / तंत्रज्ञान
४) .co – कोलंबिया देश कोड टीएलडी / कंपनी / कॉर्पोरेशन
५) .us – युनायटेड स्टेट्स कंट्री कोड टीएलडी
६) .edu शैक्षणिक दृष्टीकोनातून हे वापरण्यात येते
७) .in भारतासाठी इंटरनेट कंट्री कोड टॉप-लेव्हल डोमेन (ccTLD) आहे.
https://www.mastersfinancejobs.com/