Home Agriculture Our Herd is your Desi Cow : आमचा गोठा तुमची गाय

Our Herd is your Desi Cow : आमचा गोठा तुमची गाय

- Advertisement -

Desi Cow आमचा गोठा तुमची गाय : संकल्पना अगदी साधी आणि सरळ आहे, ब-याच लोकांच्या मनात एक सुप्त इच्छा असते की, आपलंही एक शेत असावं, त्यात लहानसं टुमदार घर आणि त्यात एखादी गाय. परंतु हे स्वप्न आपल्याला कधी पूर्ण करताच येत नाही. कारण जनावर कोणतंही असो त्याचं संगोपन हा मोठा जटील प्रश्न असतो. त्याचं संगोपन म्हटलं का त्यात त्याचं खाणं-पिणं, त्यांचा सांभाळ हे सगळचं आलं. हे सगळं करायचं कुणी?

तर आता तुमच्या गायीचं संगोपन करण्यासाठी हरिलीला देशी काऊ अँड ऑरगॅनिक अॅग्रीकल्चर फार्म” (desi cow farming) संस्था पुढे आली आहे. ही संस्था तुमच्या गाईचं संगोपन त्यांच्या गोठ्यात करणार आहे. शिवाय तुम्हांला तुमच्याच गाईचं निरसं दुध दरदिवशी १ लिटर प्रमाणे आयुष्यभर देखील पुरवणार आहेत.

आता हे कसं…?

बघा, ही देशी वाणाची गाय विकत घेण्यासाठी तुम्ही या संस्थेला करारानुसार पैसे द्या. त्यातून हि संस्था तुमच्यासाठी एक जातिवंत देशी गाय विकत घेईन. तुमच्या पैशातून घेतलेली ही गाय तुमच्याच मालकीची असेल. त्यामुळे तुम्ही तिला कधीही भेटायला येऊ शकता. अगदी दिवाळी-दसरा असो, की दुस-या कोणत्याही सणाला-सुदिला अथवा सुट्टीच्या दिवशीही.

A2 Cow Milk अर्थात देशी गायचं आयुर्वेदिक तत्त्व असलेलं दुधचं का?

 • निरोगी आणि रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे देशी गाईचंदुध’….
 • कपिला गायीची गम्मत न्यारी, सकस आणि पौष्टिक दुध आपल्या दारी….
 • देशी गोवंशाचं संवर्धन ही काळाची आणि बाळाची गरज….
 • एक गुंतवणूक स्वत:साठी आणि कुटुंबाच्या शारीरिक संवर्धनासाठी….
 • तुमची गाय आमचा गोठा, अर्थात खरेदी तुमची सांभाळ आमचा….
 • एकदाची गुंतवणूक, आयुष्यभराचा शुध्द परतावा….
 • सकस दुधाचा, स्वच्छ व्यवहार….

 

"<yoastmark

करार रद्द करायचा असल्यास…

ज्या दिवशी तुम्हांला तुमची ही गाय नको असेल, त्या दिवशी तुमच्यातील करार रद्द आणि तुमचे १००% पैसे तुम्हांला परत मिळतील. ज्या दिवशी पैसे परत, त्या दिवसापासून दुध बंद. म्हणजे या व्यवहारात ना तुमचे पैसे वाया गेले,  ना गायी सांभाळण्याचा संस्थेला त्रास झाला. याच करारावर हा व्यवहार तुमच्यातील संगनमताने होणार आहे.

एक व्यवहारिक प्रश्न?

आता प्रश्न पडतो, माझी गाय जर एका दिवसाला १० लिटर दुध देते आणि मला फक्त १ लिटर दुध मिळणारं असेल तर उरलेल्या ९ लिटर दुधाचं काय? प्रश्न जायज आहे, पण तिचं संगोपन? ते याच दुधातून मिळणा-या पैशातून होणार आहे ना..!. एक गोष्ट लक्षात घ्या कोणतेही दुभतं जनावर फक्त ८-९ महिनेच दुध देतं, नंतरचा काळ हा तिचा भाकड काळ असतो. आता दुध देणं बंद केल्यावर आपण काय तिला सोडून देणार का? नाही ना, त्याही वेळी तिचं योग्य ते संगोपन करावंच लागतं! त्यावेळी तिच्या दुधापासून मिळालेलं उत्पन्न कामाला येतं.

अष्टांग नमस्कार आणि ताडासन योगा 

आता थोडंसं व्यवहारिक?

थोडंसं व्यावहारिकदृष्ट्या पाहिलं तर, एक गोष्ट लक्षात येईल येईल, १२०रु. लिटरप्रमाणे मिळणारे हे “आयुर्वेदिक दुध” त्याचा महिन्याचा खर्च,

 • १२०रु. X ३०दिवस = ३६००रु)
 • वर्षाचे (३६००रु X १२महिने = ४३,२००रु.)
 • म्हणजे तुम्ही दिलेले पैसे साधारणपणे पुढील ३ वर्षात तुमचे तुम्हांला परत मिळणारच आहेत. त्यानंतर मिळणार निव्वळ नफा.
 • अर्थात जोपर्यंत तुमची गाय संस्थेकडे आहे तोपर्यंत दुध हे मिळतच राहणार. शिवाय जेंव्हा दुध नको असेल तेंव्हा गायीसाठी भरलेलं तुमचे १००% पैसे तुम्हांला परत मिळणार.
 • यालाच म्हणतात निर्मळ दुधाचा स्वच्छ व्यवहार.

Desi Cow गोवंश पालनातील सहकार तत्त्व….

अहो काय ना, आज शेतक-यांकडे गुंतवणूक करायला कमी भांडवल असल्याने, ते जर्शी गाय घेतात आणि त्याच दुधाचा रतीबावर धंदा करतात. जर अशा “कॉपरेटीव्ह” तत्वावर म्हणजे “आमचा गोठा तुमची गाय” या तत्वावर तुम्ही परस्परांच्या संगनमताने देशी गाईचं संगोपण केल्यास, म्हणजे “एकाने विकत घ्यायची आणि एकाने तिचा सांभाळ करायचा” तरच हा देशी गोवंश वाचेल. आज देशी गोवंश फक्त “गोशाळांमध्ये” पहायला मिळतो. आणि गोशाळा म्हणजे गोवंशाचं संगोपन केंद्र नसून, तो त्या गोवंशाचा वृद्धाश्रमचं आहे.

देशी गायींच्या गोशाळा….

मला वाटतं आपण जर बारकाईने विचार केला तर एक गोष्ट लक्षात येईल फक्त सांभाळ करायला पुरेसं भांडवलं नसल्यानेच आज भाकड झालेली किंव्हा वृद्ध झालेली जनावरे या गोशाळांमध्ये ढकलली जातात. परंतु या “आमचा गोठा तुमची गाय” या तत्वावर काम केल्यास, शेतक-यालाही नियमित भांडवलं पुरवठा होईल. शिवाय गायीची मालकी दुस-याकडे (म्हणजे तुमच्याकडे) असून, करारनुसार आयुष्यभर तिचा सांभाळ हा गोठामालकाचे कर्तव्यच असेल. त्यामुळे भाकड झाल्या अथवा वृद्ध झाल्या म्हणून अशा गायींना कधीही गोशाळेत जावं लागणार नाही. आणि हेच हरिलीला फार्मच “मिशन” आहे.

ज्याप्रमाणे दुस-यांच्या भरवश्यावर चालणारे माणसाचे वृद्धाश्रम बंद व्हायला हवेत तसेच दुस-यांच्या उपकारावर निपजाणा-या “गोशाळा” देखील.

In Conclusion : यातून साध्य होणार,  देशी गायीचं संवर्धन….

म्हणूनच म्हणतो, “आमचा गोठा, तुमची गाय” या मिशनवर काम केल्यास हीच आजची दुभती गाय आयुष्यभर स्वत:चा सांभाळ स्वत:च्या हिमतीवर करू शकते.

अहो घरात एक कुत्रा सांभाळायचा म्हंटला तरी त्याचं संगोपनावर जेव्हढा खर्च होतो ना! तेव्हढ्या खर्चात तुमची ‘कपिला गाय’ तुमच्या दारात उभी असेल, हा सांभाळ आम्ही करू…!

मग घेताय ना तुमची जातिवंत देशी गाय….

 

 • त्वरा करा | संपर्क करा | आजच आपली गाय खरेदी करा….

 • मारुती गारगोटे – 09527829899

तुम्ही गाय विकत घ्या, आम्ही तिचा सांभाळ करून, शुद्ध दूध घरपोच देऊ : AAmacha Gotha Tumachi Gaay – YouTube

https://www.mastersfinancejobs.com/

Best Short Stories Book – Vyathanmagachya Katha – व्यथांमागच्या कथा

 

- Advertisement -
Marathi Guidehttps://marathitrailer.com/
Has come a long way from its beginnings in Maharashtra. When Group of Marathi Trailer first started out, their passion for helping Farmers and help them to start their own business.
- Advertisment -

Most Popular

Tamil Play Movie Download Tamil Play

Tamil Play Movie Download Tamil Play It's illegal to watch and download movies from the Tamil Play movie download site. It is against the law....

Recent Comments

Related eBooks