Home Education Create Twitter Account : मैत्री ट्विटरशी

Create Twitter Account : मैत्री ट्विटरशी

- Advertisement -

Create Twitter Account : आजचं युग हे समाजमाध्यमांच्या वेगवेगळ्या अॅप्लिकेशन्स आणि संकेतस्थळांनी व्यापून टाकलं आहे. खरेदीपासून अभ्यासापर्यंत अनेक गोष्टी ऑनलाईन करून टाकल्या आणि उभ्या मानवजातीलाच जणू व्यक्त होण्यासाठी नवं व्यासपीठ मिळालं. त्याबाबतीत फेसबुक, व्हॉट्सअॅपवर देखील मात ट्विटरने केली आहे. आजच्या घडीला ही समाजमाध्यमं प्रभावीपणे वापरता येणं हे देखील एक कौशल्यच आहे. नेमकेपणाने व्यक्त होता येणं, माध्यमाचा वापर आपल्या प्रगतीसाठी करणं या तशा कौशल्याच्या गोष्टी आहेत. सर्व सोशल मिडीयामध्ये ट्विटर हे तर “व्यक्त होण्यासाठी” चार पावलं पुढेच आहे. आजमितीला हे मायक्रोब्लॉगिंग प्रकारचं लोकप्रिय आणि जगातील सर्वात प्रभावी समाजमाध्यम ठरलं आहे. जगातील मोठ्या व्यक्ती ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त होतात. नुसत्या एका ओळीच्या ट्विटने जगात मोठ्या स्वरूपात उलथापालथी घडत आहेत. याच ट्विटरच्या माध्यमातून आपल्याला स्वत:च्या फॉलोअर्सचं मोठ जाळं निर्माण करता येतं. जगातले ताजे अपडेट्स ट्विटरच्या माध्यमातून जगभर पोचवता येतात.

त्याचमुळे राजकीय शेरेबाजीपासून सेलिब्रिटींच्या वादापर्यंत सर्वच विषयांचं सरमिसळ असणाऱ्या ट्विटरचा सकारात्मकतेसाठीही उत्तम वापर केला जात आहे. या माध्यमातून वाद होतात, पण त्यापेक्षाही बळकट संवादाचे नवे पूल बांधले जात आहे. म्हणून ट्विटरशी मैत्री असायलाच हवी. कर्तृत्वाच्या नव्या शिखरांना गवसणी घालायची असेल तर त्यासाठीचं एक महत्वपूर्ण माध्यम आहे ‘ट्विटर’ !

how to create twitter account, create twitter account mobile, how to create twitter page, create twitter page, create twitter, how to create twitter page for organization, how to create twitter handle,

ट्विटर म्हणजे काय आणि आपण ते का वापरावे?

ट्विटर ही एक ‘मायक्रोब्लॉगिंग’ (कमी शब्दातील लेखन कला) प्रणाली आहे. जी आपल्याला ट्विट्स नावाने छोटी पोस्ट (कथा) पाठविण्यास आणि प्राप्त करण्यास अनुमती देते. ट्वीट्स लिहिण्याला 140 शब्दांची मर्यादा आहे. या मायक्रोब्लॉगिंग मध्ये संबंधित वेबसाइट्स आणि काही विशिष्ट लिंक यांचा सहज वापर करता येतो.

ट्विटर हे स्वत:मध्येच वैयक्तिक स्वरूपातील एक बातमीपत्र आहे. त्यात जगात काय होत आहे आणि लोक सध्याचा मागोवा घेत आहेत याची पूर्ण कल्पना आपल्याला मिळते अथवा इतरांना देता येते. ज्याप्रमाणे जगात फिरण्यासाठी पासपोर्टची आवश्यकता असते. अगदी तसचं जगात काय घडामोडी चालल्या आहेत, हे जाणून घेण्यासाठी “ट्विटर” हे पासपोर्टचे काम करते. एकदा यात आपण स्वत:ला (वैयक्तिक स्वरूपात अथवा व्यावसायिक स्वरुपात) साइन-अप करून घेतल्यावर, आपणांस जगातील ब्रेकिंग न्यूज आणि लोकप्रिय घडामोडींची माहिती सहज उपलब्ध होते. यातील काही बाबी तर आपल्याला आश्चर्यचकित करून सोडणा-या देखील असतात. 

ट्विटर वापरकर्ते हे एकमेकांना फॉलो (मागोवा घेणे) करत असतात. त्यामुळे आपण ज्यांना फॉलो करतो त्यांच्या ट्विटर ‘टाइमलाइन’ मध्ये प्रत्येक घडामोड (ट्वीट) आपण पाहू शकतो. आपण आपल्यासारख्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय किंवा इतर वैयक्तिक स्वारस्य असलेल्या लोकांचे, संस्थांचे फॉलोअर्स बनू शकतो. आपण आपले स्वतःचे ट्विट देखील त्यांच्या पद्धतीने तयार करू शकतो किंवा इतरांनी केलेल्या ट्विटवर आपलं मत व्यक्त करू शकतो. त्यालाच येथे रीट्वीट म्हणतात. रीट्वीट केल्याने आपले विचार वा माहितीचे जलद गतीने प्रसारण होवू शकते. जर आपले विचार लोकांना पचनी पडत असतील तर आपले देखील फॉलोअर्स लवकर बनू शकतात. जितके जास्त फॉलोअर्स तितकी जास्त प्रसिद्धी हाच एकमेव निकष आहे.

लोक ट्विटर का वापरतात?

ट्विटर हे इंटरनेट SMS सुविधा असली तरी तिचा थेट माणसाच्या विचारावर परिणाम होतो. याचा अर्थ असा की लोक प्रवासात असताना, येणारे अनुभव इतर लोकांशी सामायिक करत असतात, दिवसाच्या घडामोडी सहज त्यावर लिहित असतात. हे मोबाईल यंत्रणेशी संबधित असल्याने याच्या लिखाणाला अथवा पोस्ट करण्यसाठी वेगळी कोणतीही यंत्रणा लागत नसल्याने लोकं दिसतील ते चित्रांच्या माध्यामातून अथवा व्हिडीओच्या सहाय्याने टिपतात आणि सहज अपलोड करतात. अर्थात हे साधन वापरायला सुटसुटीत आणि सहज शक्य असल्याने, त्याचा प्रसार आणि परिणाम जास्त झाला आहे.  

आपले विचार थेट मांडण्यासाठी आणि त्याचा प्रसार जगभर पसरण्याच्या हेतूनेच ट्विटर वापरले जाते. प्रत्येक ट्विटचे आयुष्य फक्त १८ मिनिटांचे आहे. जलद गतीने होणारे प्रसारण आणि उपयोगाता लक्षात घेऊनच, शैक्षणिक विद्यार्थी, धोरणकर्ते, राजकारणी, सेलेब्रिटी आणि मीडियाशी निगडीत असणारे बहुतांशी लोकांना ट्विटर वापराला प्राधान्य दिले आहे.

आपण कशाबद्दल ट्विट केले पाहिजे?

आपण ट्विट करत असलेल्या माहितीचा प्रकार आपण वैयक्तिकरित्या किंवा संस्था, प्रकल्प किंवा गट म्हणून ट्विट करत आहात यावर अवलंबून असू शकतात. आपल्याकडे वैयक्तिक ट्विटर खाते असल्यास आपल्या आवडीच्या गोष्टींबद्दल आपल्या संशोधनाबद्दल ट्विटस आपल्या आवडीच्या इतर गोष्टींबद्दल मिसळण्याची इच्छा असू शकते, उदाहरणार्थ छंद, बातम्या आणि सामान्य निरीक्षणे. आपल्या जीवनातील विना-शैक्षणिक बाबींमधील अंतर्दृष्टी आपल्याला अनुसरण करण्यास एक रुचीपूर्ण व्यक्ती बनविण्यात मदत करू शकतात.

आपण Twits करू शकता अशा गोष्टींची उदाहरणे

 • आपण तयार केलेल्या नवीन प्रकाशनांचा किंवा स्त्रोतांचा तपशील
 • आपल्या संशोधन वैशिष्ट्यीकृत बातम्या
 • आपण लिहिलेल्या कोणत्याही ब्लॉग पोस्टच्या लिंक
 • आपण उपस्थित असलेल्या परिषदांवरील विचार
 • मनोरंजक बातम्या
 • मनोरंजक छायाचित्रे
 • इतर लोकांच्या ट्विटला प्रत्युत्तर द्या
 • इतर लोकांचे ट्विट पुन्हा रिट्विट

https://marathitrailer.com/facebook-page-creation/(opens in a new tab)

 1. 📌 ट्विटरची कूळकथा
 2. 📌 ट्विटरमधील संज्ञा आणि संकल्पना
 3. 📌 ट्विटरचा प्रत्यक्ष वापर
 4. 📌 ट्विटरसाठी आशय लेखन
 5. 📌 ट्विटर थ्रेड्स तयार करणे
 6. 📌 ट्विटरचा सकारात्मकतेसाठी वापर आणि बरंच काही…!

‘ट्विटर’च्या जन्माची चित्तरकथा; बालपणीच्या छंदाने जन्मास घातला ‘टिवटिवाट’

सॅन फ्रान्सिस्को- सोशल नेटवर्किंग साइट म्हटल्याबरोबर पहिले नाव ट्विटरचे येते. दैनंदिन जीवनाला अपडेट ठेवणार्‍या ट्विटरच्या जन्माची कथाही तितकीच रंजक आहे. ट्विटरची मूळ संकल्पना खेळाच्या मैदानावर तयार झाली, असे सांगितले, तर कोणी विश्वास ठेवणार नाही. त्याचीच ही कूळकथा आहे.

जॉक डॉर्सी या 37 वर्षीय तरुणाने सुरुवातीला ही संकल्पना मांडली. तीदेखील सॅन फ्रान्सिस्को येथील खेळाच्या एका मैदानावर. डॉर्सी यांची ही संकल्पना नंतर अनेकांच्या प्रयत्नांनंतर प्रत्यक्षात उतरली. डॉर्सी हे ट्विटरच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. ट्विटरची उभारणी केली जात असताना डॉर्सी यांनी आपले मोलाचे योगदान दिले; परंतु नंतर डॉर्सी यांना ट्विटरमधून मूकपणे बाहेर पडावे लागले होते. सीबीएस न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये डॉर्सी यांनी आपला अनुभव विशद केला आहे. मुलाखतीवर आधारित वृत्त नुकतेच जाहीर जारी झाले. त्यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. ‘हॅचिंग ट्विटर: अ ट्र स्टोरी ऑफ मनी, पॉवर, फ्रेंडशिप अँड बिट्रेयल’ या लेखात ट्विटरची उभारणी, लोकप्रियता, पैसा, मैत्री इत्यादी पडद्यामागील घटनाक्रम पहिल्यांदाच जगसमोर आला आहे. पत्रकार निक बिल्टन यांनी हे वास्तव समोर आणले आहे.

लहानपणापासून आकर्षण :

डॉर्सी यांना लहानपणापासून माहितीच्या तत्काळ सेवेचे प्रचंड आकर्षण होते. अर्थात लोकांना थोडक्यात का होईना पण माहिती लवकर मिळायला हवी. त्याचे विस्तारित स्वरूप नंतर माहित पडले तरी चालेल.  त्या काळी रेडिओचा प्रभाव त्यांच्यावर खूप होता. म्हणूनच त्यांच्या मनात मोठेपणी कमी शब्दांतील संवादाची ताकद लक्षात आली होती. लहानपणी जीवनाबद्दल करिअरबद्दल त्यांना प्रश्न पडत असे. आपण कोठे जाऊ, काय करू अशा उत्सुकतेतूनच पुढे ट्विटर सेवेची कल्पना त्यांच्या डोक्यात चमकली.

डॉक डॉर्सीला आपण करत असलेलं काम, मिळालेली माहिती, अथवा एकाद्या स्टेडियम मधील पहात असलेली मॅच, यांची माहिती अगदी थोडक्यात आणि जुजबी शब्दांत आपल्या मित्रांना सांगायची सवय होती. नंतर त्याचेच विस्तारित रूप तो ई-मेलने पाठवून देई. सुरवातीला हे सर्व पोरखेळ वाटला पण पुढे-पुढे त्यांना त्यातून तत्काळ मिळणा-या माहितीची मदत होऊ लागली. त्याची हीच पद्धत प्रसिद्ध उद्योजक एव्हान विल्यम्स यांनी न्याहाळली. आणि डॉर्सीला आपल्या ओडिओ कंपनीत नोकरी दिली. विल्यम्स यांनी आपल्या कर्मचार्‍यांना नवीन प्रकल्पासाठी “कमी शब्दात आशय जास्त” यावर काम करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली होती. तेव्हा डॉर्सी यांनी आपल्या मनातील संकल्पना मांडली. त्यातूनच ट्विटरचा जन्म झाला. पुढे 140 शब्दांत भावना मांडण्याची र्मयादा घालण्यात आली.

ट्विटरचा जन्म जरी २००६ असला तरी त्याचा खरा प्रभाव हा अमेरिकेच्या २००८ च्या इलेक्शनमध्ये पहायला मिळाला. त्यावेळचे अमेरिकेच्या अध्यक्षपदाचे उमेदवार बराक ओबामा आणि जॉन मॅककेन यांनी  एक शक्तिशाली व्यासपीठ बनले. त्यांनी ट्विटरच्या माध्यामातून आपल्या प्रचाराचा मार्ग यांची माहिती समर्थकांना देण्याची नवी पद्धत अवलंबली. या मायक्रोब्लॉगिंग नव्या पद्धतीने सगळ्यांना अचंबित केले. २०१० ला याच ट्विटरचे १० मिलियन्स वापरकर्ते बनले. आज तर सोशल मिडीया हे नाव जरी घेतले तरी सर्वात अगोदर “ट्विटर”चेच नाव येते. हीच त्याची खरी ओळख आहे.         

ट्विटर @ वॉल स्ट्रीट’!

न्यूयॉर्क- फेसबुकनंतर ट्विटरनेदेखील स्टॉक मार्केटमध्ये प्रवेश केला असून रविवारी त्यासंबंधीची घोषणा करण्यात आली. ट्विटरकडून अद्याप तारीख जाहीर करण्यात आली नसली तरी कंपनीचा आयपीओ लवकरच येणार आहे. न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजवर टीडब्ल्यूटीआर नावाचे ट्विटरचे चिन्ह पाहायला मिळेल.

ट्विटरचे मूल्य

प्रत्येकाला ट्विटरचा वेगळा अनुभव येत असला तरीही, लोक ट्विटरवर नक्की कोणत्या आवडीचा शोध घेत असतात..

 • बातमी आणि राजकारण: स्थानिक आणि जागतिक बातम्यांचे ताजे संदर्भ शोधण्यासाठी, राजकीय कार्यक्रम जेव्हा पार पडतात त्याचे उत्कंठा आणि पडसाद पाहण्यासाठी. शिवाय कार्यक्रमासाठी सामुदायिक चळवळींमध्ये आपण भाग घेऊ इच्छितो.
 • क्रीडा : ऑलिम्पिकपासून एनएफएल ड्राफ्ट, ते आयपीएल सारख्या सर्वच खेळापर्यंत, त्यांच्या खेळाडूंनच आपणाला रिअल-टाइम संदर्भ आणि अज्ञात माहिती सहज मिळू शकते. चाहते आपले स्टार खेळाडू काय म्हणतात? यावर लक्ष ठेवून असतात शिवाय हे खेळाडू देखील आपल्या जगभरातील चाहत्यांशी संपर्क साधू शकता.
 • पॉप संस्कृती: आपल्या पसंतीच्या सेलिब्रिटीज काय करत आहेत याबद्दल आपण ट्विटरवर त्यांना फोलो (अनुसरण) करू शकतो. त्यांच्या काही संभाषणामध्ये  आपणही सहज सामील होऊ शकता.
 • प्रभाव पाडणारे (सेलेब्रिटी) : आपल्या उद्योगातील विचारवंत, नेते आणि तज्ञ काय म्हणत आहेत. ते आपण पाहू शकतो. त्यातूनच निर्माते, कलाकार आणि ख्यातनाम व्यक्तींशी कनेक्ट राहता येतं.
 • उपयुक्तता: ट्विटरची दिवसोंदिवस उपयुक्तता वाढत असल्याने गाज देखील वाढत आहे. या माध्यमातून आपल्या नवीन प्रदेशांची अद्यवत माहिती मिळते, सेवा, सुविधा सहज प्राप्त होतात.

📌ट्विटरची संकल्पना काय आहे?

ट्विटर ही एक विनामूल्य सोशल नेटवर्किंग मायक्रोब्लॉगिंग सेवा आहे. जी नोंदणीकृत सदस्यांना छोटी पोस्ट प्रसारित करण्याची परवानगी देते त्यालाच ट्वीट असे म्हणतात.  ट्वीट आणि री-ट्वीटहे मोबाईल फोन SMS संदेशासारखाच असला तरी, ते पाठवण्यासाठी किंवा पाहण्यासाठी डेस्कटॉपवरील सॉफ्टवेअर किंवा ट्विटर.कॉम (Twitter.com) वेबसाइटवरून पोस्ट करुन पाठविल्या जाऊ शकतात. ट्विटरच्या सर्व डीफॉल्ट सेटिंग्ज सार्वजनिक स्वरूपातील आहेत.

📌ट्विटरसाठी आशयघन लेखन कसे करावे?

ट्विटर हे सोशल मीडियाच्या जगात “टूर डी फोर्स” म्हणून उदयास आले आहे. आपले म्हणणे, विचार अथवा निर्माण झालेल्या परिस्थितीवर अगदी मोजक्या शब्दात आपली थेट प्रतिक्रिया देणे यालाच आशयघन लेखन म्हणतात. अशा लिखाणाला लोकांनी जर पसंद केलं, तर आपणच आपला एक “ब्रँड” तयार करण्यासाठी ट्विटर एक उत्तम जागा आहे. त्यासाठी नियमित लक्ष वेधी ट्विट करता यायला हवे.

📌 ट्विटर थ्रेड्स तयार करणे

ट्विटरवरील थ्रेड्स (धागा) म्हणजे एका व्यक्तीकडून जोडलेल्या ट्वीटची मालिका. अर्थात आपण करत असलेले ट्वीट जर १४० शब्दात बसणारच नसेल तर आपण अनेक ट्वीटची एक साखळी निर्माण करू शकतो तिलाच ट्विटर थ्रेड्स म्हणतात. त्यामध्ये एकत्रित एकाहून अधिक ट्विट एकत्रित करू करून अतिरिक्त संदर्भ, फोटोग्राफस् किंवा इतर काही डॉक्युमेंटस् सहज जोडू शकतो. याचा वापर अति महत्त्वाच्या प्रसंगावेळी केला जातो. जिथे इत्यंभुत माहिती देणे आवश्यक असते.

याचा वापर तसा सोपा आहे…

 1. नवीन ट्विट करायला सुरवात करा…
 2. पहिल्या ट्विट मधील शब्दांची मर्यादा संपल्यानंतर त्याच ट्विट च्या शेवटी असणा-या (+) अधिक या बटनला क्लिक करून…. लिखाणाला पुढे कंटिन्यू करा… (असे कितीही ट्विट जोडता येतात)
 3. शेवटी ट्विट ऑल करा म्हणजे ते सर्व एकत्रीच प्रकाशित होतील.
 4. प्रदर्शित होणारे ट्विट हे सर्वात शेवटचे पहिले दिसते तर सर्वात अगोदर टाईप केलेले सर्वात शेवटी.
 5. परंतु याची योग्य क्रमाने क्रमवारी पहायची असेल तर पहिल्या प्रदर्शित झालेल्या ट्विटच्या खाली “show this thread” नावाचा पर्याय दिसेल त्याला क्लिक करा. म्हणजे टाईप केलेली योग्य क्रमवारी दिसेल.           

In Conclusion / निष्कर्ष

आपण एखाद्या संस्था, प्रकल्प किंवा गटाच्या वतीने ट्विट करत असाल तर आपण केवळ संशोधनाशी संबंधित ट्विट पाठवू शकता. ट्विटर हे एक तुलनेने अनौपचारिक संवादाचे  साधन आहे. म्हणून ट्वीट करण्यासाठी वैयक्तिक, मैत्रीपूर्ण आणि विनोदी दृष्टिकोन स्वीकारण्यास घाबरू नका.

https://expresswriters.com/how-to-write-content-for-twitter/

- Advertisement -
Marathi Guidehttps://marathitrailer.com/
Has come a long way from its beginnings in Maharashtra. When Group of Marathi Trailer first started out, their passion for helping Farmers and help them to start their own business.
- Advertisment -

Most Popular

Recent Comments