cow dung : गोधन न्याय योजनेची महाराष्ट्रात देखील सुरवात झाली. शेतकऱ्यांचे वर्षाला ३५ हजार रुपयांचा आर्थिक उत्पन्न वाढवणारी “गोधन न्याय योजना” महाराष्ट्रात चालू झाली आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा असणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला मजबूत करणे. त्यासाठी गायींच्या शेणापासून “वेदिक पेंट” निर्मिती करणे चालू झाले आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी गाईच्या शेणापासून पेंट बनवण्यात येत आहे. वेदिक पेंट या नावाने हा प्रोजेक्ट लॉन्च झाला आहे. यामधील “रंग” हे अनेक शेडमध्ये देखील उपलब्ध होणार आहे. अशा या नैसर्गिक रंगामुळे पर्यावरणाचा स्तर चांगला राखला जाईल. त्याशिवाय देशातील शेतकऱ्यांना गाईच्या शेणाच्या विक्रीतून मोठ्या प्रमाणात उत्पन्नही मिळेल. 

पेंटमध्ये गाईच्या शेणाचा वापर केल्याने, गाईच्या दुधाबरोबर शेणाची मागणी वाढणार आहे. यामुळे गोशाला-चालक, गायी सांभाळणारे शेतकरी आणि दुध उत्पादक यांना शेन विक्रीचा एक नवा पर्याय उपलब्ध होऊन, उत्पन्नाचा अजून एक नवा मार्ग उघडा होईल. गेल्या अनेक वर्षांपासून गाईचं शेण आणि तिच्या गोमूत्रापासून वेगवेगळे प्रॉडक्ट तयार केले जात असून, हा उद्योग आत्तापर्यंत कुटिरोद्योग म्हणून दुर्लक्षित राहिला होता. परंतु आता बाजारातील शेणाची आणि मागणी वाढल्यास शेणाच्या भावात देखील वाढ होईल हे निश्चित.

MahaDBT Online Application Procedure | Marathi Trailer

cow dung cake, cow dung price, cow dung meaning in hindi, cow dung uses, cow dung meaning, cow dung possesses which energy, cow dung soap,

“वेस्ट टू वेल्थ”

शेतकऱ्यांना केवळ शेणापासून रंग तयार करण्याच्या कारखान्यामुळे ३० ते ४० हजार रुपये वार्षिक मिळू शकतील. वेदिक पेंटसाठी विकत दिलेल्या शेणाला प्रतिकिलो ५ रुपये भाव मिळणार आहे. एक गाई दिवसाला 20 ते 30 किलो शेण देते, म्हणजेच तिच्या त्या शेण विक्रीतून शेतकऱ्यांना दररोज सरासरी 100 -150 रुपये मिळतील आणि “वेस्ट टू वेल्थ” ही संकल्पना साकारली जाईल. 

शेणापासून वेदिक रंग निर्माण करण्याचा प्रकल्प गावा-गावात उभारणार.. 

शेणापासून रंग तयार करण्याच्या प्रशिक्षणासाठी साडेतीनशे अर्ज केलेली लोकं प्रतीक्षा यादीत आहेत. शेणापासून “रंग” तयार करण्याचे प्रशिक्षण हे सात ते आठ दिवसांमध्ये पूर्ण होते. त्यामुळे प्रत्येक गावात अशा प्रकारचा कारखाना किंवा प्रकल्प उभा राहिल्यास रोजगाराच्या नवीन संधी ग्राम पातळीवर देखील निर्माण होतील.

खादी तसेच ग्रामोद्योग आयोगाकडून शेणापासून नैसर्गिक रंग तयार करण्याची योजना जानेवारी महिन्यात लॉन्च करण्यात आली आहे. हा रंग “इको फ्रेंडली” आहे. शेणापासून रंग तयार करण्याचा कारखाना साठी आताच्या घडीला 15 लाख रुपये खर्च येत आहे. या रंगाला “भारतीय मानक ब्यूरो” याला प्रमाणित केले आहे. हा रंग गंधहीन असून, डिस्टेंपर आणि प्लास्टिक इमल्शन या दोन पर्यायमध्ये उपलब्ध आहे. डिस्टेंपर 120 रुपये तर प्लास्टिक इमल्शन 225 रुपये लिटर किंमत ठरवण्यात आलेली आहे.

भविष्यातील शेतकऱ्यांचा जोडधंदा

शेणापासून रंग तयार करण्याचा प्रकल्प लॉन्च केल्यानंतर या कारखान्यांसाठी मोठ्या प्रमाणात मागणी येऊ लागली आहे सध्या जयपूर मध्ये या संदर्भात प्रशिक्षण दिले जात आहे ही मात्र यासाठी मोठ्या स्तरावर अर्ज आल्यामुळे प्रशिक्षण पूर्ण होऊ शकत नाही त्यामुळे प्रशिक्षण सुविधा वाढविण्यावर देखील भर दिला जाणार आहे. खादी तसे ग्रामोद्योग आयोगाने जयपूर येथे या अनोख्या प्रकल्पाची सुरुवात केली आहे. यासाठी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी सन 2020 मध्ये या योजनेसाठी प्रोत्साहन दिले होते.

शेणापासून तयार करण्यात आलेल्या या रंगात शिसे, पारा, क्रोमियम, आर्सेनिक कॅडमियम यासारख्या जड धातूंचा समावेश करण्यात येणार नाही. त्याचमुळे हा रंग विषारी पदार्थ विरहीत असून, रंगाची किंमत ही अतिशय माफक अशी आहे. जशी रंगाची विक्री वाढत जाईल, जशीच गावातील शेण खरेदीही वाढेल. यामुळे नक्कीच शेतक-यांच्या आर्थिक उत्पन्नाला हातभार लागेल.

सध्या शेतकरी शेती आणि त्याला पूरक असणारे अनेक उद्योगधंदे करत आहेत. तरीही गायीच्या शेणापासून विविध व्यवसायांची, वस्तूंची निर्मिती आणि विक्री यावर सरकारने लक्ष पुरवणार असल्याने, नक्कीच या रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील.  नाहीतर आज बहुतांशी आयुर्वेदिक वस्तूंचा खप मोठ्या प्रमाणात देश आणि विदेशात होत आहे. भविष्यात नक्कीच शेण विक्री आणि त्यापासून बनवल्या जाणा-या वस्तू बनवण्याची एक नवीच इंडस्ट्री उभी राहील. 

आता भाकड गाईंचा देखील सांभाळ केला जाईल….

अनेक वेळा रस्त्यावर अनेक भाकड झालेल्या गाई सोडून दिल्या जातात. त्यामागील खरं कारण म्हणजे गायींना सांभाळण्यासाठी खाण्यास लागणारा चारा आणि त्यावर होणारा अमाप खर्च. तसं पहायला गेलं तर आपल्याकडे गाईला आईच्या दर्जाने पाहण्याची सवय आहे. तरीही नुसत्या दुधापासून मिळणारे उत्पन्न आणि होणा-या खर्च यांचा ताळमेळ न बसल्यानेच शेतकरी भाकड किंवा म्हता-या गाई यांना स्वत:च्या मनाविरुद्ध सोडून द्यावं लागत होतं. परंतु आज जर त्यांच्याच शेणापासून पैसे पर्याय त्यांचा चा-याचा खर्च त्याच भागवणार असल्याने कोणत्याही शेतकरी गाई सोडून देणार नाही.

cow dung cake, cow dung price, cow dung meaning in hindi, cow dung uses, cow dung meaning, cow dung possesses which energy, cow dung soap,

Conclusion / निष्कर्ष 

गाईच्या शेणाचे ही पैसे मिळणार….

जर सरकार स्वतः शेणापासून प्रॉडक्ट तयार करण्यावर भर देणार असेल, तर इतर कंपन्या देखील त्यावर काम करतील. यामुळे शेणाची मागणी वाढेल आणि त्याचा फायदा शेतकरी, गोशाला पालका आणि दुग्ध व्यवसाय करणा-या शेतक-यांना होईल.

गाईच्या संगोपनातून रोजगार वाढणार…

सध्या अनेक ठिकाणी गायीच्या शेणापासून बनवलेले प्रोडक्ट विकले जात असून, ग्राहक देखील त्यावर खुश आहे. शिवाय गायीच्या शेणापासून खत बनवणारी इंडस्ट्री यापूर्वीच यशस्वी झाली असून, त्यातही अनेक लोकांना रोजगार मिळालेला आहे.

गायीच्या शेण विक्रीतून शेतक-यांना होणार आर्थिक फायदा!