Home Education Salary : मास मिडीयामधील करिअरच्या उत्तम संधी...

Salary : मास मिडीयामधील करिअरच्या उत्तम संधी…

- Advertisement -

Salary : आजच्या स्पर्धात्मक जीवनात १२वी नंतर बहुसंख्य पर्याय असलेला “मास मिडीया” हा करिअरच्या दृष्टीने  उत्तम पर्याय बनला आहे. यात शिक्षण घेण्यासाठी १२ वी पास ही एकमेव अट असली तरी तुम्हांला लिखाणाची आवड, नवीन टेक्नोलॉजी शिकण्याची जिद्द आणि नाविन्य जाणून घेण्याची हाव असायलाच हवी. तरच आपण या मास मिडियामध्ये उत्तम करिअर करू शकतो. आज भारतीय मिडीयामध्ये दरवर्षी १३% नी वाढ होत असून, नव-नवीन पर्याय उपलब्ध होत आहे. कालपर्यंत आपल्यासाठी दूरदर्शन पहाणे स्वप्नावत होते. परंतु त्याचे कौतुक आता उरले नाही कारण मिडियाचे नवीन पर्याय निर्माण झाले आहेत. जसे की इलेक्ट्रॉनिक मिडीया, वेब मिडीया आणि इंटरनेट व मोबाईलवर नव्याने जम बसवणा-या OTT (ओव्हर दी टॉप) प्लॅटफॉर्म. त्यातील Amazon Prime Video, Netflix, Disney+ Hotstar, Eros Now यांनी तर भारतीय मिडीया इंडस्ट्रीजमध्ये नुसताच  धुमाकूळ घातला आहे.

१२ वी नंतर BAMMC (मास मिडिया) सोनेरी पर्याय

e salary, salary slip format, career in media, career in media and entertainment,
career in media and communication

अशा बहु-पर्याय असणा-या आणि सातत्याने वाढ होणा-या “मिडीया” या क्षेत्रात इंग्रजी बरोबरच आता मराठीमधून देखील शिक्षण व्यवस्था निर्माण झाली आहे. त्याचमुळे (Career in Mass Media and Communication) मास मिडीयामध्ये करिअरच्या उत्तम संधी निर्माण झाल्या आहेत. यात योग्य शिक्षण आणि कौशल्य मिळवलं तर पैसा, नाव-लौकिक मिळाल्याशिवाय राहणार नाही.  

बारावीनंतर कोणत्याही शाखेतील विद्यार्थ्याला ‘बीएमएम’ला (आताचा BAMMC) प्रवेश घेता येतो. त्यातील जाहिरात, पत्रकारिता, जनसंपर्क यातील कोणत्याही एका विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येते.  पदवीनंतर पुढे स्पेशलायझेशन झालेल्या विषयांमध्ये पदविका (मास्टर्स) शिक्षण देखील आता उपलब्ध. सध्या कम्युनिकेशन जर्नालिझम, पब्लिक रिलेशन, एन्टरटेनमेंट स्टडीज, फिल्म स्टडीज, टेलिव्हिजन स्टडीज या विषयांमध्ये मास्टर्स कोर्स उपलब्ध आहेत.

नोकरीच्या संधी किती आहेत?

४० टक्के अभ्यासक्रम प्रात्यक्षिक ज्ञानावर अवलंबून असल्याने, विद्यार्थ्यांना पुस्तकाबरोबर कामाचे ज्ञान मिळालेले असते. इंटर्नशिपच्या माध्यमातून त्यांना नेमके काम कसे चालते याचा प्रत्यक्ष अनुभव देखील मिळालेला असतो. त्यामुळे अभ्यासक्रम संपताच विद्यार्थ्यांपुढे नोकरीचे/करीअरचे विविध पर्याय खुले होतात. शिवाय कॉलेजमध्ये असलेल्या प्लेसमेंट सेलच्या माध्यमातूनही त्यांना विविध संधी मिळू शकतात. मास्टर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना तर पहिल्या सेमिस्टरनंतरच अनेक कंपन्यांमधून नोकरीसाठी विचारणाही केली जाते.

तरीही नोकरीच्या मोठ्या प्रमाणात संधी असलेली काही माध्यमे म्हणजे प्रिंट मिडीया, इलेक्ट्रॉनिक मिडीया, डीजीटल मिडीया आणि मनोरंजन मिडीया. 

  1. प्रिंट मीडिया : आज भारतात जवळजवळ ७० हजार वर्तमानपत्रे आणि निम्याने मॅगझीन निघत आहेत. त्यामुळे यात पत्रकार, डिझायनर, जाहिरातदार, वितरण व्यवस्थापक म्हणून काम करता येते.
  2. इलेक्ट्रॉनिक मिडीया : आज सर्वात जास्त वाढ याच माध्यमात आहे. यातील नुसत्या TV या पर्यायात, विविध प्रकारचे रिपोर्टर, स्क्रिप्ट रायटर, कॅमेरामन आणि टेक्नीकल व नॉन-टेक्नीकल स्टाफ इ. तर आज मोठ्या प्रमाणात प्रायव्हेट रेडीओ चालू झाल्याने त्यात देखील RJ (रेडीओ जॉकी) म्हणून काम करता येते. 
  3. डिजिटल मिडीया : आजच्या जगाचा खरा चेहरा असलेल्या या सोशल मिडीयामध्ये वेब माध्यमांसाठी विविध प्रकारचे रायटर, वेब डिझायनर, सोशल मिडिया कँम्पेनर आणि कंटेंट वायरल करणारे सॉफ्टवेअर ऑपरेटर यांना देखील चांगलीच मागणी आहे.
  4. मनोरंजन मिडिया : सध्या मिडीयामध्ये नव नवे प्रयोग होत असून OTT सारखा नवा मंच देखील दाखल झाला आहे. यातील तीन मुख्य बाबी आहेत, प्री-प्रोडक्शन, प्रोडक्शन आणि पोस्ट प्रोडक्शन. यातील सर्वच भागात दिग्दर्शक, निर्माता, साऊंड डिझायनर, साऊंड रेकोर्डर, आर्ट डिरेक्टर, एडिटर, इवेंट मॅनेजर, जिंगल मेकर, फॅशन फोटोग्राफर आणि कार्टुनिस्ट यांची जोरदार चलती आहे.
  5. जनसंपर्क :  हा देखील मिडीयाचाच एक भाग आहे. अनेक कॉर्पोरेट कंपनी, मिडीया एजन्सीज्, पॉलिटिकल लीडर/पार्टीज यांच्यासाठी PRO (पब्लिक रिलेशन ऑफीसर) म्हणून चांगल्या मेहनतानावर काम करता येते.

शेतकरी योजनाची ३ री लॉटरी जाहीर, आपला नंबर आला की नाही ते तपासून घ्या..!

Salary and career in media and communication : मिडीया हा लोकांच्या कुतूहलतेचा आणि काम करणा-यांच्या आवडीचा विषय असण्यामागचं कारण म्हणजे यातील मिळणारे मानधन. मास मिडीयामधील मानधन हे संपूर्णत: अनुभव, कौशल्य आणि स्वत:चं सादरीकरण यावरच अवलंबून असते. तरीही पदवीबरोबर एखाद्या विषयात हात बसवल्यास १५ ते २० हजार पगार सहज मिळू शकतो. २-३ वर्षाच्या अनुभवानंतर २५ हजार ते ४० हजार मिळणे अशक्य नाही. जर एखाद्या विषयात पारंगत झाल्यात तर ५० हजार ते लाखभर रुपये मिळवणे देखील सहज शक्य आहे. येथे सारं काही शक्य आहे त्याला फक्त स्वत:ची क्रियेटीव्हीटीची आणि टॅलेंटच्या गरज आहे.

क्रमश: (सोशल मिडीयचे व्यावसायिक लेखन पुढील भागात)

- Advertisement -
Marathi Guidehttps://marathitrailer.com/
Has come a long way from its beginnings in Maharashtra. When Group of Marathi Trailer first started out, their passion for helping Farmers and help them to start their own business.
- Advertisment -

Most Popular

Recent Comments