कापुराचे झाड आणि त्याचे आश्चर्यकारक फायदे…!
Camphor tree : काय कापराचे झाड, कसं शक्य आहे? कापूर तर तुळशीपासून बनवतात नाहीतर अजून कुठल्यातरी रान झाडांच्या पानापासून. खरं आहे, कापूर हा कापूरतुळशी पासूनच बनवला जातो. तसा पण बाजार उपलब्ध असणा-या कापरात देखील आता भेसळ होऊ लागली आहे. याच भेसळीचा परिणाम म्हणजे आपण भारतीय आपल्याच दुर्मिळ खजीन्यापासून दुरावत चालले आहेत. जेथे आईच्याच दुधाला पर्याय मिळाला तेथे अजून कशाची खात्री देणार…! तरीही काही वेडगळ लोकं असतात ती दुर्मीळातील दुर्मिळ गोष्टींचं संकलन करून त्यांची जोपासना करतात. आणि त्यांची वाढ करण्यावर भर देत आहेत. त्यातील एक नर्सरी म्हणजे नाशिकची “हिरवेपुण्य नर्सरी”. या नर्सरीचे वैशिष्टे म्हणजे येथे भारतातील दुर्मिळ होत चाललेल्या साधन संपर्तीचे जोपासना आणि संवर्धन केले जात आहे.
सध्या कोरोनाच्या काळात लोकांना पुन्हा एकदा आपल्या भूतकाळात पहायला शिकवले आहे. सर्दी, खोकला, पडसे, साधा ताप यासाठी पूर्वी कोणताही “दवाखाना” नव्हता. तर होता फक्त “आजीबाईचा बटवा” ज्या मध्ये सर्वांमध्ये हा गुणकारी कापूर देखील हमखास सापडायचा. आज आजीबाईचा बटवाच हरवला आणि आपल्याला डॉक्टरांनी लुटायला सुरवात केली. कोणत्याही “एलर्जी”वर गुणकारी “कापूर” आपल्या घरात असताना देखील आपण दवाखान्याची वाट धरतो आणि तिथेच आपला खिसा कापला जातो. आज सगळ्याच गोष्टी आपल्या इन्स्टट हव्या आहेत, २ मिनिटात बनणारी मॅगी, वर्षा – दोन वर्षात फळं देणारी झाडे. महिन्या दोन महिन्यात फुलाचे ताटवे देणारी फुलझाडं, महिन्या दीड महिन्यात येणारे भाजी-पाला. सगळं काही इन्स्टनट. मग हे लगेच मिळण्यासाठी काय हवं तर केमिकलचा वापर. कारण कोणतीही नैसर्गिक गोष्ट एक ठरलेल्या वेळेतच येते.
Camphor tree : कापुराचे झाड
८०-१०० फुट उंच वाढणारे हे झाड वाढते. जास्त पाऊस असणा-या भागात किंव्हा जेथे पाणी सतत असते. अशा पाणथळीच्या जागी हे वृक्ष मोठ्या प्रमाणात येतात. इंग्रजांनी फक्त आपल्या फायद्यासाठी भारतात मोठ्या प्रमाणात असणा-या वनौषधी झाडांची कत्तल केली. आणि त्याठिकाणी चहाचे आणि रबराच्या झाडांचे मळे उभारले. त्यानंतर कापुराचे झाड भारतातून जवळजवळ नाहीसेच झाले. परंतु आता मोठ्या प्रमाणात लोकांना अशा दुर्मिळ वनस्पतींचे महत्त्व पटू लागले आहे. लोकांनी देखील आपल्या अंगणात, परसबागेत नाहीतर घराजवळच्या मोकळ्या जागेत अशी दुर्मिळ झाडे लावून त्यांना पुनर्जीवन द्यावे आणि आपली संस्कृतीही जपावी.
एक कपूरचे झाड अर्धा किलोमीटरच्या रेडीअसमधील हवा शुद्ध करते. शिवाय आता या झाडांपासून मिळाणा-या कापुराचे महत्त्व सर्वांनाच पटू लागले आहे. पूजेसाठी वापरण्यात येणा-या कापुरात असणा-या केमिकल्समुळे आपल्याला त्याच्या फायद्या ऐवजी तोटाच जास्त होत असतो. शुद्ध भीमसेनी कापूर हा फक्त झाडापासूनच मिळतो आणि तो महागही असतो.

नैसर्गिक (आयुर्वेदिक) कापूर
कापुराच्या वृक्षापासून मिळणारा निसर्गिक कापूर हा कुठल्याही विशिष्ट आकारात येत नाही. तो पांढरा स्फटिकासारखा दिसतो. त्याचे गोल वा चौकोनी आकाराचे तुकडे करता येत नाही. कारण यात नेहमीच्या कापुराप्रमाणे मेण (चिकट पदार्थ) मिसळेले नसते.

कापूर आणि धार्मिकता
कापूर देवपूजेसाठी विशेषकरून आरतीसाठी वापरला जातो. कपूरच्या सुगंधाने घरामधील वातावरणात प्रसन्न निर्माण होते. बाजारात मिळणा-या केमिकल्सयुक्त कापुरापेक्षा आयुर्वेदिक भीमसेनी कापूर हा आरोग्याच्या दृष्टीने चांगला आणि गुणकारी असतो. शास्त्रानुसार देवी-देवता समोर कापूर लावल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते. ज्या घरात नियमितपणे कापूरचे ज्वलन होते. तेथे पितृदोष आणि इतर प्रकारच्या दोषांचा प्रभाव राहत नाही. कापूर लावल्याने वातावरण पवित्र आणि सुगंधित होते अशा वातावरणात देवता लवकर प्रसन्न होतात. कापराच्या प्रभावाने घरातील वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्यांच्या सुगंधाने आपल्या विचारात सकारात्मकता येते.
camphor tree for sale : रोपांची विक्री
असा या नैसर्गिक औषधांचा खजाना असलेले कापुराचे एखादे झाड आपल्या बगीच्यात नाही तर परसबागेत जरूर असावे. यासाठी सरत पाण्याची आवशकता असल्याने आपण याला पाणथळ असणा-या जागेवर लावू शकतो. याची वाढ अतिशय संत गतीने होत असते. याचे महत्वपूर्ण वैशिष्ट्ये म्हणजे याची पाने गळत नाहीत. तरीही कापुराच्या सर्व गुण वैशिष्ट्यांची पूर्तता याच्या पानातून देखील होत असते. आयुर्वेदात वर्णिलेला भीमसेनी कापूर हा भारतात शक्यतो मिळत नाही. तो बाहेरच्या देशातून आपल्या देशात येतो. आपण आपल्या अंगणात निरुपद्रवी शोभेची झाडे लावण्यापेक्षा अशी निसर्गाची देण झाडे लावावीत.
महाराष्ट्रात काही ठराविक नर्सरी अशा आहेत की त्या ठिकाणी दुर्मिळ होत चाललेल्या वनस्पतींचे संवर्धन आणि जोपासना केली जाते. अशीच एक नर्सरी म्हणजे, “हिरवेपुण्य नर्सरी, नाशिक”. या नर्सरीमध्ये भारतातील दुर्मिळ होत चाललेल्या २००० झाडांची जोपासना आणि वाढ केली जाते. तर त्या वनस्पतींची रोपे लोकांना उपलब्ध करून दिली जात आहेत.

camphor tree uses : वैज्ञानिकांचे संशोधन – कोरोनाच्या काळात गुणकारी नैसर्गिक कापुर
सध्याच्या कोरोनाच्या आजारावर हा नैसर्गिक कापूर गुणकारी ठरला आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भाव आपल्याला होऊ नये म्हणून बाजारपेठेत अचानक नैसर्गिक कापुराची मांडणी वाढली आहे. कापराच्या जळण्याने वातावरणातील लहान जिवाणू, विषाणू लहान किंव्हा इतर किटाणूचा नाश होतो. शिवाय वातावरण शुद्ध ठेवत हा आजार देखील दूर करतो. असे वैज्ञानिक संशोधनातून सिद्ध झाले आहे. कोरोनाच्या काळात मोठ्या प्रमाणात लोकांनी सर्दी पडसे यावर घरगुती आणि नैसर्गिक उपाय केले. म्हणजेच सर्दी-पडसे व्हायची लक्षणे दिसू लागताच लगेच एका रुमालावर तीन ते चार कापूर एकत्र करून त्या रुमालाचा वास घेतल्याने सर्दी-पडसे होत नाही. त्याचप्रमाणे कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये म्हणून लोकांनी या कापुराचे मोठ्या प्रमाणात उपयोग करणे सुरू केले. कापराच्या प्रभावाने घरातील वातावरण सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि सुगंधाने आपले विचार सकारात्मक करता येते.
कापूर वापरण्याचे काही गुणकारी फायदे.
- एक सर्दी खोकला असताना, एका पातेल्यात गरम पाण्यात कापूराच्या काही वड्या टाकून त्याचे बापरे घ्यावेत. विक्स्प्रमाणे नाकाला, कपाळाला हा कापूर चोळल्यास (अगदी लहान मुलांना लावला तरी चालेल) सर्दी खोकला थांबतो.
- सर्दीमुळे नाक बंद असताना रुमालावर कापून ठेवून तो सतत हुंगावा. नाक मोकळे होते. शक्यतो विक्सची सवय टाळावी.
- पर्यटन करताना बर्फाळ स्थानावर किंवा गिर्यारोहनाच्या वेळी जास्त उंचीवर आपल्याला प्राणवायू मिळतो. तेथे सतत दम लागत असेल तर कपूर हुंगावा, शरीराला ऑक्सिजनची मात्रा मिळते.
- ज्यांना सांधेदुखीचा त्रास होतो त्यांनी तिळाच्या तेलामध्ये हा कापूर मिसळून, सांध्यांना चोळावा, आराम पडतो.
- केसातील कोंडा घालवण्यासाठी तिळाच्या किंवा खोबर्याच्या तेलामध्ये हा कापुर मिश्रित करून, तेलाच्या मुळाशी चोळावे.
- किडलेली दाढ दुखत असेल तर छोटासा कापुराचा खडा किडलेल्या दातामध्ये ठेवावा तो तेथेच विरघळतो. त्याची लाळ पोटात गेली तरी, त्याचे दुष्परिणाम होतं नाही पण दाढ मात्र दुखी थांबते.
- खोकल्याच्या औषधाचा आयुर्वेदिक कंपनी याच कापुराचा उपयोग करतात. या कापरापासून काढा आपण घरच्या घरी देखील बनवू शकतो.
किसान क्रेडीट कार्ड कसे काढावे?
कापुराचे इतरही उपयोग
- प्रवासात असताना आपल्या कपड्यांमध्ये कापूर ठेवावा कपड्यांना कुबट वास येत नाही.
- पावसाळ्यात घरातील कपडे पूर्ण सुखत नाहीत. तर ती आंबट ओलीच राहिल्याने त्यांना एकप्रकारचा कुबट वास येतो. कापुराच्या काही वाड्या त्यात ठेवल्याने कपड्यांना कुबट वास येत नाही.
- रात्री झोपेत डासांचा त्रास होऊ नये, म्हणून आपल्या बाजूला कापूर ठेवावा डास जवळ येत नाही
- शेतातील शेकोटी किंवा घरातील चूल पेटत नसेल तर गोवरीवर किंवा वाळलेल्या गवतावर कापराच्या एखादी दुसरी वडी ठेवल्यास शेकोटी किंवा चूल सहज पेट घेत.
- गुड नाईट किंवा कासव अगरबत्ती जाळण्यापेक्षा गुड-नाईटचा यंत्रात कापुर ठेऊन त्याला चालू करा. कापूर विरघळतो आणि हवेत एक प्रकारचा सुगंध पसारतो त्याने डास पळूनजातात आणि सुगंधही चांगला येतो. शिवाय हे गुड नाईट मी जास्त सुरक्षित आहे.
कापूर वापरण्याचे वैयक्तिक फायदे
- सर्दी-पडसे व्हायची लक्षणे असताना रूमालामध्ये दोन चार कापुर वड्या ठेवल्याने सर्दी-पडसे यापासून आराम मिळतो.
- कापूरचा सुगंध व्यवस्थित घेतल्याने तोंडाचा येणारा घाण वास निघून जातो.
- नियमित कापराचा वास घेतल्याने आपल्या नाकाची वास ओळखण्याची क्षमता वाढते.
- घरात कापूर रोज जाळल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढते.
- घसा बसलेला असताना 2-4 कापराच्या वड्या एका रुमालात बांधून रुमाल गरम तव्यावर शेकावा व तो शेक गळ्याला द्यावा. त्याने बसलेला घसा बरा होतो.
- गरम पाण्यात मीठ व कापूर टाकून त्यात पाय बुडवून बसल्याने पायाचे दुखणे कमी होते आणि फुगलेल्या शिरा देखील मोकळ्या होतात.
[…] patients with chronic conditions can also get treatment quickly. These are just a few of the many benefits you will find when traveling to […]