Home Blog Best Short Stories Book - Vyathanmagachya Katha - व्यथांमागच्या कथा

Best Short Stories Book – Vyathanmagachya Katha – व्यथांमागच्या कथा

- Advertisement -

Best Short Stories Book : ‘व्यथांमागच्या कथा’ हा कथासंग्रह म्हणजे प्रत्येक यशस्वी कथेमागे एक संघर्षपूर्ण ‘व्यथा’ दडलेली असते. जे त्या संघर्षात टिकतात किंवा स्वतःला टिकवून ठेवतात त्यांच्याच कथा निर्माण होतात. नाहीतर, ‘जन्माला आला हेला आणि पाणी भरता भरता मेला’ ही प्रवृत्ती संघर्षापासून दूर पळणाऱ्यांमध्ये ठासून भरलेली असते. त्यामुळे त्यांच्या कधीही कथा निर्माण होत नाहीत.

माणसानं कशावरही मनापासून प्रेम करावं, मग ते माणसंच माणसावर झालेलं, आपल्या कर्मावर ठेवलेलं, आपल्या धर्मावर जुडलेलं अथवा स्वतःवर केलेलं तरी असावं. कारण ‘प्रेम ही भावना म्हणजे जिवंतपणाचे लक्षण आहे’ अन्यथा मृत्यूपर्यंत  सगळे अनाठायी जगतात. एका विशिष्ट उद्देशाने जगलाच त्यालाच ‘माणूस’ म्हणतात असं ‘श्रीकृष्णाची गीता’ सांगते.

Stories for Book Review – व्यथांमागच्या कथा

या कथासंग्रहात आलेल्या कथा अशा अफाट प्रेमाच्या नसतीलही पण आत्मिक संघर्षाच्या कहाण्या ‘व्यथांमागच्या कथा’ (The story behind the tragedy) या कथासंग्रहात आलेल्या आहेत. यात केंद्रबिंदू असणारी बहुतेक पात्र कुठे-ना-कुठे भेटलेली असून, त्यांच्यासोबत जीवनाचे काही क्षण घालवले आहेत. त्यांच्या जीवनाचा संघर्ष जगासाठी मोठा नसला तरी तो त्यांच्या अस्तित्वासाठी सर्वात मोठा असा आत्मसंघर्ष ठरला. त्यांच्या त्या संघर्षाला कुठेही धक्का न पोहोचवता फक्त वास्तविकतेला थोडीशी काल्पनिकतेची जोड देऊन तयार झालेल्या कथा या संग्रहात आहेत.

खरं पहाता संघर्ष केलेल्यांना समाधान आणि अनुभव नक्कीच मिळातो पण ज्यांनी आपला बचाव करून घेतला त्यांचं काय? त्यांचं काहीचं नसतं, कारण शूरांच्या शरीरावर शस्त्रांच्या खुणाच हीच त्यांच्या ‘शौर्याची प्रतीकं’ असतात आणि कथाही त्यांच्याच निर्माण होतात, ज्यांच्या मनावर अथवा शरीरावर अशी शौर्याची प्रतीकं गोंदली जातात. तेथे हार या जीत हे दोन्हीही पर्याय कवडीमोल ठरतात. फक्त लढण्यापुर्वी हार न जाता लढण्याचं केललं धाडस फक्त हेच अनमोल ठरतं. हेच धाडस, त्यांना पुढे जीवनभर समाधानाने मान वर करून जगण्याचं बळ देतं राहतं.

मनोगताचे दोन शब्द 

दुस-याच्या संघर्षातून आपल्याला काही शिकता येईल, हा विचार चुकीचा असू शकतो. तरी त्यांच्या संघर्षातून कोणत्याही परिस्थितीमध्ये हार न पत्करता लढण्याची प्रवृत्ती अंगीकारण्याची प्रेरणा मात्र आपणांस मिळू शकते.

अश्याच ह्या संघर्षमय जीवनाच्या प्रेरणादायक “व्यथांमागच्या कथा”.

ज्यांच्यामुळे माझं जीवन समृद्ध झालं, त्या सर्वांना हे पहिलं पुष्प समर्पित…! (संभू दा टेलर – एक अभिवादन)

“गुरुजन व वडीलधा-यांनी पुस्तकं वाचायला शिकवली आणि वाचलेल्या पुस्तकांमुळे माणसं वाचता आली”.

“व्यथांमागच्या कथा” हा कथासंग्रह मिळवण्यासाठी या लिंकला क्लिक करा.

stories for book review, short stories in marathi pdf, best marathi books to read, best motivational books to read in marathi, love story book in marathi
stories for book review, short stories in marathi pdf, best marathi books to read, best motivational books to read in marathi, love story book in marathi

In Conclusion : 

आयुष्याच्या पायवाटेवर अनेक वाटसरू भेटले. त्यांच्या या भेटण्यातून काहींच जीवन थोडक्यात समजलं तर काहींचं थोडं जास्त. ज्यांनी सोसलं होतं त्याच्याकडे सांगण्यास खूप काही होतं. पण ज्यांनी नुसतंच भोगलं होतं त्याच्याकडे चौकटी बाहेरचं सांगण्यासारखं काहीच नव्हतं. प्रत्येकाच्या आयुष्यात काही जीवघेणी वादळं आली. काहींनी त्यांच्याशी मुकाबला करून त्यांचा प्रतिकार केला तर काहींनी त्यांच्यापासून आपला बचाव करून घेतला. ज्यांनी बचाव तंत्र आपणवलं, ते वादळं शमल्यानंतर आहेत तसेच भासले. परंतु ज्यांनी त्या वादळांचा सर्वस्वपणाला लावून सामना केला, त्यांच्यावर मात्र अनेक जीवघेणे ओरखडे उठले. त्यांच्या जीवनाची अक्षरश: लक्तरं लोंबकळली. तरीही जगण्याचं खरं गमक त्यांनाचं समजलं असंच म्हणावं लागेल.

Digilocker द्वारे SSC आणि HSCचे eMarksheet कसे डाउनलोड करावे?

- Advertisement -
Marathi Guidehttps://marathitrailer.com/
Has come a long way from its beginnings in Maharashtra. When Group of Marathi Trailer first started out, their passion for helping Farmers and help them to start their own business.
- Advertisment -

Most Popular

Best Diwali Panati Collection in Nitesh Enterprises

BEST DIWALI PANATI COLLECTION IN NITESH ENTERPRISES | दिवाळी पणती : दिवाळी म्हटलं कि आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो दिव्यांचा झगमगाट, विद्युत रोषणाई, पारंपरिक तेलांच्या...

Our Herd is your Desi Cow : आमचा गोठा तुमची गाय

Desi Cow आमचा गोठा तुमची गाय : संकल्पना अगदी साधी आणि सरळ आहे, ब-याच लोकांच्या मनात एक सुप्त इच्छा असते की, आपलंही एक शेत...

How to Achieve Maximum Success with

Factors to Consider When Choosing a Structured Settlement Lawyer For one to make up their mind on choosing a structured settlement lawyer, it definitely...

How I Became An Expert on

Photographers In Boston Massachusetts When people are trying to find Boston Massachusetts photographers they ought to take a little time to take a look...

Recent Comments

Related eBooks