Home Blog Ashtanga Namaskara & Tadasana Yoga कसे करावेत?

Ashtanga Namaskara & Tadasana Yoga कसे करावेत?

- Advertisement -

बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते। तस्माद्योगाय युज्यस्व योग: कर्मसु कौशलम्।।

‘योग: कर्मसू कौशलम’ हे संस्कृत वाक्य भगवद्गीता अध्याय २ मधील श्लोक क्रमांक ५० मधील आहे. या श्लोकाचा साधा सरळ अर्थ असा आहे की, “एक बुद्धिमान व्यक्ती या जगातील पुण्य आणि पाप या दोन्हीचा त्याग करतो. म्हणजेच तो त्यांच्यापासून स्वत:ची मुक्तता करून घेतो. त्यानंतरच ती व्यक्ती समरूप योगामध्ये गुंतते; हा समता योग म्हणजे कृतीत कौशल्य आहे. म्हणजेच योग हा कर्माच्या बंधनातून मुक्त होण्याचा राजमार्ग आहे.” योगा हा शब्द आजकाल आपल्याला सगळीकडेच ऐकायला मिळतो. ‘योगा से होगा’ असं बाबा रामदेव देखील सतत लोकांना समजावत/सांगत असतात. खरं तर योगा अथवा योग हा शब्द मुळ युज धातूपासून आला आहे. युज म्हणजे जोडणे. आपण योग करतो म्हणजे आपण काहीतरी जोड़त असतो. मग ते आपल्या शरीराला मनाशी जोडणे असो, किंवा स्वतःच्या चेतनेला आणि आत्म्याशी / निसर्गाशी संवेदनशीलतेशी जोडणे असो. Ashtanga Namaskara & Tadasana Yoga या दोन योगांविषयीची थोडक्यात माहिती पाहूयात.

आता योगा म्हणजे नुसताच व्यायामप्रकार नाही बरं का!

खरंतर, योगा ही प्राचिन भारताने आपल्याला दिलेली एक देणगीच आहे. योग हे एक विज्ञान आहे. योगामुळे जितके शारिरीक फायदे होतात तितकेच नाही तर त्यापेक्षा जास्त फायदे हे आपल्या मनासाठी होतात.

सुमारे ५००० वर्षापूर्वी योग हा त्याकाळी लोकांच्या दिनचर्येचाच भाग होता. हा योग गुरु-शिष्य परंपरेनुसार गुरु कडून शिष्याकडे चालत आला आहे. परंतु आपल्यापर्यंत योग हा खऱ्या अर्थाने पोहचला तो पातंजली ऋषींमुळे. पातंजलीनी योग अतिशय सुंदर रितीने सुत्रबदध पद्धतीने ‘पतंजलि योगसूत्र’ या ग्रंथामध्ये लिहून ठेवला. आपल्या भगवत् गीते मध्ये सुद्धा योगाचे महत्त्व सांगून ठेवले आहे.

“समत्वं योग उच्यते||”

अर्थात समतोल म्हणजेच योग: आपल्या शरीराचा मनाशी, आपल्या संवेदनांचा आपल्या विचारांशी समतोल साधने म्हणजेच योग. आता असा हा योग साध्य करण्यासाठी आपल्याला आपल्या ऋषीमुनींनी योगाची वेगवेगळी अंग (limbs ) देखील सुचवली आहेत. त्यालाच योगाची आठ अंगे म्हणतात.

 1. यम
 2. नियम
 3. आसन
 4. प्राणायाम
 5. प्रत्याहार
 6. धारणा
 7. ध्यान
 8. समाधी

योगाच्या या आठ अंगांमध्ये प्राविण्य मिळवणे कठीण आहे. पण कोणत्याही व्यक्तीसाठी हे अशक्य नाही. ही अंगे आपल्याला अधिक सचेतन आणि जागरूक होण्यात मदत करतात. यामुळे आपल्याला आयुष्याचे सर्वाधिक चीज करण्याची क्षमता प्राप्त होते.

अष्टांगे 

 • यम हे त्यातीलच पहिले आणि एक महत्त्वाचे अंग. यात समाजात वावरतांना पाळावयाची बंधने सांगितली आहेत.
 • नियम – योगाच्या अभ्यासात प्रगती करण्याच्या दुष्टीने काही नियम स्वतःवर घालून घेणे आवश्यक असतात, त्याबद्दल  नियम मध्ये सांगितले आहे.
 • आसन हे तिसरे महत्त्वाच अंग आहे ज्यामध्ये साधकाने स्वतःच्या शरीराची निरोगी अवस्था निर्माण करून त्यात स्थिरता साधण्यासाठी आसनांची योजना केली आहे.
 • प्राणायाम – चंचल असणाऱ्या आपल्या चित्ताची एकाग्रहता होण्यासाठी आणि चित्ताच्या मुळ स्वभावात आणण्यासाठी, श्वासावर नियंत्रण याबद्दल चे विवेचन प्राणायाम मध्ये सांगितले आहे.
 • प्रत्याहार– समाधिचा अनुभव घ्यायचा असेल तर आधी भौतिक जीवनापासून हळूहळू परावृत्त व्हायला हवे, त्याबाबतचे मार्गदर्शन योगाच्या प्रत्याहार या पाचव्या अंगात केले आहे.
 • धारणा, ध्यान, समाधी हो योगाची अखेरची तीन अंगे आहेत. ज्याला अंतरंग योगा असेही म्हणतात. या तीन अंगांचा अभ्यास करीत असतांना मानवी देहांत असलेली कुंडलिनो शक्तीची जागृती होते व काही आश्चर्यकारक शक्ती प्राप्त होतात.

ही पातंजली ऋषींनी सांगितलेली आठ अंगे म्हणजेच ‘अष्टांग योग’.  पण या व्यतिरिक्त देखील काही योगाची अंगे आहेत ती म्हणजे,

 • शुद्धीक्रया
 • युक्ताहार
 • बंध
 • मुद्रा
 • युक्तकर्म

या सगळ्या अंगाचा अभ्यास करून आपण योग साध्य करू शकतो.

आता आज आपण योगाच्या या निरनिराळ्या अंगांपैकी आसन या अंगाविषयी जाणून घेऊ. आसन हे नेहमीच संथगतीने केले पाहीजे. आसन करताना ते रिकाम्यापोटी किंवा हलक्या पोटाने करावे. आसन सराव सुरू करण्यापूर्वी हलका व्यायाम (warm ups) करणे गरजेचे असते. त्यामुळे तुमचे शरीर थोडे गरम होते आणि दुखापत होण्याची शक्यता कमी होते.

आसन करताना श्वासाची जोड देणे हेही तितकेच महत्त्वाचे. आसन स्थिती ही स्थिर आणि सुखदायक असावी. अशा रितीने केलेले आसन हे फक्त शरिरासाठीच नाही तर मन शांत करण्यासाठी फायदेशीर ठरते. आजच्या लेखात मी तुम्हाला दोन अतिशय सोप्या आसनाविषयी सांगणार आहे त्यातील पहिले आसन म्हणजे,

Ashtanga Namaskara : अष्टांग नमस्कार

सूर्यनमस्कार तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहेत. बारा ठराविक आसनांची सुंदर साखळी म्हणजे सूर्यनमस्कार. या बारा आसनांपैकी सहावे आसन म्हणजे अष्टांग नमस्कार. अष्टांग म्हणजेच आठ अंग वापरून घातलेला नमस्कार म्हणजेच अष्टांग नमस्कार. आता ही आठ अंग कोणती? तर

 1. हनुवटी
 2. छाती
 3. दोन्ही हात
 4. दोन्ही पाय
 5. गुडघे

ही आठ अंगे जमिनाला टेकवून नमस्कार स्थितो घेणे.

आष्टांग नमस्कार हे खूपच पारंपारिक योगासन आहे. आपल्या संस्कृतीत थोरा मोठ्यांच्या पाया पडताना किंवा देवाच्या पाया पडताना, आदर व्यक्त करताना आपण अष्टांग/साष्टांग नमस्कार घालतो.

Ashtanga Namaskara आसनाचे फायदे

 • हे आसन करताना आपले शरीर आठ अंगावर स्थिर राहते. त्यामुळे मनाचा आणि शरीराचा समतोल राखला जातो.
 • पाय, हात, पाठीचे स्नायू बळकट होतात.
 • फुफ्फुसांची कार्यक्षमता सुधारते.
 • ओटीपोटाचे कार्य सुधारते.
 • पाठीचा कणा बळकट होतो.

tadasana yoga, ashtanga namaskara, ashtanga namaskara benefits, benefits of ashtanga namaskara, ashtanga namaskara steps, tadasana yoga pose, yoga tadasana, tadasana yoga steps and benefits
tadasana yoga, ashtanga namaskara, ashtanga namaskara benefits, benefits of ashtanga namaskara, ashtanga namaskara steps, tadasana yoga pose, yoga tadasana, tadasana yoga steps and benefits

हे आसन कोणी करू नये

 • ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी हे आसन करू नये.
 • पाळीच्या दिवसांत, तसेच गर्भधारनेमध्ये हे आसन करू नये.
 • उच्च रक्तदाब असेल तरी हे आसन करण टाळावे.

 

आसनस्थिती कशी घ्यावी

पूर्वस्थिती

 • पोटावर झोपून दोन्ही हात शरिराजवळ घ्यावेत, कपाळ जमिनीवर टेकवा
 • दोन्ही पाय आणि गुड़घे जोडलेले, तळहात जमिनीवर टेकलेले.
 • आता श्वासस घेत, पूर्वस्थितीमधून तळहात उचलून छातीजवळ ठेवावे.
 • हाताचे कोपरे शरिराजवळ असावेत. “हनुवटी जमिनीला टेकलेलो, पार्श्वभाग आणि उदर वर उचलावे.
 • ओटीपोटाच्या ठिकाणी, मणिपूर चक्रावर लक्ष केंद्रीत करावे.
 • आसनस्थिती पूर्ण झाल्यावर श्वास संथ गतीने चालू ठेवावा.
 • हे आसन आपण 30 सेकंदापासून एक मिनीटापर्यत करू शकता.

 

आसनस्थिती सोडणे

आसनस्थिती सोडताना श्वास सोडत पून्हा पूर्वस्थितीत यावे.

Best Short Stories Book – Vyathanmagachya Katha – व्यथांमागच्या कथा

 

आता दुसरे आसन पाहूयात

 1. Tadasana Yoga : ताडासन

ताडासन हे एक उमे राहून करण्याचे आसन आहे. इथे संस्कृतमध्ये ताड म्हणजे झाड. ताडासन हे करायला जरो सोपे असले तरी या आसनामध्ये समतोल साधणे आवश्यक आहे. यामध्ये संपूर्ण शरिराला वरच्या बाजूने खेचले जाते. त्यामुळे पाठीचा कणा बळकट होता. हे आसन सकाळी उठल्यावर केले तर रात्रभर आखडलेले शरीर मोकळे होते, आणि दिवसभर प्रसन्नता जाणवते.

Tadasana Yoga या आसनाचे फायदे 

 • शरीरातील आळस दुरू होतो.
 • पाठीचा कणा सरळ स्थितीत राहण्यासाठी या आसनाचा सराव रोज करावा.।
 • शरीराची ठेवण व्यवस्थित राहते. पूचनाशी संबंधित तक्रारी दूर होतात
 • शरीराचा आणि मनाचा समताल वाढतो.
 • हान मुलांमध्ये उंची वाढवण्यासाठी हे आसन सांगितले जाते.
 • शरिरातील रक्त संचार व्यवस्थित होतो.

tadasana yoga, ashtanga namaskara, ashtanga namaskara benefits, benefits of ashtanga namaskara, ashtanga namaskara steps, tadasana yoga pose, yoga tadasana, tadasana yoga steps and benefits
tadasana yoga, ashtanga namaskara, ashtanga namaskara benefits, benefits of ashtanga namaskara, ashtanga namaskara steps, tadasana yoga pose, yoga tadasana, tadasana yoga steps and benefits

हे आसन कुणी करू नये,

 • उच्च रक्तदाब असेल तर हे आसन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तीव्र गुडधेदुखी, पायदुखी, असेल तर या आसनाचा सराव यूनावा
 • गर्भधारणे मध्ये सुरवातीच्या काळामध्ये टाचा उंचावून सराव करणे योग्य असले तरी नंतर मात्र टाचा उंचावून सराव करण टाळावा.

आसनस्थिती कशी घ्यावी पूर्वस्थिती

पूर्वस्थिती

समस्थिति म्हणजे दोन्ही पाय, गुडघे जुळलेले, हात शरीराजवळ, तळहात शरीराला चिकटलेले, पाठीचा कणा ताठ. पूर्वस्थतीतून आता दोन्ही हात सरल समोर घेऊन, दोन्ही हाताची बोटे एकमेकात गुफावावीत. दोन्ही हात ताठ ठेवत, श्वास घेत, सरळ रेषेत, कानाला चिकटून वर घ्यावेत. बोटे गुंफलेल्या अवस्थेत ठेवून पूर्ण शरीर वरच्या बाजूने खेचावे. याचवेळी टाचादेखील वर उचलाव्यात. आसनस्थिती पूर्ण झाल्यावर संथ गतीने श्वसन चालू ठेवावे.

आसनस्थिती सोडणे

आसनस्थिती सोडतेवेळी श्वास सोडत, टाचा जमिनीवर ठेवाव्यात व हात शरीराजवळ घेत पूर्वस्थितीत यावे.

In Conclusion

आज आपण दोन सोपी आसन बघितली जी सगळ्या वयोगटातील लोकांसाठी उपयोगी आहेत. अशीच योगाची प्रगती ही सोप्याकडून कठीणाकडे करावी, आणि आपल्या ऋषीमुनींनी सांगितलेल्या योगाची पाथक्रमणा करून आपली व आपल्या आप्तजनांची प्रगती करावी.

https://www.mastersfinancejobs.com/

Best Short Stories Book – Vyathanmagachya Katha – व्यथांमागच्या कथा

लेखन : योग गुरु -पूनम मराठे

tadasana yoga, ashtanga namaskara
tadasana yoga, ashtanga namaskara

 

- Advertisement -
Marathi Guidehttps://marathitrailer.com/
Has come a long way from its beginnings in Maharashtra. When Group of Marathi Trailer first started out, their passion for helping Farmers and help them to start their own business.
- Advertisment -

Most Popular

Recent Comments