Home Education Aadhaar Online च्या माध्यमातून आधार कार्डमध्ये केले जाणारे बदल! 

Aadhaar Online च्या माध्यमातून आधार कार्डमध्ये केले जाणारे बदल! 

- Advertisement -

Aadhaar Online : ही एक सेल्फ सर्व्हिस असून यामध्ये आपण आधारच्या संबधित माहिती कॉम्पुटर, मोबाईलच्या सहाय्याने सहज बदल करू शकतो. त्याने आपला वेळ आणि पैसे दोन्हीही वाचतात. आज आधारविना सरकारी सर्वच कामांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. तेंव्हा आपले आधार कार्ड नेहमी अपडेट (परिपूर्ण) असावे. जर आपल्या माहितीमध्ये  कोणताही कायमस्वरूपी बदल झाला असल्यास त्याची तत्काळ नोंद आधारमध्ये करणे अनिवार्य असते. त्यासाठी नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. कारण प्रत्येक वेळी आधार सेंटरवर जाणे शक्य नसते. कारण तिथे असणारी लाईन, रहात्या ठिकाणापासून लांब असणारे आधार सेंटर, शिवाय द्यावे लागणारे चार्जेस. या सगळ्यातून वाचायचं असल्यास “Aadhaar Online” हा बेस्ट पर्याय आहे. तरी यामध्ये फक्त शाब्दिक माहिती (Demografic Information) बदलता येते. जसे की, नाव, लिंग आणि पत्ता, तर मोबाईल नंबर, ईमेल व आधारमधील बायोमेट्रिक्स (फिंगर प्रिंट्स, आयरिस आणि छायाचित्र) नागरिकांना आधार नावनोंदणी केंद्राला भेट देणे अनिवार्य आहे.

Aadhaar Online
Aadhaar Online च्या माध्यमातून आधार कार्डमध्ये केले जाणारे बदल!

 

Content of Table

1.  Aadhaar online services
2.  Download aadhaar online
3.  how to update mobile number in aadhaar online?
4.  aadhaar status update
5.  How to Verify Aadhaar Mobile Number?
6.  Aadhar card update
7.  e aadhar card download app :
8 pvc aadhar card
9.  aadhar card search by name and father name

 

 1. Aadhaar online services : आधारच्या कोणकोणत्या सर्विसेस online आहेत?

Aadhaar Online Services

E-Aadhaar ई-आधार
Virtual ID (VID) व्हर्च्युअल आयडी (व्हीआयडी)
Online Address Update Process ऑनलाइन पत्ता अद्ययावत करण्याची प्रक्रिया
Aadhaar Authentication History आधार प्रमाणीकरण केलेला इतिहास
Secure QR Code Reader (beta) सुरक्षित QR कोड रीडर (बीटा)
Aadhaar Paperless Offline e-kyc आधार पेपरलेस ऑफलाइन ई-केवायसी
Biometric Lock/Unlock बायोमेट्रिक लॉक/अनलॉक
Aadhaar Lock/Unlock आधार लॉक/अनलॉक
Aadhaar SMS Service आधार एसएमएस सेवा
Order Aadhaar PVC Card आधार पीव्हीसी कार्ड मागवण्यासाठी

 

 1. Download aadhaar online

ऑनलाइन डाउनलोड केलेल्या ई-आधार आणि घराच्या पत्त्यावर पोस्टाद्वारे आलेलं आधार हे दोन्ही सारखेच असून त्यांची वैधता समान आहे. एकदा का नागरिकाचे आधार तयार झाले की, गरेजेनुसार ते कधीही ई-आधार डाउनलोड करून वापरत आणू शकतात.

 रहिवासी दोन मार्गांनी ई-आधार डाउनलोड करू शकतात.

 1. नावनोंदणी क्रमांकाचा वापर करून: रहिवासी 28 अंकी नोंदणी क्रमांक वापरून ई-आधार डाउनलोड करू शकतात तेही पूर्ण नाव, संपूर्ण जन्मतारीख आणि रहिवाशी पिन कोडसह. या डाउनलोड प्रक्रियेत “ओटीपी” हा नागरिकाच्या नोंदणीकृत मोबाईल येतो, SMS स्वरूपात आलेला ओटीपी वापरून आधार डाऊनलोड करता येते. त्याचप्रमाणे ई-आधार डाउनलोड करण्यासाठी “टीओटीपी” चा वापर देखील करता येतो. हा टीओटीपी MAadhaar हे मोबाईल अॅप्लिकेशन वापरून उत्पन्न करता येतो.
 2. आधार क्रमांक वापरून: नागरिक आपले पूर्ण नाव आणि पिन कोडसह 12 अंकी आधार क्रमांक वापरून ई-आधार डाउनलोड करू शकतात. या डाउनलोड प्रक्रियेत ओटीपी नोंदणीकृत मोबाईलवर येतो. शिवाय रहिवासी ओटीपीऐवजी ई-आधार डाउनलोड करण्यासाठी टीओटीपीचा देखील वापर करू शकतात. हा टीओटीपी MAadhaar हे मोबाईल अॅप्लिकेशन वापरून उत्पन्न करता येतो.

महत्त्वाचे : आधार डाऊनलोड करण्यासाठी आधारमध्ये मोबाईल रजिस्टर असणे अनिवार्य आहे.   

आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी, आपले आधार कार्ड किंवा नोंदणी क्रमांक सोबत ठेवा. जर आपल्याकडे आपले आधार नसेल तर नोंदणीच्या वेळी मिळालेली पावती/स्लिपमध्ये ज्यामध्ये आधार नोंदणीची वेळ आणि तारीख असते तो नोंदणी क्रमांक तयार ठेवा….

 1. https://eaadhaar.uidai.gov.in/#/ ला क्लिक करा.
 2. TOTP/OTP साठी विनंती. …
 3. OTP एंटर करा. …
 4. ई-आधार पीडीएफ डाउनलोड करा.

 

 1. how to update mobile number in aadhaar online? : आधार मध्ये मोबाईल नंबर ऑनलाइन कसा अपडेट करावा?

जर आपल्याला पहिल्यांदाच मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करायचा असेल तर ऑफलाईन पद्धतीनेच म्हणजे आधार सेंटरवर जाऊनच नोंदणी करावी लागते. मात्र मोबाईल नंबर आधार डेटामध्ये अपडेट करायचा असेल, तर नागरिक तो ऑनलाईनही पद्धतीने देखील करु शकतो. https://ssup.uidai.gov.in/ssup/

 

 1. aadhaar status update :

आधार हा 12 अंकी वैयक्तिक ओळख क्रमांक असून, त्याला भारत सरकारच्या वतीने युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने जारी केला आहे. पहिल्यांदा आधारची नोंदणी झाल्यानंतर काही ठराविक दिवसांत नागरिकाला आधार पोस्टाने न मिळाल्यास, आपल्या आधाराची सद्याची स्थिती माहिती करून घेण्यासाठी, नागरीकाद्वारे केल्या जाणा-या पडताळणीला Aadhaar Status चेक करणे म्हणतात. त्याचप्रमाणे जर आपण मिळालेल्या आधार मध्ये काहीही बदल केल्यानंतर बदलाचे आधार कार्ड न मिळाल्यास आपण जी पडताळणी करतो तिला aadhaar status update म्हणतात. आधारची पडताळणी ऑनलाईन द्वारे तसेच आधार केंद्रावर जाऊन देखील केली जाऊ शकते.

नागरिकाच्या आधार सीडिंग म्हणजे आधार धारकाचा युनिक 12 अंकी आधार क्रमांक त्यांच्या वैयक्तिक माहितीसह किंवा लाभ कार्डांशी जोडणे जसे की: शिष्यवृत्ती, पेन्शन, रेशनकार्ड इत्यादी.

 

5 How to Verify Aadhaar Mobile Number?

 1. Log in to the UIDAI website.
 2. Select the ‘Verify Email/Mobile Number’ option that is under ‘Aadhaar Services’ drop down.
 3. Enter your 12-digit Aadhaar number, email-id, mobile number and the security code.
 4. Enter the OTP.
 5. Click on the ‘Verify OPT’ option.

 

6 Aadhar card update

 1. Visit the Aadhaar Enrolment/Update Centre.
 2. Fill the Aadhaar Update Form.
 3. Enter your current mobile number in the form.
 4. Your request will be registered by the executive at the Aadhaar Enrolment/Update centre.

 

 1. e aadhar card download app :

आधार कार्ड हा 12 अंकी युनिक ओळख क्रमांक आहे. आज त्याची ओळख ही पुराव्याच्या पुराव्यासाठी म्हणून केली जाते. विविध सरकारी अनुदाने आणि लाभ मिळवण्यासाठी आधार कार्ड महत्त्वाचे दस्तावेज मानले जाते. त्यामुळे ते जर नागरिकाकडे नसेल तर त्याच्या सर्वच कामाच्या ठिकाणी खोळंबा होऊ शकते. तसे पोस्टाद्वारे आधार घरपोच मिळत असले तरी काही नागरिकांना ते वेळेवर उपलब्ध होऊ शकत नाही, म्हणून आधार डाऊनलोड करण्याची सुविधा इंटरनेट द्वारे दिली आहे. शिवाय मोबाईलसाठी

१) mAadhaar हा Android मोबाईलवर चालणारा अॅप आहे.

२) mAadhaar app link for iOS हे आय-फोन साठी स्पेशल अॅप्लिकेशन बनवलेले आहे.

aadhaar status update, aadhaar online update, download aadhaar online, aadhaar status update, aadhar card update, e aadhar card download app, pvc aadhar card, aadhar card search by name and father name

 1. pvc aadhar card

पीव्हीसी हे सिंथेटिक प्लास्टिकच्या साहित्याने बनलेले पॉली विनाइल कार्ड  आहे. पीव्हीसी आधार कार्ड तयार करण्यासाठी किंवा प्रिंट करण्यासाठी याच साहित्याचा वापर केला जातो. हे एटीएम कार्डसारखे दिसत असून नागरिकाच्या पाकीटात सहज बसते, त्यामुळे प्रवासात बाळगणे सहज सोपे बनून जाते. शिवाय नागरिकाचा ओळखीच्या पुरावा कुठेही स्वीकारले जाते.

https://residentpvc.uidai.gov.in/order-pvcreprint.php या लिंकवरून pvc aadhar card सहज मागवता येते.

How to Aadhaar Card Reprint?

 1. aadhar card search by name and father name

जर आपले आधार आले नसेल आणि पावती देखील मिळत नसेल तर अर्जदार त्याच्या वडिलांच्या आणि स्वत:च्या नावाने आधार कार्ड क्रमांक शोधू शकतो. त्यासाठी त्याला खालील स्टेप्सचे पालन करावे लागेल:

१) www.uidai.gov.in ला क्लिक करा.

२) आधार क्रमांक (UID) स्टेट्स चेक हा पर्याय निवडा

३) त्यानंतर आपले नाव आधार कार्ड नोंदणीच्या वेळी दिलेल्या प्रमाणेच नाव लिहिणे गरजेचे आहे. (नावात चूक असेल तर चुकीचेच नाव लिहीने अनिवार्य आहे.

४) आपले नाव प्रविष्ट केल्यानंतर, आपला ईमेल आयडी आणि नोंदणीकृत मोबाइल नंबर प्रविष्ट करा. हे देखील आधार कार्ड नोंदणीच्या वेळी टाकल्याप्रमाणेचलिहिणे बंधनकारक आहे.

५) बॉक्समध्ये आलेला सुरक्षा कॅप्चा (CAPTCHA) कोड टाका.

६) शेवटी, सर्व आवश्यक तपशील भरल्यानंतर, “OTP” मिळवा या पर्यायावर क्लिक करा.

७) वन टाइम पासवर्ड (OTP) नोंदणीकृत ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांकावर पाठवला जाईल आणि तो एकूण 5 मिनिटांसाठी वैध असेल.

८) दिलेल्या बॉक्समध्ये ओटीपी एंटर करा आणि व्हेरिफाय ओटीपी या पर्यायावर क्लिक करा.

९) जर OTP सत्यापित केला असेल, तर स्क्रीनवर एक पॉप-अप दिसेल की आधार यूआयडी (आधार क्रमांक जर बनला असेल तर) तुमच्या नोंदणीकृत ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांकावर पाठवला गेला आहे.

१०) प्राप्त झालेल्या मेल किंवा एसएमएसच्या आधारे नागरिक त्याचे आधार कार्ड डाउनलोड करून तपासू शकता. त्यासाठी http://eaadhaar.uidai.gov.in या लिंकचा वापरा करता येतो.

Conclusion In :

aadhaar online या सेल्फ सर्व्हिसच्या माध्यमातून नागरिक आपला आधार मधील काहीप्रमाणात डेमोग्राफिक डेटा (नाव, पत्ता, जेन्डर इ. माहिती) बदलू शकतो. त्याने नागरिकाचा वेळ आणि पैसे हे दोन्हीही वाचतील.

 

- Advertisement -
Marathi Guidehttps://marathitrailer.com/
Has come a long way from its beginnings in Maharashtra. When Group of Marathi Trailer first started out, their passion for helping Farmers and help them to start their own business.
- Advertisment -

Most Popular

Recent Comments