Home Government Documents How to Aadhaar Card Reprint?

How to Aadhaar Card Reprint?

- Advertisement -

आपलं आधार हरवलंय किंवा फाटलंय. आता काय करायचं? काळजी करू नका आता UIDAI या सर्व बाबींचा विचार करून, Aadhaar Card Reprint ची सुविधा चालू केली आहे. तीही फक्त ५० रुपये ऐवढी माफक फी घेऊन. आता डिजिटलचा जमाना आहे, प्रत्येक गोष्ट आता आपल्याला बटणाच्या एक क्लिकवर हवी असती. तीच गरज लक्षात घेऊन आधारने “Retrieve Lost or Forgotten EID/UID” अर्थात हरवलेले अथवा गहाळ झालेले आधार क्रमांक अथवा नोंदणी क्रमांक शोधून आधार रिप्रिंटची सुविधा चालू केली आहे.

Aadhar card reprint status, Reprint e Aadhar card, Aadhar card link with mobile number, Aadhaar Reprint quora, Aadhar card search, Aadhar card update, How to apply for Aadhar card online, Download masked Aadhaar card,
आपलं आधार कार्ड हरवलंय, फाटलंय, खराब झालंय आणि आपल्याला ते पुन्हा हवंय..! 

आता काय करायचं?  काळजी करू नका आता UIDAI या सर्व बाबींचा विचार करून, Aadhaar Card Reprint ची सुविधा चालू केली आहे. तीही फक्त ५० रुपये ऐवढी माफक फी घेऊन. तसेच हरवलेल्या किंवा फाटलेल्या आधार कार्डचा क्रमांक देखील लक्षात नसेल तरी तो आपण  “Retrieve Lost or Forgotten EID/UID” या सुविधेत पुन्हा मिळवू शकतो.

 1. हरवलेलं आधार कसं शोधावं. (“Retrieve Lost or Forgotten EID/UID”)
 2. आधार कार्डमध्ये मोबाईल रजिस्टर असताना Aadhaar Card रिप्रिंट कशी करावी.
 3. आधार कार्डमध्ये मोबाईल रजिस्टर नसताना Aadhaar Card रिप्रिंट कशी करावी.

हरवलेलं आधार कसं शोधावं. (“Retrieve Lost or Forgotten EID/UID”)

आज बहुतांशी सरकारी योजनांमध्ये आधार कार्ड वापरणं अनिवार्य झालं आहे. त्यामुळे आधार नसेल तर आपली सगळीच कामं अडकू शकतात. शिवाय आधार कार्ड सेंटरची संख्याही कमी झालेली आहे. जेणेकरून जेथून आपल्याला काही सहकार्य मिळणं सोप्पं होतं. आता ते शक्य नसल्याने आपण गरजेपोटी गल्लीबोळातील सायबर- कॅफे, झेरोक्स सेंटर किंवा एखाद्या कॉम्पुटर सेंटरमध्ये जाऊन त्यांच्याकडून आपलं आधार क्रमांक शोधण्याचा  प्रयत्न करतो. त्यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळाला तर ठीक नाहीतर ते आपल्याला आधाराचा टोळफ्री नंबर देऊन त्यांच्याशी संपर्क साधायला सांगतात.

या सगळ्यांच्या मध्ये आधार वापरकर्त्याला भयंकर मनस्ताप होत असतो. यातून त्याचा पैसाही जातो आणि वेळही शिवाय हाताला काही लागेल याची शक्यताही नसते. याच गोष्टीचा अंदाज आल्याने आता आधारनेच “Retrieve Lost or Forgotten EID/UID” व “Aadhaar Card Reprint” या लोकोपयोगी सेवा सुरु केल्या आहेत. त्यामुळे आता आपल्याला कुठेही जावं लागणारा नाही. ही सेवा सुरु केल्याने सर्वानांच हायसं झालं आहे.

आपल्या आधारमध्ये आपला मोबाईल आणि ईमेल दोन्ही रजिस्टर आहेत असे समजू. https://uidai.gov.in/ या मुख्य साईट जाऊन, My Aadhaar > Retrieve Lost or Forgotten EID/UID क्लिक करा… खालील विंडो ओपन होतो.

Aadhar card reprint status, Reprint e Aadhar card, Aadhar card link with mobile number, Aadhaar Reprint quora, Aadhar card search, Aadhar card update, How to apply for Aadhar card online, Download masked Aadhaar card,
https://marathitrailer.com/aadhaar-card-reprint/(opens in a new tab)
खालील स्टेप्स वापरा…
 1. यामध्ये आपल्या काय हवंय EID की UID. (EID म्हणजे नोंदणी स्लीप आणि UID म्हणजे आधार क्रमांक) त्यातून एक सिलेक्ट करा. शक्यतो आपण फक्त UID चीच मागणी करावी.
 2. आता आपले इंग्रजीमध्ये पूर्ण नाव टाका. (लक्षात घ्या आपल्या आधार वर नाव चुकीचे जर असेल तर सर्च करताना देखील चुकीचे स्पेलिंग टाकावे लागते)        
 3. रजिस्टर मोबाईल नंबर अथवा ईमेल आयडी (यामध्ये कोणतंही एकच टाकावे, जे Option द्याल तेथेच OTP जनरेट होतो.)
 4. बाजूला निळ्या अक्षरांमध्ये आलेला कॅप्चा (CATPCHA) जसा असेल तसाच लिहा.
 5. Send OTP या बटन ला क्लिक केल्यावर आपल्या रजिस्टर मोबाईल किंवा ईमेलवर एक OTP येतो (हा ६ किंवा ८ अक्षरी असू शकतो)
 6. Send OTP च्या खाली अजून एक पर्याय दिसू लागतो. Enter OTP (येथे OTP लिहा) आणि शेवटी Login या बटनला क्लिक करा.
 7. Retrieve Lost or Forgotten EID/UID – Your UID sent to your Register mobile no.  (अर्थात तुमचा हरवलेला आधार क्रमांक तुमच्या रजिस्टर मोबाईलवर पाठवला आहे.
 8. त्याच वेळी आपल्या मोबाईल/ईमेल आयडी वर एक SMS येतो. <Dear Resident, Your aadhaar number is :750929545121>

Aadhaar Card Download कसे करावे?

आता पाहूयात Aadhaar card reprint कसे करावे?

आपल्या आधारमध्ये आपला मोबाईल रजिस्टर असो वा नसो आपण आधार रिप्रिंट करण्याची ऑर्डर देऊ शकतो. त्यासाठी https://uidai.gov.in/ या मुख्य साईट जाऊन, My Aadhaar > Order आधार Reprint क्लिक करा… खालील विंडो ओघाडतो.

आधार रिप्रिंट करा : कोविड -१ 9 सर्व देशभर या साथीचा रोगगामुळे, पोस्ट विभागाच्या स्पीड पोस्टद्वारे आधार पत्र (आधार कार्ड) यायला उशीर होऊ शकतो.

 1. टीपः ऑर्डर आधार रीप्रिंट करणे ही सशुल्क (paid) सेवा आहे.
 2. जर तुम्हाला आपले आधार पुन्हा छापण्याची गरज भासत असेल तर तुम्ही रू. 50 नाममात्र फी भरून आधार रिप्रिंट करू शकता. (जीएसटी व स्पीड पोस्ट शुल्कासह)
 3. आधारचे रिप्रिंट ऑर्डर करण्यासाठी आपण आपला आधार क्रमांक (युआयडी)/ व्हर्च्युअल आयडेंटिफिकेशन नंबर (व्हीआयडी) किंवा  ईआयडी वापरू शकता.

या प्रकारची एक नोट विंडो ओपन होतो आणि त्यानंतर खालील विंडो उघडतो.

Aadhar card reprint status, Reprint e Aadhar card, Aadhar card link with mobile number, Aadhaar Reprint quora, Aadhar card search, Aadhar card update, How to apply for Aadhar card online, Download masked Aadhaar card,
https://marathitrailer.com/aadhaar-card-reprint/(opens in a new tab)

आधार रिप्रिंटची ऑर्डर देण्यासाठी पुढील स्टेप्स वापराव्या लागतील.

 1. यामध्ये सर्व प्रथम आपल्याला आधार कशाच्या आधाराने रिप्रिंट करायचे आहे तो पर्याय निवडावा. Aadhaar Number, Virtual ID, EID. (शक्यतो आपण Aadhaar Number)
 2. त्यानंतर आपला १२ अंकी आधार क्रमांक लिहावा.
 3. बाजूचा कॅप्चा (CAPTCHA) लिहा.
 4. My mobile no. is not Register (हा पर्याय फक्त तेंव्हाच निवडावा जेंव्हा आधार मध्ये आपला कुठलाही मोबाईल रजिस्टर केलेला नाही किंवा रजिस्टर केलेला मोबाईल नंबर हरवला आहे वा आठवत नाही)
 5. आपला मोबाईल क्रमांक लिहावा
 6. Send OTP या बटन ला क्लिक केल्यावर आपल्या नुकत्याच टाकलेल्या मोबाईल वर एक OTP येतो (हा ६ किंवा ८ अक्षरी असू शकतो)
 7. Send OTP च्या खाली अजून एक पर्याय दिसू लागतो. Enter OTP (येथे OTP लिहा)
 8. त्यानंतर Terms & Condition (नियम आणि अटी) हा एक पर्याय दिसतो. याला क्लिक केल्याशिवाय पुढे जाता येत नाही.
 9. महत्वपूर्ण हा नवीन एक विंडो उघडतो ज्यात आधारकर्त्याची समंती आवश्यक लागते. ( मी माझ्या संमतीने आधार रिप्रिंटची ऑर्डर देत आहे. त्यासाठी मी ५० रुपये भरणार आहे. हे नवीन रिप्रिंट झालेलं आधार माझ्या रजिस्टर पत्त्यावर येईल हे देखील मला माहित आहे)
 10. शेवटी SUBMIT हे बटन दिसू लागते.
 11. त्यानंतर आपल्या ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करावे लागते.
 12. पेमेंट झाल्यानंतर शेवटी, आपल्याला एक Acknowledgement Slip दिसू लागते तिला डाऊनलोड करून ठेवायची.
 13. यदाकदाचित जर रिप्रिंट केलेले आधार लवकर आले नाही तर त्याच्याच सहाय्याने आपल्याला आधारचे स्टेटस चेक करता येत.

अशा प्रकारे हरवलेले/गहाळ झालेले/फाटलेले आधार आपण शोधून त्याला रिप्रिंट करू शकतो.

Aadhar card reprint status, Reprint e Aadhar card, Aadhar card link with mobile number, Aadhaar Reprint quora, Aadhar card search, Aadhar card update, How to apply for Aadhar card online, Download masked Aadhaar card,
https://marathitrailer.com/aadhaar-card-reprint/(opens in a new tab)

- Advertisement -
Marathi Guidehttps://marathitrailer.com/
Has come a long way from its beginnings in Maharashtra. When Group of Marathi Trailer first started out, their passion for helping Farmers and help them to start their own business.
- Advertisment -

Most Popular

Recent Comments