Aadhaar Card download online (uidai.gov.in) आधार कार्ड डाउनलोड कसे करावे? भारत सरकारने दिलेल्या बहुतांशी शासकीय सुविधांचा आनंद घेण्यासाठी, भारतीय नागरिकांना आधार कार्ड असणे आवश्यक आहे. याच आधार कार्ड बाबत, पोस्टाने येणा-या आधारच्या प्रतीला हार्ड कॉपी आधार म्हणतात. तर इंटरनेट वरून डाऊनलोड केलेल्या आधार प्रतीला “ई-आधार कार्ड” म्हणतात. या आधार कार्डचा उपयोग नागरिक आपली ओळख सिद्ध करण्यासाठी देखील करू शकतो.
आधार हा 12-आकडी युनिक ओळख क्रमांक आहे. यूआयडीएआय आपल्या बायोमॅट्रिकच्या आधारे आपल्याला दिला आहे. यासाठी प्रथम आपल्याला रीतसर नोंदणी करावी लागते. त्यानंतर काही दिवसांनी हा १२ आकडी युनिक नंबर आपल्याला मिळतो त्यालाच Aadhaar Card म्हणतात. हेच आधार कार्ड जर आपल्याकडून गहाळ झालं, फाटलं अथवा जुन्या माहितीमध्ये काही बदल केला असल्यास, आपल्याला नवीन आधार कार्लाडाची गरज लागते. परंतु नवीन आधार कार्ड ताबडतोब मिळत नसल्याने (आधारची रिप्रिंट मिळते) UIDAI ने आपणांस E-Aadhaar Card Download करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.