Government scheme for Girls :मुलींसाठी १० महत्त्वपूर्ण शासकीय योजना…. आजच्या मुली ह्या राष्ट्राचे भविष्य आहेत. देशाच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये त्यांचा देखील समान वाटा आहे. त्यामुळे प्रत्येक मुलीला राष्ट्राच्या मूलभूत उभारणीत आपले योगदान देता देण्यास सक्षम असते. हे नीट सुनिश्चित करण्यासाठी भारत सरकारने राज्य सरकारच्या मुलींचे शिक्षण वाढविण्यासाठी आणि त्यांना देशाच्या प्रगतीमध्ये भाग घेण्यास सक्षम करण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. कारण मुलगी तिच्या पालकावर ओझं होऊ नये, शिवाय स्त्री भ्रूणहत्या आणि बालहत्या कमी व्हावी याच उद्धेशातून या शासकीय योजना तयार करण्यात आले आहेत. तसेच मुलगी सज्ञान झाल्यानंतर ती अधिक स्वतंत्र होतील. महाराष्ट्रातील मुलींच्या शिक्षण व सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असणा-या काही योजना ज्यांच्या माहिती प्रत्येक मुलीच्या वडिलांना/तिचा सांभाळ करणा-यांना असायलाच हवी.
list of government schemes for girl child in Maharashtra :
-
योजना : माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना
- पात्रता : एक मुलगी अथवा दोन मुलींवर ज्या माता-पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली असल्यास,
- लाभ : रुपये ५० हजार रुपयाची मुदत ठेव, दोन मुली असल्यास प्रत्येकी पंचवीस हजार रुपये प्रमाणे
- संपर्क विभाग : अंगणवाडी, ग्रामपंचायत, महिला व बालविकास विभाग
-
योजना अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना
- पात्रता : इयत्ता पाचवी ते बारावीत शिकणाऱ्या मुली
- लाभ : घर ते शाळा कॉलेज मोफत एसटी पास
- संपर्क विभाग : नजीकचा एसटी डेपो
-
योजना सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना
- पात्रता : इयत्ता पाचवी ते बारावी ते शिकणाऱ्या मुली
- लाभ : वार्षिक सहाशे रुपये शिष्यवृत्ती
- संपर्क विभाग : शाळा मुख्याध्यापक
-
योजना मोफत सायकल वाटप
- पात्रता : इयत्ता पाचवी ते बारावी ते शिकणाऱ्या मुली घर ते शाळा पाच किलोमीटर अंतर असल्यास
- संपर्क विभाग : पंचायत समिती समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद ठाणे
-
योजना सुकन्या समृद्धी योजना
- पात्रता : 0 ते दहा वयोगटातील कमाल दोन मुली
- लाभ : 5 टक्के व्याज शिक्षणासाठी 50 टक्के रक्कम एकवीस वर्षे पूर्ण झाल्यावर पूर्ण रक्कम
- संपर्क : विभाग पोस्ट ऑफिस राष्ट्रीयीकृत बँका
-
योजना जिजाऊ वसतिगृह योजना
- लाभ : वसतिगृहात मोफत निवास भोजन व इतर सुविधा
- संपर्क : विभाग महिला व बालविकास विभाग
-
योजना अस्मिता योजना
- लाभ : मोफत अल्पदरात सॅनेटरी नॅपकिन
- संपर्क : विभाग शाळा ग्रामपंचायत
-
योजना मुलींसाठी उपस्थिती भत्ता
- पात्रता : बीपीएल मुली पीएसपी तील एससी एसटी मुली
- संपर्क : विभाग शाळा गटशिक्षणाधिकारी
-
योजना स्वसंरक्षण कराटे कुंफू क्लास
- पात्रता : पाचवी ते बारावी तील मुली
- लाभ : मोफत स्वसंरक्षण शिक्षण
- संपर्क विभाग : गट विकास अधिकारी गट शिक्षण अधिकारी
-
योजना मोफत गणवेश योजना
- पात्रता : पहिली ते आठवी तील जिल्हा परिषद शाळेतील मुली
- लाभ : वार्षिक दोन गणवेश खरेदीसाठी अनुदान
- संपर्क विभाग : मुख्याध्यापक गटशिक्षणाधिकारी
आधार कार्डचा पत्ता ऑनलाईन पद्धतीने कसा बदलावा?
In Conclusion :
Government Schemes for Girl Child Education in India : बेटी बचाव बेटी पढाओ अभियान
शासनामार्फत महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबवण्यात येत आहेत महिलांना शिक्षित सक्षम आणि स्वयंपूर्ण बनवण्याचे या योजनेचा उद्देश आहे. अनेक महापुरुषांनी आपल्या सामाजिक क्रांतीची सुरुवात याच राज्यातून केली. महिलांच्या शिक्षणाची सुरुवात फुले दांपत्यांनी पुणे जिल्ह्यातून केली. त्यावेळेस त्यांना समाजाच्या मोठा रोषाला सामोरे जावे लागले असले, तरीही सर्व प्रकारचा रोष पत्करून त्यांनी स्त्री शिक्षणाची मुहुर्थमेढ रोवालीच. त्याचेच फलस्वरूप म्हणून आज सर्वत्र महिला पुरुषांच्या बरोबरीने चालल्याचे दिसत आहे.
महाराष्ट्राने तर स्त्रीयांचे राजकीय क्षेत्रातील प्रमाण वाढावे यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, त्यांना आरक्षण दिले. शिवाय शासकीय नोकऱ्यांमध्ये ही महिलांना आरक्षण देणारे महाराष्ट्र हे एक अग्रणी राज्य ठरले आहे याशिवाय राज्य शासनाने महिलांच्या सक्षमीकरणाच्या उद्देशाने वेगळा महिला आणि बालविकास विभाग स्थापन केला असून या विभागामार्फत Government scheme for Girls राबवल्या जात आहेत.